सैरभैर डायरी - २.३

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in जनातलं, मनातलं
12 Jan 2026 - 7:27 pm

२.१

२.२

"मामू गाडी बाहेरवाली साईटला घे, देखते है ,क्या बताया भाईंने पोलिस को "उस्मानने थंड आवाजात सांगितले.

२.३

उस्मान माझ्याकडे आणि मी त्याच्याकडे बघत अंदाज घेत होतो.
पलीकडे डोकावून मामूला बोललो, "जातीवर आलास भाडखाऊ ! याला सोड तुलाच पहिला धरणार मी !"
मामूला एकदम जिवाला लागले. "२ मिनिट बोलायचा भाउ , बाकी काही नाही, दीदीचा रीश्तेदार लागतो "
पण मामूने गाडी साईटऐवजी कट्ट्याकडे घेतली.त्यालापण माहिती होते, कट्ट्यासोबत पंगा घेतला तर नंतर गावात पळवून मारतील.. कट्ट्यापुढे एका बकाल बंगल्याच्या गेटमध्ये घुसवली. "जो भी करना, सिर्फ बात करना,मेरे जबान पे आया है. हाथ नहीं लगाएंगा कोई"
गांड फाटल्याने किंवा दोस्तीखातीर पण मामू मध्ये पडला होता.उस्मान एकदम निवळला, "अरे, मैं क्यू पंगा करू ? उधर खुले में पोलिस है, इसलिये साईट पे बोला"
"भाऊ, मला फक्त एवढाच सांग, पोलिसाने काय विचारला"
" ज्याने टीप दिली त्यालाच विचार ना , मला का मध्ये आणतो"
"भाउ, माझा लफडा मी निपटवतो,फक्त तू तुझा तोंड बंद ठेव .त्या दिवशी पण तू आल सोसायटी समोर शिव्या दिल्यास . तुझा काय संबंध होता ? माझा मी बघतो, हे असले फाट्क्यात पाय घालायचे धंदे बंद कर , नाहीतर चालणे अवघड होइल "
समजावताना हळूहळू भाषा बदलत होती
"फॅमिलीवाला पोरगा तू कशाला या लफड्यात पडतो? आई बापाची काळजी कर. कुठे काही बोलू नकोस. एकदम चूप"
२ दिवसाच्या कटकटीने गरम झालेला डोक! या सगळ्याला कारणीभूत असलेला हा साला आपल्या एरियात फॅमिलीची धमकी देतो, आइ बापाचे नाव काढ्तो , माझी कानशील तापली तशी फाडकन मुस्कटात टाकली.
क्षणभर कोणालाच काही कळले नाही.मी झपकन रिक्षाबाहेर उडी मारली आणि चौकाकडे पळत सुटलो.उस्मानने त्याच्या पोरांना पाठीमागे येऊ दिला नाही. बहुधा त्याला आताच्या वेळी राडा नको होता.एका पन्टरमागे ट्रिपल करून कट्ट्यावर आलो, जेवून खाऊन पोरे बाल्याकडून मीठ मसाला लावून सकाळची स्टोरी ऐकत बसले होते.
कट्ट्यावर पोचतच कल्ला झाला.नक्की मॅटर काय झालं ते सांग, ते पोरी कश्या होत्या इथवर सगळे प्रश्न. पोरांना थोडे गार केले आणि उस्मान आणि मामूचा मॅटर सांगितला.
पोरांची डोकी सटकली. हा माचो स्वतःला कोण समजतो.आताच घुसून मारायचा. "आता तो घंटा घरात नसणार. वॉन्टेड आहे. घरी नाय थांबणार"
उद्या बघू असे ठरवून वन्दे मातरम् घेतला आणि घरी आलो.घरी पुन्हा काही सांगायची ताकद नव्हती आणि मुख्य म्हणजे लेक्चर ऐकून घ्यायची.
गच्चीत झोपतो सांगून वरती गेलो.९० मारून झोपेला कवटाळले.
उन्ह वर आली. २ दिवस ऑफिसच्या कामाचा भोसडा झाला होता.आज काही नवीन नाटक नको म्हणत खाली आलो, तर बाबा घरीच होते. त्यांनीच चहा करून दिला.
"मग कधी सांगायचा ठरवलं आहेस ? की तुझा तूच निस्तारणार ?"

