ती - ६

खटपट्या's picture
खटपट्या in जनातलं, मनातलं
24 Jul 2016 - 10:56 pm

"ती"
"ती - २"
"ती" - ३
"ती - ४"
ती - ५

"ती" - ६

शेवटी अतुलला गाठलाच. सरळ विचारले काय चालले आहे. तर म्हणाला "काही नाही, इकडच्या तीकडच्या गप्पा"
"काय रे अतुल, तु असा कीतीसा ओळखतोस नेहाला? तासनतास गप्पा मारतोस. सरळ सांग काय विषय असतो"
"अरे काही नाही, ती तीच्या शाळेतल्या जमती जमती सांगत असते"
"अजून?"
"अजून मी काय बोलावे तीच्याबरोबर अशी तुझी इच्छा आहे?"
"माझा विषय नाही काढलास ना?"
"तुझा नाही पण तीच्या लग्नाचा विषय होता. तीच्या साठी मुलगा बघत आहेत. तीन स्थळे आली आहेत. एक अमेरीकेत असतो. दोघांचा इथे बिजनेस आहे."
"मग?"
"मग काय? ते ठरवतील काय ते"
"हो पण नेहाचे म्हणणे काय आहे?"
"तीचे काही म्हणणे नाही. बाबा ठरवतील त्याला ती हो म्हणणार."
"अशी कशी रे गावंढळासारखी वागतेय?"
"मग काय करावे तीने? तुला विचारावं का? कोणता मुलगा निवडू ? कींवा तु करतोस का माझ्याशी लग्न?"
"....."
मी काही न बोलता गप्प बसलो. अतूलला सगळं कळत होतं. तीच्या बहीणीचा लग्नाचा दीवस उजाडला. नेहा जबरद्स्त दीसत होती. नवरी सोडून सगळे तीच्याकडेच पहात होते. (का मीच पहात होतो?) नेहाने लग्न सोहळ्याची जबाबदारी उत्तम पार पाडली. मी आणि अतुलही ही होतोच तीच्या आणि विजयच्या मदतीला. आता नेहा माझ्याबरोबर जरा मनमोकळे बोलू लागली. काही गोष्टीत माझी मतेही घेत होती. मला खूप बरे वाटत होते. लग्न व्यवस्थीत पार पडले. दुसरा दीवस थोडा रीलॅक्स होता. तीसर्‍या दीवशी पाच परतवन होते. म्हणजे मुलीकडचे लोक्स मुलाच्या घरी जाउन मुलीला परत एक दोन दीवसांसाठी घेउन येतात. नेहाच्या आइबाबांने सांगीतले की संदीप, अतुल, नेहा आणि अजून दोन लहान मुले असे पाच जण जातील पाचपरतवन साठी. तीसर्या दीवशी जरा लवकरच उठलो. मस्त घोटून दाढी केली. अतुल तयार झाला. मोठी जीपसारखी गाडी केली होती. सगळे तयार होउन गाडीत बसायला बाहेर पडलो. नेहा आधी बसली. अतुलने मला नेहाच्या बाजुला बसायला सांगीतले. मी स्पष्ट नाही म्हणून सांगीतले. शेवटी नेहा आणि माझ्यामधे अतुल बसला आणि दोन मुले मागे पुढे बसली. २० ते २५ मीनीटे लागणार होती.
नेहाने सहज विचारले, "संदीप, तू मुंबईत कुठे राहतोस?"
"मुलूंडला, का गं"
"नाही सहजच विचारले, आणि ऑफीस कुठे आहे तुमचे?"
"आमचे ऑफीस बोरीवलीला"
"ओह, बोरीवलीला? अरे अम्हीही बोरीवलीलाच रहातो.ये ना कधी आलास तर."
"हो, विजयने बोलावलेच आहे, नक्की येइन." आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन असे झाले.
आमचा हा संवाद ऐकुन अतुल चेकाळला, मला कोपराने ढोसू लागला. मी दुर्लक्ष केले. परत ड्रायवरच्या समोर असलेल्या आरशातून आमची नेत्र पल्लवी चालू झाली. तीला कळणार नाही अशा अंदाजाने मी तीच्याकडे आरशातून पहात होतो.
