✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शेवटचा पदन्यास एक

ब
बहुगुणी यांनी
Wed, 08/03/2016 - 04:25  ·  लेख
लेख
पंधरा वर्षांपूर्वी एक तंत्रज्ञ काम करायचा हाताखाली, डॅरेन कोल्स्टन नावाचा. "आपलं काम बरं आणि आपण बरं" असा एकाग्र चित्ताने, इतरांमध्ये फारसा न मिसळता रहायचा. उत्तम कमावलेली शरीरयष्टी. त्यामुळे त्यामुळे एक श्वेतवर्णी आणि एक कृष्णवर्णी अशा नटखट म्हणून प्रसिद्ध असलेल्या दोन्ही सहकारी तंत्रज्ञ सहकारी कन्यका त्याच्या आगे-मागे रुंजी घालायच्या, पण हा कुणाच्या अध्ये-मध्ये न पडता, कानांत इअरफोन्स घालून गाणी ऐकत आपलं काम करीत रहायचा. एकदा संध्याकाळी साडेसहा वाजून गेल्यानंतर आपण एकटेच आहोत आहोत अशा समजुतीने त्याने इअरफोन्स च्या ऐवजी स्पीकर्स वर गाणी लावली होती आणि अशात एका उशीराच्या मीटिंगनंतर मी माझ्या ऑफिसमध्ये आलो. मला गाणं ऐकू आलं, आणि आवडलं म्हणून त्याच्या जवळ जाऊन त्याला तसं सांगितलं. आधी खजील झाला आणि सॉरी म्हणाला, पण मी त्याला म्हंटलं की 'अरे, मला गायक खरंच आवडला, कोण आहे?' तो म्हणाला, "ल्यूथर वॅन ड्रॉस". मी थॅंक्यूं म्हंटलं, आणि 'त्या गायकाची आणखी काही गाणी असतील तर मला दे' म्हंटलं. त्याने दुसर्‍या दिवशी इतर गायकांबरोबर त्या गायकाची आणखी २-३ गाणी असलेली सीडी मला आणून दिली. ती ऐकून झाल्यानंतर मी तो गायक, त्याने म्हंटलेली गाणी, हे सर्व कामाच्या रगाड्यात विसरून गेलो. पुढे वर्षभराने डॅरेन ऑफिसमध्ये आला, म्हणाला, "तुम्ही नेहेमी मला पुढे शीक म्हणता, मी कायनेसियालॉजीमध्ये मास्टर्स करायचा निर्णय घेतलाय, करू का?" (Kinesiology: study of the mechanics of body movements) "माझे आई-वडील आता थकले आहेत, मी एकटाच मुलगा आहे, त्यामुळे यापेक्षा आधिक पगार मिळवून देणारी नोकरी किंवा व्यवसाय करू शकलो तर त्यांना हातभार लागेल. पण त्यासाठी हातातली बॅच्लर्सची डिग्री पुरेशी नाही." पंचविशीच्या आसपासच्या अमेरिकन तरुणाकडून अशी आई-वडिलांबद्दलची जबाबदारीची भावना जरा अनपेक्षित होती, पण बरं वाटलं. मी म्हंटलं, "जरूर कर". त्यानंतर तो मधून दोन-एकदा भेटून गेला, आणि दोन वर्षांनी मास्टर्स झाल्यावर 'स्वत:चं छोटंसं फिटनेस सेंटर सुरू करतो आहे' हे सांगायला आला. ******************* काही वर्षांपूर्वी मी जिथे होतो त्या ठिकाणची नोकरी सोडून इतरत्र जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी माझ्या फेअरवेल पार्टीला डॅरेन आठवणीने आला होता. मी म्हंटलं, "आई-वडिल कसे आहेत?" म्हणाला, "माझं फिटनेस सेंटर चांगलं चालायला लागलेलं पाहिलं वडिलांनी, पण गेल्या वर्षी गेले ते आजारानंतर. आता आई एकटीच असते माझ्याजवळ." मी म्हंटलं, "आय अ‍ॅम सॉरी! यू मस्ट मिस युअर फादर अ लॉट! आय नो द पेन मायसेल्फ." म्हणाला, "हो, त्या वॅन ड्रॉसच्या गाण्यासारखं होतं कधी कधी..." ***************** मी आई आणि वडिलांच्या विषयी आधी लिहिलं होतं. परवा भावाचा व्हॉट्सॅप मेसेज आला होता वडिलांच्या श्राद्धाविषयी. तेंव्हा पुन्हा एकदा वॅन ड्रॉसचं गाणं आठवलं. त्या गाण्याचे शब्द