ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
22 Apr 2016 - 1:44 am

सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार,
पहिल्या भागाच्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल, तसेच प्रतिक्रिया/सूचनांबद्दलही धन्यवाद.

हे ठिकाणधोरणमांडणीप्रकटनविचारअनुभवमाहितीसंदर्भ

ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०१ : प्लोव्हरची महाभरारी

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
21 Apr 2016 - 10:54 pm

===================================================================

विज्ञानबातमीमाहिती

बचपन के दिल भुला न देना . २

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in जनातलं, मनातलं
21 Apr 2016 - 10:02 pm

बचपन के दिन भुला न देना ......१

मागील भागात प्राथमिक शाळेतील बालपणीच्या आठवणी झाल्या. आता त्यानंतरचा भाग

जीवनमानप्रकटन

येते आठवण अधून -मधून ....

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जे न देखे रवी...
21 Apr 2016 - 9:26 pm

येते आठवण अधून -मधून ,
पहिल्या भेटीची ,
तहानलेल्या स्पर्शाची ,
तुझ्या नाजूक हातांची ,
अन त्यावर कोरलेल्या स्वप्नांची …

येते आठवण अधून -मधून ,
पहिल्या चुंबनाची ,
निसटलेल्या ओठांची ,
तुझ्या डोळ्यातील आसवांची ,
अन एकाचवेळी बघितलेल्या चंद्राची ….

येते आठवण अधून -मधून ,
पहिल्या प्रणयाची ,
लाखो धकधकींची ,
तुझ्या नयनांतील भीतीची ,
अन त्या क्षणी जगलेल्या एका जन्माची ……

कविता माझीकविता

बेधुंद (भाग ४ )

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
21 Apr 2016 - 4:49 pm

बेधुंद (भाग ४ ) :

(बऱ्याच दिवसाने लिहितोय, कामाचा व्याप जरा जास्त वाढलाय - टायपिंगच्या चुका पोटात घ्या :P )

मार्च २००६ :

कथाविरंगुळा

मी अश्व!!

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
21 Apr 2016 - 9:40 am

'शक्तिमान'ला ही माझी काव्यांजली समर्पित!

वेग अफाट
शक्ती अचाट

अंगी डौल
मोल अमोल

निष्ठा घोर
इतिहास थोर

करारी बाणा
सखा महाराणा

बनता दळ
सैन्या बळ

आजीचे कथन
पऱ्यांचे वाहन

नीज गहाण
वया परिमाण

लौकिकी मती
प्राणी जगती

अडीच पावली
चौसष्ठ आलयी

पौरुष नामांकन
दिव्य आभूषण

मिळता सात
तिमिरा मात

ऋणी विश्व
मी अश्व!!

- संदीप चांदणे

कविता माझीरोमांचकारी.अद्भुतरसशांतरससंस्कृतीकलावाङ्मयकवितासाहित्यिकसमाजरेखाटन

वेगानी पसार

सुजल's picture
सुजल in जनातलं, मनातलं
21 Apr 2016 - 1:05 am

"नारिता" एयरपोर्ट वर एजंट माझ्या नावाची पाटी घेऊनच उभा होता त्यामुळे त्याला ओळखण सोप्प गेल. मी त्याला माझी ओळख पटवून दिली आणि "तुडतुड्या" चालीने त्याने माझ्या ब्यागा उचलल्या आणि पूर्णपणे आम्ही एयरपोर्ट च्या बाहेर. ताबडतोब त्याने योकोहामा पोर्ट ला जायला ट्याक्सी बुक केली आणि पाच मिनिटात ट्याक्सी हजर. पटापटा त्याने ट्याक्सीत सामान ठेवलं आणि ट्याक्सीचा पुढचा दरवाजा उघडून माझ्या स्वागतार्थ वाकून वाकून त्यांच्या पद्धतीने नमस्कार केला.मला तर पूर्ण पणे गडबडायला झाल. तो इतका वाकून वाकून मला नमस्कार करत होता तर आता आपण पण त्याच्या समोर असाच वाकून वाकूनच नमस्कार करायचा का?

मुक्तकलेख

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १७: रस्ता: मतदान

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
21 Apr 2016 - 12:00 am

नमस्कार मंडळी,

छायाचित्रणकला स्पर्धेच्या १७व्या भागाला दिलेल्या प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. स्पर्धकांबरोबर त्यांना प्रोत्साहन देणार्‍या सर्वांचेच विशेष आभार.

या स्पर्धेच्या मतदानासाठी हा धागा आहे. नेहमीप्रमाणेच वाचकांनी आपली मते १, २, ३ अशी नोंदवावीत ही विनंती. तसे क्रमांक का द्यावेसे वाटले याबद्दलही जरूर लिहा.

आपली मते आजपासून १० दिवस, म्हणजे ३० तारखेपर्यंत नोंदवावीत ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!

फोटोज मोठ्या आकारमानात पाहायचे असल्यास त्यावर क्लिक करावे.

मांडणीशुभेच्छा

असा ही एक क्लायंट

स्वीट टॉकरीणबाई's picture
स्वीट टॉकरीणबाई in जनातलं, मनातलं
20 Apr 2016 - 8:06 pm

माझी मुलगी दुसर्‍या यत्तेत जाऊन शाळा सबंद वेळ सुरू झाल्यावर मी काही उद्योग करावा असं ठरवलं. बी.एस्.सी. (फिजिक्स) असल्यामुळे जनरल शिक्षण होतं पण उद्योगधंद्याला पूरक असं काही नव्हतं. बारा वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा कॉलेजला प्रवेश घेतला, D.C.A. केलं. वर्गामधली मुलं मुली मला आंटी म्हणायचे! नवीन शिक्षण संपल्यावर डी.टी.पी. आणि छपाईचा व्यवसाय सुरू केला.

कथासमाजkathaaविचारलेखअनुभवविरंगुळा

पूर्णान्न अप्पे (अनाहिता अन्नपूर्णा स्पर्धा प्रथम पारितोषिक विजेती पाककृती)

पूर्वाविवेक's picture
पूर्वाविवेक in पाककृती
20 Apr 2016 - 5:19 pm

खरतरं 'वन डिश मील' यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारच्या खिचड्या जास्त योग्य समजते. विविध भाज्या, वेगवेगळ्या डाळी तसेच कधी दलीया तर कधी ओटस वापरून मी खिचड्या करते. पण हि स्पर्धा आहे आणि काहीतरी नाविन्यपूर्ण हवा. असंही बऱ्याचदा माझ्याकडे अप्पे असतातच. कमी वेळात आणि कमी तेलात होणारा हा पोटभरीचा प्रकार, माझ्या घरात खूपच प्रिय आहे.