बाप तो बाप होता है , "काल सांगणार होतो . पण वेळ झाला म्हणून आज सांगणार होतो"
"मी जोशी वकिलाशी बोललो आहे, जाऊन ये त्यांच्याकडे. काय म्हणतात ते बघ"

म्हणजे फक्त सकाळचे कळले आहे तर..रात्रीचे प्रकरण नाही.. हुश्श !
कट्ट्यावर आलो.चहा मारला तेव्ढ्यात बाल्या उगवला , "भाई सेफ्टी जवळ ठेव. सिक्सर आहे "

(सिक्सर म्हणजे ६ गोळ्यांचा जुन्या पद्धतीचे छोटे पिस्तुल , गावठी असेल तर लोकल छर्रा गोळ्या वापरतात.)

"चुत्या , कधीपण जबाबला स्टेशनला जायला लागेल तेव्हा तिथे नेऊ का मिरवत ? माझ्याच गांडीत घाल्तील गोळ्या तुझ्या , तसपण मी असली लफडी जवळ ठेवत नाही. चल, तो वकील काय बोलतो बघून येऊ."

बाल्या, मी आणि होंडाची वरात वकिलांच्या दारात पोचलो.वकीलसाहेब माझीच वाट बघत होते
"ये , कालचे रात्रीचे कळले मला"
च्यायला याला पोरांच्यातले विषय कुठून कळले? पेपर आउट झाले काय ?

तेवढ्यात आतल्या खोलीतून उस्मान आला,सोबत काळा कोट आणि २-४ कालचेच चेहरे होते ,
धोक्याची जाणीव होताच बाल्याने कंबरेला हात घातला , च्यायला हा सिक्सर लावूनच आलाय !
कसंही असलं तरी वकील पाव्हणं होता. इथ राडा करून उपयोग नव्हता.
"बाल्या थांब.. दादा, हा इथे काय करतोय"
"तो तुझी माफी मागायला आलाय, बोल उस्मान, तू काय सांगत होतास"

बाल्याची डेरींग बघून सगळ्यांच्या गोट्या कपाळात गेल्या होत्या.

"अरे भाऊ, चुकला माजा काल. माझा डोकं चालेना.कोण काय सांगता कोणी काय. बडा भाई समजून माफ कर." उस्मान डायरेक्ट पायाशी आला..
हे बेण तर महामादरचोद कॅटेगरी मध्ये येता.एवढा कसा काय मऊ झाला.
"बस , सांग काय झाला ते" त्याचे वकील बोलले.
"भाऊ, माजा काय चूक नाय. माजा लाखाच्या वर मटेरियल चोरला त्या पोट्टीनी.मी फक्त मटेरियल आणून दे बोलला आणि एकीला सोडला आणि मी संध्याकाळी घरी गेलो . पोरगाने वाट पाहिली पण कोण आला नाही म्हणून त्याने चावी लावून आला. तिला मारलं वगैरे ते दुपारीच नंतर मी हात पण नाय लावला.माझ्या पोरीचा निकाह आहे पुढच्या महिन्यात. मी लई अडकलो रे भाऊ मला सोडव यातून. माझा फॅमिलीकडे बघून तर रहम कर." उस्मान आता गयावया करायला लागला होता.

"रडू नको! तू जा आता आणि जाताना याच्या दोस्ताला सोड चौकात"
मित्रा, एवढी डेरिंग बरी नव्हे हा" बाल्याला प्रेमळ सल्ला देऊन साहेबांनी दोघांना वाटेला लावले..

"हे काझी साहेब..मला सिनियर आहेत, हे उस्मानची केस बघतात.तेच त्याला घेऊन माझ्याकडे आले.बसा तुम्ही बोलत, मी चहाचे सांगून येतो."