शोधले, आणि त्यांचा भावानुवाद इथे देतो आहे. मूळ गाणं ऐकाच! मी पूर्वी खूप लहान असतांना निरागसपणा संपला नसतांना बाबा मला उंच उडवून झेलायचे माझ्या अन आईच्या बरोबर डोलायचे झोप येईपर्यंत मला गोल फिरवायचे आणि हळूच नेऊन निजवायचे मला खात्री असायची प्रेमाच्या वलयाची पुन्हा मिळावं आवर्तन एक बाबांबरोबर नर्तन एक न संपणारं गीत म्हणेन मी सदा फक्त मिळू दे तो नाच पुन्हा एकदा मतभेद होता माझ्यात अन आईत धावत असे मी बाबांकडे घाईत खूप वेळ ते मला हसवत गोड बोलून मला फसवत माझ्याकडून करून घ्यायचे तेच, जे आईला हवे असायचे त्या रात्री मला झोप लागली की रूपया ठेवायचे उशीखाली स्वप्नातही नाही आलं, बाबा दूर जातील थेट मला हवीय केवळ एक नजरभेट शेवटचा पदन्यास एक बाबांबरोबर नर्तन एक न संपणारं गीत म्हणेन मी सदा फक्त मिळू दे तो नाच पुन्हा एकदा बरेचदा आईच्या बंद दारावरून जाताना मी ऐकलंय तिला बाबांसाठी रडतांना माझ्याहून आधिक मग मी तिच्यासाठी प्रार्थना करतो देवाची मोठी नेहेमी नाही करत तू पण आता इतकं कर रे बाबांसाठी झुरतेय ती आयुष्यभर रे एकदाच दोघांना चालू दे तालात माझ्याकडे पाहून हासु दे गालात रोज झोपी जाताना एवढंच स्वप्न पाहीन आयुष्यभर देवा, तुझा ऋणी राहीन पुन्हा मिळावं आवर्तन एक बाबांबरोबर नर्तन एक न संपणारं गीत म्हणेन मी सदा फक्त मिळू दे तो नाच पुन्हा एकदा Dance With My Father By Luther Vandross Back when I was a child Before life removed all the innocence My father would lift me high And dance with my mother and me And then spin me around 'til I fell asleep Then up the stairs he would carry me And I knew for sure I was loved If I could get another chance Another walk, another dance with him I'd play a song that would never ever end How I'd love, love, love To dance with my father again When I and my mother will disagree To get my way I would run from her to him He'd make me laugh just to comfort me, yeah, yeah Then finally make me do just what my mama says Later that night when I was asleep He left a dollar under my sheet Never dreamed that he would be gone from me If I could steal one final glance One final step, one final dance with him I'd play a song that will never, never end 'Cause I'd love, I'd love to dance with my father again Sometimes I'd listen outside her door And I'd hear how my mama cried for him I pray for her even more than me I pray for her even more than me I know I'm praying for much too much But could you send back the only man she loved I know you don't do it usually But dear Lord, she's dying To dance with my father again Every night I fall asleep And this is all I ever dream Songwriters: LUTHER VANDROSS, RICHARD MARX
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
4747 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

