नारायण
वॉट्सपवर सकाळी सकाळी निलेशचा गुडमॉर्निंगचा मेसेज. च्यायला लावतय आता कामाला.
सकाळपासून आहेस का? आहेस का? असे चारदा विचारुन साहेबांची स्वारी संध्याकाळी ऑफिसात अवतरते. फॉर्मलपणाचा कळस असे कपडे, एका हातात डायरी कव्हर चढवलेले आयपॅड, दुसर्या हातात रेबॅनचे डबडे अन अजून एक आयफोन घेऊन शूज कसे काढावे हा विचार करीत नुसताच उभा.
"अरे ये की तसाच" म्हणेपर्यंत साहेब खुर्चीवर बसलेले असतात.
हा निलेश. इव्हेंट मॅनेजर. हा फक्त कंपन्याच्या साहेबांना मॅनेज करतो असे आम्हा सर्व अॅडव्हर्टायझर लोकांचे मत.
"येर्टेलचे प्रिमीयम लाँच आहे. करतोस का?"
"काय काय घेतलास?" मी मुद्द्यावर