✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सेल्फी-एक विकार???

प
पिके से पिके तक.. यांनी
Sun, 03/06/2016 - 20:49  ·  लेख
लेख
परवाच वृत्तपत्रात बातमी वाचली, " सेल्फी काढताना हातात असलेल्या बंदुकीचा ट्रिगर दाबल्यामुळे तरुणाचा मृत्यू ".....!! एकीकडे जगामध्ये रोजच नवीन नवीन शोध लागत असताना , तेच विज्ञानिक शोध दुसरीकडे माणसाच्या मृत्यूचे कारण बनत आहे... एका US संस्थेच्या सर्वेनुसार मागील दोन-तीन वर्षात जगभरात ७५० पेक्ष्या जास्त लोकांचा मृत्यू हा सेल्फी काढताना झाला आहे..लोक स्वताचाच फोटो काढण्यात इतके मश्गुल होतात कि आजू-बाजूचे त्यांना ध्यानाच राहत नाही.. आतापर्यंत हृदय-विकार, अपघात,आत्महत्या,cancer , आजार , वृद्धपण असे विविध प्रकार हे मृत्यूचे कारण बनत होते...मात्र आता त्यात सेल्फी विकार किंवा सेल्फीहत्या(सेल्फी काढताना झालेला मृत्यू) हा विचित्र प्रकार include करावा लागेल.... सेल्फी निश्चित काढा पण तेवढी काळजी घ्या कि स्वताचा फोटो mobile वर असला पाहिजे न कि भिंतीवर.... विशेष करून या बाबतीत तरुणांमध्ये सतर्कता आली पाहिजे... शेवटी एका गाण्याचा ओळी लिहाव्याशा वाटतात.... सेल्फी काढताना...." जपून जपून जपून जपून जा रे पुढे धोका आहे....."
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
12764 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

गाण्याच्या औळी

जेपी
Sun, 03/06/2016 - 21:08 नवीन
लै..लै..लै रे सेल्फी लै लै रे.. टँव..टँव..टँव
  • Log in or register to post comments

=)) =))

अन्नू
Sun, 03/06/2016 - 21:10 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

अति सेल्फी प्रेम हे

सतिश गावडे
Sun, 03/06/2016 - 21:12 नवीन
अति सेल्फी प्रेम हे नार्सिसिझमचे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments

हे नार्सिसिझम मंजे काय??

जेपी
Sun, 03/06/2016 - 21:21 नवीन
हे नार्सिसिझम मंजे काय?? एखाद्याला कुल्फी आवडत असेल तर काय म्हणाल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

जेपी भाऊ सेल्फी आणि कुल्फी लय

पिके से पिके तक..
Sun, 03/06/2016 - 21:28 नवीन
जेपी भाऊ सेल्फी आणि कुल्फी लय फरक आहे...कुठचा कुठे संबंध नका लावू....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

हे नार्सिसिझम मंजे काय??

सतिश गावडे
Sun, 03/06/2016 - 21:29 नवीन
हे नार्सिसिझम मंजे काय??
नार्सिसिझमची थोडीफार कल्पना येऊ शकेल असे लेखन मी इथे केले आहे.
एखाद्याला कुल्फी आवडत असेल तर काय म्हणाल..
आवड त्याला कुल्फीची sss आवड त्याला कुल्फीची sss कुल्फीच्या काडीची sss
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

त्या लेखा बद्दल धन्यवाद,

जेपी
Sun, 03/06/2016 - 21:45 नवीन
त्या लेखा बद्दल धन्यवाद, अजुन बरच वाचन वाढवावे लागेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हे भोळ्या कुल्फीवाल्या... भैय्याआआअ!!!!

तुषार काळभोर
Mon, 03/07/2016 - 11:32 नवीन
>>>> आवड त्याला कुल्फीची sss आवड त्याला कुल्फीची sss कुल्फीच्या काडीची sss >>>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अर्रर्र

तुषार काळभोर
Mon, 03/07/2016 - 11:32 नवीन
हायलाईट करायचं होतं- ते चुकून स्ट्राईकौट झालं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

संक्षीचे लेख वाचल्यावर लग्गेच

बॅटमॅन
Tue, 03/08/2016 - 20:32 नवीन
संक्षीचे लेख वाचल्यावर लग्गेच कळेल नार्सिसिझम म्हणजे काय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

सन्क्षीझम

अगम्य
Wed, 03/09/2016 - 00:07 नवीन
असे नार्सिसस सारख्या इतर व्यक्तीवरून आलेले नाव देणे शोभत नाही. त्यांचा तर स्वयंभू सन्क्षीझमच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

स्टँडिंग ओव्हेशन या

आनन्दा
Wed, 03/09/2016 - 08:56 नवीन
स्टँडिंग ओव्हेशन या प्रतिसादाला,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य

नार्सिझम नाही वाटत

चौकटराजा
Sun, 03/06/2016 - 21:35 नवीन
नार्सिझम हा विकार एक व्यक्तिपुरता मर्यादित असतो. सार्वजनिक नार्सिझम ही संकल्पना मी तरी ऐकलेली नाही. सेल्फी हे एक सांप्रत बोकाळलेले खूळ आहे.संगणकावरील चॅटिंग ,वॉलपेपर, फेसबुक ,आर्कुट रिंगटोन या खुळाप्रमाणेच त्याचे होईल.
  • Log in or register to post comments

नार्सिसिझम हा व्यक्तीपुरता

सतिश गावडे
Mon, 03/07/2016 - 00:02 नवीन
नार्सिसिझम हा व्यक्तीपुरता मर्यादीत असला तरी शेवटी व्यक्तींचाच समाज बनतो. सारा समाजच हळूहळू नार्सिसिस्ट होत आहे की काय हा मुद्दा The Narcissism Epidemic: Living in the Age of Entitlement या पुस्तकात छान मांडला आहे. फेसबुक हे नार्सिसिस्टांचं "व्यक्त होण्याचं" आदर्श ठिकाण आहे. एखादया रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर ऑर्डर द्यायच्याही आधी "फेसबुक चेक इन" करून मी कुठे जेवायला आलो आहे हे जगाला सांगणारी व्यक्ती नार्सिसिस्ट असण्याची शक्यता असते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

माझे वेगवेगळ्या ग्रुपमधले दोन

अभ्या..
Mon, 03/07/2016 - 00:15 नवीन
माझे वेगवेगळ्या ग्रुपमधले दोन चांगले मित्र आहेत. त्यांची एक खासियत म्हणजे स्वतःच्या पर्सनालिटी अन स्वफोटोविषयी नितांत प्रेम आहे. वेगवेगळ्या ड्रेसमधले, वेगवेगळ्या अ‍ॅक्शनचे अन वेगवेगळ्या ठिकानी स्वतःचे फोटो काढायचे अन ते एडिट करत बसायचा दांडगा छंद आहे दोघांना. त्यातील एकाचे तर जवळ पास ३० ते ३५ हजार स्वफोटो आहेत. त्यातील बरेचसे फेस्बुकावर, वॉटस्पवर टाकणे चालूच असते. सेल्फी त्याला म्हणू शकतो की नाही म्हाईत नाही पण हे फोटो बरेचसे एडिटेड असतात. ह्याला आपण नार्सिसिझम म्हणू शकतो का गावडेसर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आशयाशी सहमत

श्रीरंग_जोशी
Sun, 03/06/2016 - 21:39 नवीन
सतत अन जिथे तिथे सेल्फी काढत राहणे हे आत्मरती (Narcissism) चे लक्षण आहे. या सवयीचा मोठ्या प्रमाणात अतिरेक होत असल्याने लोकांवरचा प्रभाव हळू हळू कमी होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments

सात अब्ज लोकसंख्येत गेल्या

राजेश घासकडवी
Sun, 03/06/2016 - 22:17 नवीन
सात अब्ज लोकसंख्येत गेल्या दोनतीन वर्षांत ७५०! म्हणजे दरवर्षी एक कोटी लोकसंख्येत तीन! अहो, एवढ्या कमी रेटने कुठचीही अॅक्टिव्हिटी करताना मरायला होतं. झोपाळ्यांवरून पडून, दोरीत गळा अडकून वगैरे त्यापेक्षा जास्त प्रमाणात मुलं मरतात. म्हणून 'बागेत खेळणं हा महाभयंकर शोध आहे. त्यापासून सावध राहिलं पाहिजे' असं म्हणणार का तुम्ही? झोपाळ्यावर बसण्याला विकार म्हणणार का? उगीच पान पडल्यावर आकाश कोसळलं म्हणून कशाला ओरडायचं?
  • Log in or register to post comments

नशीब आकाशगंगेचा हिशोब नाही

पिके से पिके तक..
Mon, 03/07/2016 - 10:58 नवीन
नशीब आकाशगंगेचा हिशोब नाही लावला... राजेश भाई..साधारण पाच वर्षापूर्वी जो आकडा शुन्य होता आणि तेव्हा कोणी कल्पना पण नसेल केली कि पुढे जाऊन सेल्फी पण मृत्यूचे कारण बनू शकेल , तिथे ७५० हा आकडा नक्कीच विचार करण्यालायक आहे.... आणि झोपाळ्यावर झोके घेताना वेगाचे आणि आजूबाजूचे भान नसल्यामुळेच अपघात घडेल.. ..त्याचप्रमाणे सेल्फी घेताना भान विसरणे हेच अपघाताला कारण ठरते.. बाकी सावधानता बाळगावी कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

वेगाचे आणि आजूबाजूचे भान नसल्यामुळेच अपघात घडेल.

तुषार काळभोर
Mon, 03/07/2016 - 15:09 नवीन
हेच तर.. सेल्फीचा किंवा झोक्याचा कशाला... सर्वच अपघात हे वेगाचे आणि आजूबाजूचे भान (आणि तारतम्य) नसल्यामुळे होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिके से पिके तक..

अपघात होणं आणि नको तिथे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/08/2016 - 18:53 नवीन
अपघात होणं आणि नको तिथे मुर्खपणा करताना अपघात ओढवुन घेणं ह्यात फरक नाही का? तुम्ही दिलेली उदाहरणं झालेल्या अपघाताची आहेत. मधे व्हॉट्स अ‍ॅपवर एका कड्याच्या टोकाला बसुन सेल्फी स्टिकने सेल्फी काढणार्‍या दिडशहाण्या ग्रुपचा फोटो आलेला त्यामधे ऑलमोस्ट अपघाताला निमंत्रण दिलेलं. दोन्हीमधे फरक आहे सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 03/06/2016 - 23:53 नवीन
अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने सेल्फी घेणे हा एक मनोविकार असल्याचे दोन वर्षापूर्वीच अधिकृतरित्या जाहीर केले आहे ! AMERICAN PSYCHIATRIC ASSOCIATION MAKES IT OFFICIAL: ‘SELFIE’ A MENTAL DISORDER त्यांनी त्या रोगाचे नाव सेल्फायटीस असे ठेवले आहे आणि तिचे वर्गिकरणही केले आहे... Borderline selfitis : taking photos of one’s self at least three times a day but not posting them on social media Acute selfitis: taking photos of one’s self at least three times a day and posting each of the photos on social media Chronic selfitis: Uncontrollable urge to take photos of one’s self round the clock and posting the photos on social media more than six times a day
  • Log in or register to post comments

डॉक्टरसाहेब,

मोदक
Mon, 03/07/2016 - 19:03 नवीन
डॉक्टरसाहेब, हीच माहिती देणार्‍या अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेच्या एखाद्या वेबसाईचा किंवा त्यांनी प्रमाणित केलेल्या एखाद्या पेपर चा दुवा आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

बहुक हे खरे नसावे. selfitis

प्राची अश्विनी
Mon, 03/07/2016 - 19:35 नवीन
बहुक हे खरे नसावे. selfitis hoax
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ

तर्राट जोकर
Mon, 03/07/2016 - 12:26 नवीन
अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने सेल्फी घेणे हा एक मनोविकार असल्याचे दोन वर्षापूर्वीच अधिकृतरित्या जाहीर केले आहे ! >> विद्यमान पंतप्रधानांनाही ???
  • Log in or register to post comments

त्याला मनोविकार म्हणत नाही,

अभ्या..
Mon, 03/07/2016 - 12:31 नवीन
त्याला मनोविकार म्हणत नाही, नमोविकार असेल कदाचित. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

हाण् तेच्या**

कपिलमुनी
Mon, 03/07/2016 - 14:49 नवीन
घुमिवलस ! लै बेक्कार हसलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

=))

यशोधरा
Mon, 03/07/2016 - 19:27 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

चिक्कीताईनाही जडलाय हा विकार

रॉजरमूर
Sat, 04/23/2016 - 21:03 नवीन
चिक्कीताईनाही जडलाय हा विकार . Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

Consistent Irrelevancy

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/08/2016 - 18:55 नवीन
Consistent Irrelevancy हासुद्धा एक मानसिक विकार असावा का? रच्याकने तुमचे प्रतिसाद वाचुन आमच्या संन्यासात गेलेल्या एका मित्रांची आठवण येते. त्यांचं नाव तीन अक्षरी आणि आडनाव दोन अक्षरी आहे. तुम्ही तेचं तर नव्हे?>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

http://www.misalpav.com

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/08/2016 - 19:10 नवीन
http://www.misalpav.com/comment/814307#comment-814307
ह्या ठिकाणी श्री. तर्राट जोकर काय म्हणता नीट पहा
मोदीभक्तांना. संशयास्पदरित्या मोदीविरोधात जाणारा एक शब्दही दिसला तर पिसाळल्यागत करतात. झुंडीने हल्ला करतात. एका प्रतिसादावर चार चार लोक प्रतिवाद करतात. वस्तुनिष्ठ चर्चेत असंबद्ध भावनिक मुद्दे आणतात, भावनिक चर्चेत वस्तुनिष्ठ प्रश्न आणतात. काही सुचले नाही की 'तेव्हा कुठे होतात?' हा फेवरिट प्रश्न काढतात. काहीही करुन कसेही करुन मोदी-भाजप विरोध करणार्‍यास सळो की पळो करुन सोडतात. मोदिंच्या बाबतीत विरोध, खिल्ली, विनोद, आरोप काहीही असो त्यांना फक्त अतिविखारी द्वेषच दिसतो. कुठे मोदीविरोधक वेगळ्या विषयावर बोलला तरी खेचून मोदी मध्ये आणतात्, नंतर तुम्हाला मोदीविरोधाशिवाय काहीच दिसत नाही असे म्हणत तोंडावर हात ठेवून बो करत सुटतात. जालावरच्या चर्चांना महायुद्धाचे स्वरुप देतात, इथे चाललेल्या चर्चा म्हणजे जीव की प्राण करुन लढवतात. जणू इथे एक उणादुणा शब्द सिद्ध झाला तर तिकडे दिल्लीत इंद्राचे आसन डळमळीतच होणार आहे. एवढी असुरक्षितता पाहिली आहे का कुठे?
कुठे मोदीविरोधक वेगळ्या विषयावर बोलला तरी खेचून मोदी मध्ये आणतात्
ओह आय सी. धाग्याचा विषय मोदी होता तर. सॉरी माफ करा. मला वाटलं धोकादायक पद्धतीने सेल्फी काढण्याबद्दल धागा होता का काय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

काडी होती ती. आग लागली. गवत

तर्राट जोकर
Tue, 03/08/2016 - 20:53 नवीन
काडी होती ती. आग लागली. गवत वाळके होते, पेटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