ह्युदयस्पर्शी! बाबांची आठवण

स्मिता_१३
Wed, 08/03/2016 - 06:16 नवीन
ह्युदयस्पर्शी! बाबांची आठवण आली प्रकर्षाने !
  • Log in or register to post comments

कवितेचा अनुवाद सुंदर.

स्मिता_१३
Wed, 08/03/2016 - 06:17 नवीन
कवितेचा अनुवाद सुंदर.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर लिहिलंय.

एस
Wed, 08/03/2016 - 09:11 नवीन
अतिशय सुंदर लिहिलंय. भावानुवाद फारच छान!
  • Log in or register to post comments

+१

शलभ
Wed, 08/03/2016 - 13:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

भावानुवाद आवडला. मूळ गाणं

यशोधरा
Wed, 08/03/2016 - 09:28 नवीन
भावानुवाद आवडला. मूळ गाणं घरुन ऐकण्यात येईल.
  • Log in or register to post comments

सुरेख..

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 08/03/2016 - 09:31 नवीन
छानच लिहिले आहे. हे इंग्रज पण दिसतात तसे नसतात. वाचताना माझ्या अशाच एका मित्राची आठवण आली. गाणे खुप सुंदर आहे आणि भावानुवादा मुळे मुळ गाण्यातल्या भावना आमच्या पर्यंत पोचल्या. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

भावानुवाद आवडला

राजाभाउ
Wed, 08/03/2016 - 11:02 नवीन
भावानुवाद आवडला
  • Log in or register to post comments

लेख आवडला...

मुक्त विहारि
Wed, 08/03/2016 - 11:06 नवीन
मस्त..
  • Log in or register to post comments

खुपच छान ललिहिलय मुळ गाणे

स्पा
Wed, 08/03/2016 - 11:06 नवीन
खुपच छान ललिहिलय मुळ गाणे ऎकतो आता
  • Log in or register to post comments

यु ट्युब लिंक....

मुक्त विहारि
Wed, 08/03/2016 - 11:08 नवीन
https://www.youtube.com/watch?v=WQDLu0tRASI
  • Log in or register to post comments

छान आठवणी

सिरुसेरि
Wed, 08/03/2016 - 13:22 नवीन
छान आठवणी
  • Log in or register to post comments

आह्ह्ह्ह्ह. अल्टीमेटच

अभ्या..
Wed, 08/03/2016 - 14:07 नवीन
आह्ह्ह्ह्ह. अल्टीमेटच बहुगुणीसाह्यबा. मला हे गाणे आवडते खूप.
  • Log in or register to post comments

बहु

विनायक प्रभू
Wed, 08/03/2016 - 14:31 नवीन
गुणी पोस्ट
  • Log in or register to post comments

मुक्तक

नाखु
Wed, 08/03/2016 - 14:50 नवीन
आणि त्याला जोड गाण्याची, दोन्ही खूप आवडले..
  • Log in or register to post comments

आवडलं

जगप्रवासी
Wed, 08/03/2016 - 15:42 नवीन
आईवरचा लेख आणि बाबांसाठी लिहिलेली कविता दोन्ही खूप आवडले .... खासकरून या ओळी खूप आवडल्या. काय करतोय जगावेगळं? कसलं ध्येय? कसलं नाव? सोडून द्यावं सगळं, सगळं आता घ्यावी घरी धाव
  • Log in or register to post comments

...

पैसा
Wed, 08/03/2016 - 18:16 नवीन
....
  • Log in or register to post comments

अप्रतिम. फार आवडला भावानुवाद.

अजया
Wed, 08/03/2016 - 18:19 नवीन
अप्रतिम. फार आवडला भावानुवाद.
  • Log in or register to post comments

आवडलं

ज्योति अळवणी
Wed, 08/03/2016 - 22:59 नवीन
आवडलं
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

रातराणी
Wed, 08/03/2016 - 23:32 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

सुन्दर...

अभिजीत अवलिया
Sat, 08/06/2016 - 00:51 नवीन
सुन्दर...
  • Log in or register to post comments

माझे बाबा नुकतेच निवर्तले...

खटपट्या
Sat, 08/06/2016 - 00:57 नवीन
माझे बाबा नुकतेच निवर्तले... त्यामुळे लेख वाचून डोळे पाणावले
  • Log in or register to post comments

अहाहा.. काय सुंदर लिहिलं आहे.

रुपी
Sat, 08/06/2016 - 02:13 नवीन
अहाहा.. काय सुंदर लिहिलं आहे.. भावानुवाद फारच सुरेख.
  • Log in or register to post comments

भावानुवाद आवडला.

रेवती
Sat, 08/06/2016 - 07:30 नवीन
भावानुवाद आवडला.
  • Log in or register to post comments

मस्त गीत ...

चौकटराजा
Sat, 08/06/2016 - 07:58 नवीन
हे गीत फार सुंदर आहे. तसेच गायक ही सुरेल गोड आवाजाचा. पुन्हा याची इतर गीते ऐकीन. या गायकाची ओलख करून दिल्याबद्दल बहुगुणी साहेब अत्यंत खुषी. यातील पहिले कडवे म्हणजे माझ्या बाबांचे वर्णन नाही. कारण त्यानी मला घेत असे निजवले की नाही आठवत नाही.पण बाबा म्हणून हे तंतोतंत माझे वर्णन आहे. माझ्या तारूण्यातील गमतीशीर भागाची यामुळे आठवण ताजी झाली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा