"ती" - २

खटपट्या's picture
खटपट्या in जनातलं, मनातलं
21 Jul 2015 - 10:37 am

"ती" - १

पत्रिका आलीय हे कळल्यावर नैराश्याचा झटका वगैरे येतोय की काय असे वाटले. एका खोलीतून दुसर्या खोलीत जायचे देखील त्राण उरले नाही. जेवणावरची तर इच्छाच उडाली. असे कसे अचानक लग्न ठरलं. विचार करुन करुन डोकं फुटायची पाळी आली. असेही मी कोण होतो जे तीच्या घरचे लोक माझी परवानगी घेणार होते कींवा मला कळवणार होते. मी होतोच कोण. एक तथाकथीत सुशीक्षित बेरोजगार. काम ना धंदा. आणि असला तरी ते मला का विचारतील. मी तर गेली कित्येक वर्षे त्यांच्या कुटूंबीयांना भेटलो नव्हतो. येणे जाणे नाही, फोन नाही. मी उगाच आपला आभासी विश्वात जगत होतो. सर्व बाजूंनी विचार केल्यावर डोकं थोडं शांत झालं. तरीही चेहर्याची रया गेली ती गेलीच. नेहमीप्रमाणे आईने ओळखलेच. आणि विचारले..
"काय रे?" असा का शांत शांत?"
"कुठे काय?"
"मग रात्री जेवलाही नाहीस बरोबर. बाहेर काय भांडण वगैरे झालेय का?"
"नाही"
"ती लग्न पत्रिका आलीय, ती तरी बघ, कधी आहे लग्न, कुठे आहे, जावे लागेल"
"तूच बघ"
"अरे असं काय करतोस! माझ्या सख्ख्या चुलतभावाच्या पहील्या मुलीचे लग्न आहे. जावं तर लागणारंच"
"पहीली मुलगी?"
"अरे दोन मुली नाहीत का त्याला? पहील्या मुलीचे आहे आता लग्न"
"ओssssssssssssssssssssssह !!"
"काय रे काय झाले?"
"अरे हो त्या मामाला दोन मुली आहेत ना, त्यातल्या पहील्या मुलीचे लग्न आहे होय?" ("ती" दुसरी होती)
"हो मग, त्यात एवढं मोठ्यानं ओरडायला काय झालं?"
"काही नाही, असंच" (जीव भांड्यात पडला) "कधी आहे लग्न?"
"आहे पुढच्या महीन्यात"
"तू जाणार आहेस का?"
"हो जावे तर लागणारंच, पण लग्न गावाला आहे. का रे?"
"नाही सहजच विचारलं?"
"तू येतोयस का बरोबर?"
"ते सर्व गावीच असतात का?"
"ते म्हणजे कोण?"
"म्हणजे मामा, त्यांची मुले?"
"हो मोठा मुलगा आहे तो इकडे मुंबईत असतो आणि दोन मुली गावीच असतात. त्यातील मोठ्या मुलीचे लग्न आहे, मोठ्या मुलाचा इकडे बीजनेस आहे"
"ओह, असं आहे तर"
"तू येणार की नाही ते नाही सांगीतलेस"
"अगं माझे एक दोन ठीकाणी जॉबचे प्रयत्न चालू आहेत"
"ठीक आहे, काय ठरतंय ते सांग, मला एकटीला जाणं कठीणंच दीसतंय, बरोबर आला असतास तर बरं झालं असतं"
मनातील फुलपाखरू पुन्हा उडायला लागले, मनात ईमले बांधणे सुरु झाले. बरेच दीवसांनी तीला प्रत्यक्ष बघण्याची संधी मिळणार होती. पण मी एवढा का उतावीळ होत होतो तीला बघण्यासाठी? गेली कित्येक वर्षे मी तीला पाहीलेही नव्हते. मनात एक चित्र होतं. प्रत्यक्षात ती मनातल्या चित्राप्रमाणे असेल का? तीचा स्वभाव तसाच असेल की आता वयपरत्वे बदलला असेल? तीला अजुन लहानपणीच्या गोष्टी आठवत असतील का? हजार प्रश्न..

सुदैवाने एका कंपनीमधुन कॉल आला की तुम्हाला दोन तीन दीवसात हजर व्हायचे आहे. पगारही फ्रेशरच्या मानाने बरा होता. पायगुण समजावा का? पायगुण? कोणाचा? अजुन कशात नाही काय...