" जपून जपून जपून जपून जा रे

जव्हेरगंज
Mon, 03/07/2016 - 12:59 नवीन
" जपून जपून जपून जपून जा रे पुढे धोका आहे....."
  • Log in or register to post comments

असे तर सगळीकडेच लोक सेल्फी

सप्तरंगी
Mon, 03/07/2016 - 18:50 नवीन
असे तर सगळीकडेच लोक सेल्फी काढताना, आज काय खाल्ले काय पिले हे सांगताना , फिलिंग यो आणि फिलिंग त्यों म्हणताना आणि पोस्ट करताना दिसतात. (मला शिकायचेय ते अजून) अश्या गोष्टी सारख्या वाचून वाचून मला सगळीकडे असे आपली टिमकी वाजवणारे लोक दिसू लागतात. कळत नाही - सारखा सेल्फी काढून पोस्ट केला तर Narcissism, एकही फोटो नाही काढला आणि कुठेही आपला चेहराच नाही दाखवला तर डिप्रेशन. त्यातील लक्षुमण रेषा आपण सामान्य तर ओळखुच नाही शकणार, ओळखायचा प्रयत्न केला तरी नक्की नाही सांगता येणार. डॉक्टर्सना / psychologist ना चांगले दिवस आलेत का ?
  • Log in or register to post comments

एकही फोटो काढला नाही, कुठे

तर्राट जोकर
Mon, 03/07/2016 - 18:59 नवीन
एकही फोटो काढला नाही, कुठे दाखवला नाही तर डिप्रेशन येतं हे विधान जरा अतिच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

एकही फोटो काढला नाही, कुठे दाखवला नाही तर डिप्रेशन येतं

सप्तरंगी
Mon, 03/07/2016 - 19:22 नवीन
असे विधान मी तरी नाही केले. तुम्ही थोडा भाग उचलून त्याला ' येत ' असे जोडलंत. हे अति नाही का ? (खर तर मला हे सगळच अति वाटते. पण इथे दिग्गज लोक आहेत आपण त्यांचे विचार ऐकुयात.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

कळत नाही - सारखा सेल्फी काढून

तर्राट जोकर
Mon, 03/07/2016 - 21:36 नवीन
कळत नाही - सारखा सेल्फी काढून पोस्ट केला तर Narcissism, एकही फोटो नाही काढला आणि कुठेही आपला चेहराच नाही दाखवला तर डिप्रेशन.>> ह्याचा अर्थ काय घ्यावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

मराठीचा क्लास लावा.. त्या

आनन्दा
Tue, 03/08/2016 - 13:57 नवीन
मराठीचा क्लास लावा.. त्या कन्हैयाच्या धाग्यावर पण तुमचा मराठीचा घोळ झालाय. ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

कुठे? बरं ते असुदेत. मराठीचं

तर्राट जोकर
Tue, 03/08/2016 - 14:05 नवीन
कुठे? बरं ते असुदेत. मराठीचं बघु नंतर, तुम्ही वकिली कधीपासून सुरु केलीत आनंदासाहेब?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

बाकी - मी उगीचच कोणाला तरी

आनन्दा
Tue, 03/08/2016 - 15:20 नवीन
बाकी - मी उगीचच कोणाला तरी सल्ले द्यायला जात नाही. पण तुमची माझ्या मनातली पहिली प्रतिमा एका त्रयस्थ विचारवंताची होती. नंतर ती बदलून हळूहळू "सार्वकालीन विरोधकाची" बनत गेली. असे वाटू लागले की मिपावरच्या एका आयडीने परकायाप्रवेश केला आहे. पुढे तर विरोधाच्या भरात तुम्ही फारच वाहवत चाललात, म्हणून जरा गाडीला ब्रेक लावायला हे प्रतिसाद.. आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे. विरोध करण्याच्या नादात तुमचे मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष होऊन केवळ शब्दच्छलातच आनंद मानू लागलात की काय? असो, वाटते म्हणून बोलतो. पटले तर घ्या, नाहीतर सोडून द्या.. तुमचा हा जर परकायाप्रवेश असेल तर मग बोलणेच खुंटले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

तिथे अध्याहृत असलेला शब्द

आनन्दा
Tue, 03/08/2016 - 13:58 नवीन
तिथे अध्याहृत असलेला शब्द "येतं" असा नसून "म्हणतात" असा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

तुम्हाला अध्याहृत असलेला शब्द

तर्राट जोकर
Tue, 03/08/2016 - 14:08 नवीन
तुम्हाला अध्याहृत असलेला शब्द बसवून पूर्ण प्रतिसाद परत लिहून दाखवाल का हो मराठीचे गुरुजी? आम्ही अजून 'कमल नमन कर' हेच गिरवतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

सारखा सेल्फी काढून पोस्ट केला

आनन्दा
Tue, 03/08/2016 - 15:15 नवीन
सारखा सेल्फी काढून पोस्ट केला तर Narcissism झालाय म्हणतात, एकही फोटो नाही काढला आणि कुठेही आपला चेहराच नाही दाखवला तर डिप्रेशन आलंय म्हणतात. मूळ लेखकाच्या अनुमोदनाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अगदी बरोबर आनन्दा, अनुमोदन

सप्तरंगी
Tue, 03/08/2016 - 21:04 नवीन
अगदी बरोबर आनन्दा, अनुमोदन आणि आभार !! मला म्हणायचेय: सारखे असे articles वाचून आणि मग लोकांना तसेच वागताना पाहून आपण मनात काहीतरी connect करत लोकांना judge करत जातो, आणि मग सगळीकडे असे लोक दिसू लागतात. पण लोक तसे असतातच असे नाही. म्हणून हा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार वाटतो. डिप्रेशन, Narcissism किंवा अशी इतर निदाने इतक्या साध्याशा (सेल्फी काढण्याच्या / कधीच फोटोच न टाकण्याच्या etc ) गोष्टीवरून करता येऊ शकत नाहीत. अर्थात यामागे loneliness, publicity stunts, anxiousness अश्या छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात. पण म्हणजे काही लगेच 'विकार' नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

सेल्फीचं हे वेड तर भयंकरच आहे

श्रीगुरुजी
Mon, 03/07/2016 - 20:03 नवीन
सेल्फीचं हे वेड तर भयंकरच आहे. https://in.news.yahoo.com/nude-selfies-latest-trend-sweeping-080000979.html?nhp=1
  • Log in or register to post comments

+१

अन्नू
Mon, 03/07/2016 - 22:14 नवीन
अगदी हिच बातमी सांगणार होतो. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

याला काय म्हणायचं ?

विवेक ठाकूर
Mon, 03/07/2016 - 20:30 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

त्यात काय म्हणायचंय?

श्रीगुरुजी
Mon, 03/07/2016 - 20:44 नवीन
त्यात काय म्हणायचंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

मोदीअब्बांचा फोन मॅचिंग

अभ्या..
Mon, 03/07/2016 - 20:48 नवीन
मोदीअब्बांचा फोन मॅचिंग मॅचिंग आहे म्हणायचं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

त्यांचा फोन आहे, ते स्वतःच

श्रीगुरुजी
Mon, 03/07/2016 - 20:52 नवीन
त्यांचा फोन आहे, ते स्वतःच स्वतःचा फोटो काढताहेत आणि त्यात इतरांना त्रास व्हायचं कारणंच काय? ते स्वतःच स्वतःचा फोटो काढत असताना माध्यमांनी ते दृश्य टिपले आणि ते बघून इतरांना त्रास होतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

त्याला सेल्फी म्हणतात

विवेक ठाकूर
Mon, 03/07/2016 - 23:08 नवीन
आणि लेखकाच्या म्हणण्या प्रमाणे ती मनोरूग्णता आहे . मोदी सातत्यानं हाच प्रकार करतांना दिसतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा