अननसाला सद्गती!
घरी, आमच्या परिचितांच्या शेतातून अननस आले. पहिले दोन दिवस दुर्लक्ष्य केल, कारण ते कापणे साफ करणे कधी करून माहित नाही. ;) टिनातल्या चकत्याच वापरल्या होत्या. दोन दिवसांनी अननसाचा घमघमाट सुटला स्वैपाकघरात. मग म्हटल ह्याला सद्गती द्यावीच. मास्टर शेफ चे सलग काही एपिसोड नुकतेच सलग पाहिल्याने काहितरी भरभक्कम नावाच , नाट्यपूर्ण कराव अस घाटत होतं ( मनातल्या मनातच हां ) पण मग नवर्याच्या बंगाली मित्राच्या घरी खाल्लेली एक चटणी / रायत आठवल. लगेच आंतर्जालावर साकड घातल. अन एक रेसिपी हाताला लागली.