कामावर रुजु झालो, काम आवडीचे होते. आईची भूण भूण सुरुच होती. येतोयस का? मनात तर जायचे होते. पण नवीन नोकरी, कसे जमणार? एकदा बॉस एकटा असताना भीत भीत विचारले की “कामावर रुजु व्ह्यायच्या आधी मी एक १५ दीवसाची फॅमीली ट्रीप आखली होती. एक तर ती ट्रीप कॅन्सल करावी लागणार कींवा मला जाता येणार नाही. कारण कामावर रुजू होउन फक्त २०/२२ दीवस झाले आहेत. सुट्टी मागणं बरोबर वाटत नाही.” बॉस बोलला की “बिंधास्त जा, नंतर बघू.” मला हा आश्चर्याचा धक्का होता. फुलपाखरू अजुन भरार्या मारायला लागले. छातीतील धडधड वाढायला लागली. काय करणार होतो मी गावी जाउन? फक्त तीला बघण्यासाठी चाललोय? काय करायचे नुसते बघून? परत चिडवाचिडवी सुरु होईल का? झाली तर तिला सहन होईल का? का तिने तिचा तो आधीच शोधून ठेवला असेल? माझ्या सारख्या सामान्य व्यक्तिमत्वाच्या मुलाला ती भाव तरी देईल का?
मुंबई ते गाव अशी बस करण्यात आली होती ज्यांना जायचे त्यांनी त्यांची नावे तिच्या भावाकडे दयायची होती. परत आईची भूणभूण सुरु,
"अरे काय ठरवलं आहेस? जायचं की नाही लग्नाला? त्यांना नावं द्यायची आहेत!"
"हा बहुतेक येईन मी."
"आता तू आला नाहीस तरी चालेल, कारण बरेच लोक आहेत माझ्याबरोबर?"
"मग नको येऊ का मी?"
"अरे तुझ्यावर आहे"
"ठीक आहे, दे माझे नाव."
"तूच दे ना"
"ठीक आहे, सांगतो फोन करून"

नंबर मिळवून फोन लावला

"हेलो, विजय आहे का?"(विजय तीचा भाऊ)
"नाही, विजय बाहेर गेलाय. आपण कोण?"
"मी संदीप, आपण कोण?"
"मी नेहा, विजयची धाकटी बहीण" (छातीतली धडधड प्रामाणाबाहेर वाढली.)
"काही निरोप द्यायचाय का?"
"हो मला आणि आईला गावी लग्नाला यायचे आहे, म्हणून नावे द्यायची होती"
"अच्छा, संदीप म्हणजे कोण? आपलं पूर्ण नाव काय?"
"अगं मी मालती आत्याचा मुलगा संदीप! ओळखलेस?"
"अरे हाssss" (नशीब आठवणीत आहे). ओके तुम्ही येताय दोघे? ठीक आहे. सांगते मी दादाला."
"ओके, बाकी तू कशी आहेस?"
"मी मजेत आहे, सॉरी हा मी आवाज ओळखला नाही, बरेच वर्षांनी बोलतोय ना आपण!"
"हो, पण तू मुंबईत कधी आलीस?
"अरे मी गेली पाच वर्षे इकडेच आहे, एका शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळालेय मला"
"ओह, मला माहितीच नाही." (माहिती असती तरी असे काय करणार होतो म्हणा. हिंमत होती कुठे जाउन भेटायची आणि बोलायची)
"अच्छा, मी सांगते दादाला, ओके?"
जो फोन कधी संपूच नये असे वाटत होते तो ती संपवायला बघत होती. किंवा ती कामात असणार.
"ठीक आहे" :(
"ठीक आहे मग ठेऊ?"
"हो ठीक आहे ठेव"

लगेच फोन ठेवायची घाई का केली तीने? का मला असे वाटले? लग्न घरातील बाकीची कामे असतील तिला. का मुद्दामून तुटक वागली? खरंच तुटक वागली का मला असं वाटतंय? नऊ दहा वर्षानंतर भेटणाऱ्या अनोळखी मुलाबरोबर जेवढे बोलायला पाहिजे तेवढे बोलली की ती. पण मी अनोळखी थोडाच आहे? गेली नऊ दहा वर्षे न बोललेला मुलगा अनोळखीच. असो. कुठे रहाते ते विचारलेच नाही.
दुसऱ्या दिवशी आई म्हणाली, "अरे नेहाचा फोन आला होता, बस कुठे थांबणार आहे, किती वाजता यायचे आहे याबद्दल माहिती देण्यासाठी फोन होता. तू कुठे आहेस म्हणून विचारात होती." (हायला माझ्याबद्दल का विचारले असेल)
"माझ्या बद्दल विचारले?"
"हो, तू ओळखतोस तिला?"
"छे, कुठे नाही गं, त्यादिवशी फोनवर बोलणे झाले तेवढेच तेही ९/१० वर्षांनी"
"फोन करून बघ"
परत धडधड सुरु

"ती" - ३

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2015 - 10:45 am | टवाळ कार्टा

दिल गार्डन गार्डन हो गया ;)

खटपट्या's picture

21 Jul 2015 - 11:39 am | खटपट्या

:)

नाखु's picture

21 Jul 2015 - 12:38 pm | नाखु

खटपट भारी है!!!

हिंदोळ्याचे हेलकावे! :-)

मस्त चालू आहे. आमच्याही हृदयाची धडधड वाढली बघा. पुभाप्र!

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2015 - 1:33 pm | टवाळ कार्टा

मी व्यनी केलाय तो पाहिला का?

पद्मावति's picture

21 Jul 2015 - 1:39 pm | पद्मावति

फारच मस्तं झालाय हा भाग पण. पुढच्या भागात काय होणार याची भयंकर उत्सुकता लागली आहे.

लवकर टाका हो पुढचा भाग आणि हो थोडा मोठा पण..फार पटकन वाचून होतो पण मस्त वाटतंय वाचतांना :)

खटपट्या's picture

22 Jul 2015 - 1:11 pm | खटपट्या

टाकतो, काल तीसरा भाग जवळ जवळ पूर्ण करत आणला होता. पण मिपा कोलमडलं होतं. आता तो टाईप केलेला भाग घरी राहीला आहे. स्वतःला व्यनी करायची आयडीया आमलात आणली पाहीजे.

सर्व प्रतिसादकांचे आभार्स..

संजय पाटिल's picture

22 Jul 2015 - 4:28 pm | संजय पाटिल

आत्ता बरं वाटलं. खाली क्रमःश न्हवते त्यामुळे म्हंटले असे कसे?

रातराणी's picture

21 Jul 2015 - 11:15 pm | रातराणी

वाचतेय.

पैसा's picture

22 Jul 2015 - 12:44 pm | पैसा

मस्त सुरू आहे!

मास्टरमाईन्ड's picture

22 Jul 2015 - 1:09 pm | मास्टरमाईन्ड

परत धडधड सुरु

खरंच दिल गार्डन गार्डन हो गया (ट.का. यांच्या प्रतिसादामधून साभार कॉपी)

एक एकटा एकटाच's picture

22 Jul 2015 - 6:18 pm | एक एकटा एकटाच

छान चाललीय

येउ दया भराभरा

उगा काहितरीच's picture

22 Jul 2015 - 6:28 pm | उगा काहितरीच

वाचतोय...

पुभालटा,गार्डन वगैरे वगैरे!!

मस्त, मस्त. उगाच ट्रॅजेडी द एंड वगैरे करायचा नै हां. पैलेच सांगून ठेवत आहे.

स्वाती२'s picture

22 Jul 2015 - 8:04 pm | स्वाती२

छान झालाय हा भागही

सविता००१'s picture

22 Jul 2015 - 8:11 pm | सविता००१

छानच झालाय हा भाग. मस्त वाटतंय वाचताना

जुइ's picture

22 Jul 2015 - 10:56 pm | जुइ

मजा येत आहे वाचताना.

प्यारे१'s picture

22 Jul 2015 - 10:58 pm | प्यारे१

गार्डन वगैरे मागेच झालं आता पुढचा भाग कधी?

तुमचा अभिषेक's picture

22 Jul 2015 - 11:32 pm | तुमचा अभिषेक

मस्त चालूय .. साथिया, हमापकेकौन वगैरे आठवू लागलेत

श्रीरंग_जोशी's picture

22 Jul 2015 - 11:33 pm | श्रीरंग_जोशी

उत्कंठावर्धक झालाय हा भाग.
पुभाप्र.

सुबोध खरे's picture

23 Jul 2015 - 10:27 am | सुबोध खरे

+१००

अर्धवटराव's picture

23 Jul 2015 - 6:06 am | अर्धवटराव

:)

पुढे काय झालं?

तळ्यात मळ्यात's picture

23 Jul 2015 - 6:44 am | तळ्यात मळ्यात

दोन्ही भाग एकदम वाचून काढले. आता तिसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत!

बोका-ए-आझम's picture

23 Jul 2015 - 9:52 am | बोका-ए-आझम

कहूं क्या मै आगे
' नेहा ' लागे
जी ना लागे
टूटा तारा था ये मन मेरा
बन गया चांद होके तेरा
- कवी बोकोबा ' धडधड '.

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

23 Jul 2015 - 10:54 pm | अरवीन्द नरहर जोशि.

सर्वसाधारण विषय आहे.

स्पंदना's picture

24 Jul 2015 - 1:54 pm | स्पंदना

धड धड धड धड......

:))