"बेटा , तुमचे वकील तुमचा पाव्हणं, त्यांना बोलायला अवघड झालं पण त्याचा माझा बोलण झालाय. त्या पोरीकडे केससाठी नाय पैसा न ठिकाणा. आम्ही मॅटर सेटल करायला तयार आहे. पुढे गेला तर त्याला कोर्ट ,पोलिस सगळेनांच पैसे द्यायला लागणार. तुम्ही फक्त एवढा सांगा, की काल दुपारी उस्मान तिथे नव्हता. बाकी पोलिस ,वगैरे आम्ही हॅण्डल करू आणि तुमची पण काळजी घेणार हा ! जोशी साहेबांचे फॅमिली मेंबर आहे तुम्ही .मस्त पल्सर, बुलेट वगैरे काढा. उस्मानशेट मोठी पार्टी आहे. आज न उद्या त्या पोरी पण तेच करणार. पाचपाच्च्चीस मध्ये डील करणार, त्यांनी नाय केला तर पोलिस करणार. पण त्यात सगळ्यांना त्रास !
तुला लाइफलाँग चान्स भेटला आहे.. दोन लाखाला उस्मान तयार आहे. तुमचा काय ते आताच सांगा. लगेच स्टेशन ला जाऊन स्टेटमेंट रेकॉर्ड करू"

ज्याचा पगार ७००० आहे.त्याला एकरकमी २ लाख म्हणजे मोठी रक्कम होती.
बुलेटची डुग डुग कानात ऐकू यायला लागली होती.

धोरणमांडणीइतिहासकथालेख

प्रतिक्रिया

बोले तो एकदम झकाऽऽऽस चल रहा है डायरी मुनीभाय, और जल्दी जल्दी आन्दो…

- (वाचून सैरभैर झालेला) सोकाजी

निनाद's picture

13 Jan 2026 - 5:47 am | निनाद

उस्मानने थंड आवाजात सांगितले.

- मस्त लिहिता आहात!

मजा आ रहेला हैं भाय... 👍
बाल्याचा सीन वाचून 'बात हैं कमाल अपून की जिंदगी के खेल में' ह्या गाण्यातले खालील कडवे (2:25 to 2:45) आणि 'नाक्यावरचे' (तुमच्या भाषेत 'कट्ट्यावरचे') दिवस आठवले 😀

लफडा झगडा हो गया
तो हो गया रे डर हैं क्या
घोडा रखके खोपडी में
ठोक दे फिकर हैं क्या...

ज्यादा से ज्यादा क्या होगा रे?

सजा मिलेगी या प्यारे
छुट जायेंगे बेल में...
सजा मिलेगी या प्यारे
छुट जायेंगे बेल में...

BTW... क्रमश: लिवायला विसरले, की डायरीचा 'धी एन्ड' केल्यांव मुनीवर्य???

हाही भाग आवडला. वेगळ्या जगाची ओळख. रामदास काकांची एक सीरिज आठवली. त्यांनी ती अर्धीच सोडली होती असे स्मरते. तिचा एरिया थोडा वेगळा होता. पण अशीच उत्कंठा वाढवणारी.

पुभाप्र.

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Jan 2026 - 3:32 pm | राजेंद्र मेहेंदळे

उत्कंठावर्धक!! पण भाग जरा लहान लहान होताहेत असे वाटतेय. थोडे मोठे यौंद्या.
पुभाप्र

बुलेट आली की नाही ते लवकर कळू द्यात.

सौंदाळा's picture

14 Jan 2026 - 10:28 am | सौंदाळा

आईशप्पथ काय लिहिले आहे !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jan 2026 - 1:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मै भी पढ रहा है, मजा आ रहा है भाई.

-दिलीप बिरुटे

विंजिनेर's picture

16 Jan 2026 - 3:29 am | विंजिनेर

मस्त. आवर्जून वाचतोय.
डोण्ट स्टॉप नाउ...