पाचपरतावन पार पडले. येताना तीच्या बहीणीला आम्ही घेउन आलो. येताना ती तीच्या बहीणीशी बोलत होती त्यामुळे जास्त बोलता आले नाही. घरी आल्यावर लगेच अतूलने विचारले, "काय रे संदीप, पत्ता माहीती आहे ना बोरीवलीच्या घरचा? नाहीतर मी येतो बरोबर"
"नाही नको, मी जाइन एकटा"
"ठीक आहे बाबा नाही येत. बस्स?"
"हम्म. पण काय रे अतुल, ते तीन स्थळे आली होती त्याचे काय झाले?"
"अरे तुला सांगीतले ना, तीचे आइबाबा काय ठरवतील ते. पण बहूतेक हीची सद्या लग्नाची तयारी नाही आहे"
"ओह, गूड!!"
"गूड काय त्यात? आता नाहीतर कधीतरी होणारच ना?"
"हा ते तर आहेच! पण काय रे, तू माझा विषय नक्की काढला नव्हतास ना?"
"नाही रे. काढायचाय का?"
"नको. मी बघतो काय करायचे ते."
दोन दीवसात आम्ही गावातून निघालो. नेहा आणि तीच्या घरचे एक आठवडा राहून निघणार होते. अतूलही माझ्याबरोबर निघाला. विजयने माझा फोन नंबर घेतला. नेहाने माझा फोन नंबर घेतला. मुंबईला गेल्यावर नक्की ये असे विजय आणि नेहाने परत एकदा सांगीतले. परत येताना आइ माझ्याशी तुटकच वागत होती. मी पण जास्त लक्ष दीले नाही. एक दोन आठवडे असेच निघून गेले आणि विजयचा फोन आला. रवीवारी जेवायला बोलावले होते. मन उड्या मारायला लागले. काय करायचे, कोणते कपडे घालायचे, जाताना काय घेउन जायचे याचा विचार चालू झाला. घरात सांगायचे नव्ह्तेच. खास रवीवारसाठी नवीन शर्ट आणि अत्तर घेउन आलो. ऑफीसमधे जास्तीच्या कामासाठी जायचे आहे असे सांगून जेवढा होता होइल तेवढा टापटीप होउन निघालो. घामाचा त्रास नको म्हणून मुलूंड ते बोरीवली अशी ए.सी.बस पकडून पोहोचलो. तीच्यासाठी आणि तीच्या आत्यासाठी गजरे विकत घेतले. शोधत शोधत घरी पोहोचलो. विजयने माझे स्वागत केले. गजरे सुपुर्द केले. पाणी प्यायलो. पुढे काय... कधी एकदा नेहाला बघतोय असे झाले होते. विजयने आणि तीच्या आत्याने माझी चौकशी सुरु केली. कधी लागलास कामाला. काय प्रकारचे काम आहे. कंपनी कशी आहे. पुढे कीती स्कोप आहे. जसे काय स्थळाचीच चौकशी करतायत. मी जमतील तशी उत्तरे दीली. थोड्यावेळाने नेहा बाहेर आली. रविवार असल्यामुळे केस धूवून मोकळे सोडले होते. त्यामुळे अतीसुंदर दीसत होती. माझ्याकडे बघून हसली आणि आमच्या बाजूला येउन बसली. पण विजय आणि आत्याचे प्रश्न ऐकुन तीला तीथे थांबावेसे वाटेना म्हणून ती तीथून उठून जाउ लागली. आत्याने तीला थांबवले.
मी विचारले, "नेहा, तुझी शाळा कुठे आहे?"
"प्रभादेवीला"
विजय म्हणाला "अरे, आपण लहानपणी भेटलो त्यानंतर आपली भेटच झाली नव्हती. कीती वर्षांनी भेटतोय आपण. आता टच मधे रहा. येत जा अधून मधून"
"हो येइन ना." (आता तर येणारच)
नेहाने बनवलेल्या जेवणावर यथेच्छ ताव मारला आणि मी त्यांच्या घरुन निघालो ते परत येण्याचे आश्वासन देउनच. अजून एकदोन रवीवार मी त्यांच्याकडे जाउन आलो. नेहा आणि माझी आता चांगलीच ओळख झाली होती. आणि एक दीवस तो प्रसंग घडला.
एक दीवस बॉसने बोरीवलीच्या क्लायंटकडे जायला सांगीतले. आम्हाला शनीवारची सुटी असे. पण मला नाही म्हणता येइना. आणि बोरीवलीचा क्लायंट म्हटल्यावर मी लगेच तयार झालो. जमल्यास काम संपवून नेहाला भेटून यायचा मनात प्लॅन बनवला. मी सकाळी लवकर उठून तयार होउन क्लायंटकडे ९ वाजताच पोहचलो. जाउन बघतो तो काय, क्लायंट ऑफीस बंद. शनीवारची त्यांना सुटी असते हे माझ्या बॉसलाही माहीती नाही. तीथून बॉसला फोन केला. बॉसनेही सॉरी बोलून दीलगीरी व्यक्त केली. आता करायचे काय म्हणून लगेच स्वारी "नेहासदन"कडे रवाना झाली. विजय सकाळीच त्याच्या कामासाठी निघून गेला होता आणि नेहा आणि तीची आत्या घरी होत्या. मी न सांगता गेल्यामुळे दोघीही बावरल्या. चहापाणी झाले. तीची आत्या हॉस्पीटलमधे नर्सचे काम करत असल्यामुळे ती नीघायच्या तयारीत होती. नेहाला सुटी होती. मी आत्याला सॉरी म्हणालो. "न सांगताच आलो"
आत्या म्हणाली, "अरे सॉरी काय? तुझ्या कामासाठी आला होतास आणि वेळ मिळाला म्हणून आलास नं? आणि आम्ही कोणी परके का आहोत. तू बस चहा पाणी घे मला उशीर होतोय. मी नीघते. नेहा, येते गं मी..."
तीची आत्या नीघून गेली. नेहा आणी मी घरात एकटेच. मला अवघडल्या सारखे झाले. नेहा आतमध्ये चहा नाश्त्याचं बघत होती तेवढ्यात मी दरवाजा सताड उघडा करुन ठेवला. त्यांचा मजल्यावर मोजुन तीन फ्लॅट. त्यातील एका फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. मला उगाच आल्यासारखं वाटलं. अपराधीपणा जाणवायला लागला. मी बाहेर एकटाच आहे हे पाहून नेहा बाहेर आली आणी तीने मला टीव्ही चालू करुन दीला. भारत पाकीस्तान क्रीकेट सामना सुरु होता. भारत पाकीस्तानचा सामना म्हणजे माझा जीव की प्राण मी उत्कंठेने पाहू लागलो. नेहाने क्रमाक्रमाने मला पोहे आणि त्यानंतर चहा आणून दीला. मी सामना पहाण्यात गर्क आहे हे तीने पाहीले. तीला अवघडल्या सारखे झालेय का हे मला कळत नव्हते पण सामना टाकून जायला माझ्याही जीवावर आले होते. तीनेही माझ्याबरोबर सामना थोडावेळ पाहीला. थोड्यावेळाने काही कारणाने शेजारच्या बाइ डोकावून गेल्या. नेहाने "काही हवय का?" असे विचारताच "नाही सहजच आले होते!" असे म्हणून माझ्याकडे निरखून बघून निघून गेल्या. नेहालाही काही कळेना. मी परत सामना पहाण्यात गुंतून गेलो. नेहा परत कधी आतमधे गेली मला कळलेच नाही. थोड्या वेळाने बाहेर आली आणी मला म्हणाली, "अरे संदीप, सामना जोरदार होणार असे दीसतेय. मी कोळंबीच कालवण केलंय जेउनच जा"
मला काय करावे समजेना. कोळंबी म्हणजे माझा वीक पॉइंट. नेहाने वाढायलाच घेतले. छानपैकी रस्सा बनवला होता. भाताबरोबर ताव मारला. नेहा आणि मला आता एकमेकांचे स्वभाव माहीत झाले होते. मला तर ती आवडत होतीच. पण तीही आता माझ्याकडे मन मोकळे करत असे. आम्ही एकत्र मॅच बघत जेवलो.
मधेच नेहाला विचारले, "काय गं नेहा, ती स्थळं सांगून आली होती तुला मागे त्याचं का झालं?"
"काय होणार? पुढे काही नाही झाले!"
"का? पुढे का नाही गेले प्रकरण?"
"पुढे काही व्हावं अशी तुझी इच्छा होती का?"
"तसं नाही गं"
"तुझी इच्छा नाही ना? मग राहुदे?"
"नेहा, तुझ्या लग्नाचा विषय आहे. त्यात माझ्या इच्छेचा प्रश्न कुठे आला?"
"हो का? तूझी काहीच इच्छा नाही?"
"नाही.....म्हणजे...ते"
"माझं दुसर्या कुणाशीही लग्न झालेलं चालणार आहे तुला?"
"तसं नाही...पण"
"मग कसं ते सांग ना संदीप..."
".........."
"ठीकै, तू मॅच बघ, मी आतलं आवरते." अशी बोलून ती आत नीघून गेली. मला काय बोलावे काय करावे सुचेना. सरळ उठून घरी निघून जावं का? पण सामना क्रीकेट सामना रंगात आला होता. भारताची बॅटींग सुरु झाली. बाहेर टळटळीत उन. त्यावर मी भात ओरपून खाल्ला होता. सकाळी लवकर उठल्यामुळे झोप पूर्ण झाली नव्हती. जेवण अंगावर आलं आणि मॅच बघता बघता मला डूलकी लागली. मी सोफ्यावर बसल्या बसल्या झोपलो. नेहा कधी आली तीने टीव्ही कधी बंद केला. परत आत कधी गेली मला काहीच कळले नाही. दीड तासाने मला जाग आली तेव्हा कळले की टीव्ही बंद आहे आणि नेहा आतमधे काहीतरी करत आहे. टीव्ही चालू केला आणि नेहाला हाक मारली. ती पटकन बाहेर आली. म्हणाली, "अरे तू, बसल्या जागेवरच झोपलास. म्ह्णून मग मी टीव्ही बंद केला. झाली का झोप?"
"सॉरी नेहा, मी एवढा वेळ थांबायला नको होतं. मी निघतो आता"
"अरे थांब चहा टाकते, चहा घेउन जा"
मी हो म्हणालो. नेहा आतमध्ये परत चहा करायला गेली. मी दार बघीतलं, सताड उघडं. बाजूच्या बाइ परत येउन गेल्या असतील का? येउन गेल्या असतील तर त्यांना काय वाटले असेल? नेहाने पटकन चहा बनवून आणला. मी चहा घेतला. नेहा काही घडलंच नाही अशी वावरत होती. तसं काही घडलंही नव्हतंच. चहा संपवून, नेहाला बाय करुन निघणार तोच दारात नेहाची आत्या उभी. तीच्या चेहर्यावर मला पहाताच भलं मोठं प्रश्न चीन्हं. मी सकाळी दहाला त्यांच्या घरी गेलो होतो आणि आता दुपारचे अडीच वाजत होते.
तीने मला आश्चर्याने विचारले, "संदीप, तू अजून इथेच?"
"हा ते मॅच पहात बसलो, वेळ कधी गेला कळलाच नाही......"
आतून नेहा आली. तीच्याकडे आत्याने विचित्र नजरेने पाहीले... पाच सेकंद आम्ही तीघे एकमेकांच्या तोंडाकडे पहात होतो. आत्याच्या चेहर्यावर भली मोठी प्रश्नावली. चोरी पकडली गेल्यावर चोराच्या चेहर्‍यावर येतात तसे भाव माझ्या चेहर्‍यावर. केले तर काहीच नव्हते. नेहाचा चेहरा "काहीतरी चूक केलीय पण आता काय करायचे" असा झालेला.
मी निघतो म्हणून जो पायर्या उतरुन खाली आलो तो थेट घरी....

(क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

24 Jul 2016 - 11:11 pm | बाबा योगिराज

चला उशिरा आलात, पण बरोबर दिलेल्या पत्यावर आलात.

जरा लवकर लवकर लिहित जा.
वाट पाहत आहोत

पद्मावति's picture

25 Jul 2016 - 12:47 am | पद्मावति

हाही भाग मस्तं जमलाय. साधीशीच गोष्ट, पण तुम्ही इतकी खूपच छान खुलवताय की कधी पुढचा भाग येतोय अस वाटतं. अतिशय सहज सुंदर लेखनशैली.
पुढचे भाग लवकर येऊ द्या प्लीज़.

उडन खटोला's picture

25 Jul 2016 - 3:02 am | उडन खटोला

तुमची नसलेली तुमची कथा वाचायला मजा येत आहे.
पु भा प्र

खटपट्या's picture

25 Jul 2016 - 9:05 am | खटपट्या

धन्यवाद बाबा, पद्मावती आणि उडन खटोला...

असंका's picture

25 Jul 2016 - 9:08 am | असंका

छान गोष्टय हो!

क्रमशः वाचून वाचायचं टाळत होतो...पण मजा आली आत्ता सगळे भाग वाचल्यावर!

पुभाप्र..

संजय पाटिल's picture

25 Jul 2016 - 10:11 am | संजय पाटिल

छान चालू आहे .

धन्यवाद असंका आणि संजय पाटील.

श्रीरंग_जोशी's picture

25 Jul 2016 - 10:22 am | श्रीरंग_जोशी

प्रतिक्षेचे फळ मिळाले. हा भाग देखील उत्तम रंगलाय.

अरुण मनोहर's picture

26 Jul 2016 - 5:13 pm | अरुण मनोहर

छान जमली आहे. पुढचे वाचायला उत्सुक !

पैसा's picture

26 Jul 2016 - 5:57 pm | पैसा

छान!

स्रुजा's picture

26 Jul 2016 - 6:32 pm | स्रुजा

खटपट्या भौ, कथा अगदी छान रंगत चालली आहे. सत्यकथा आहे का? खुप च वास्तवाच्या जवळ जाणारी , सरळ साधी म्हणुन च भावणारी कथा आहे. पुढच्या भागांमध्ये अचानक लग्नच लागेल की काय असा एक प्रश्न मनात आला. :)

खटपट्या's picture

26 Jul 2016 - 8:01 pm | खटपट्या

सत्यकथा आहे का?

नाही नाही नाही

त्रिवार नाही म्हणालात म्हणजे नक्की काही तरी पाणी मुरतंय :P

उडन खटोला's picture

26 Jul 2016 - 9:06 pm | उडन खटोला

भुतेक ;)
http://misalpav.com/node/36178

हे तुम्ही असं करायला लागलात तर पुढचं लीवनार नाय मी हां

स्रुजा's picture

27 Jul 2016 - 1:13 am | स्रुजा

नको नको.. तुमचं सगळं लिवुन झालं का मंग आम्ही बोलू ;) गंमत सोडा पण लिहा हो !

उडन खटोला's picture

27 Jul 2016 - 1:59 am | उडन खटोला

हो हो. आणि कथानायक म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही तर आजोबा झालेले आहात हे आम्हास ठाऊक आहे.
-समवयस्क ;)

खटपट्या's picture

27 Jul 2016 - 2:48 am | खटपट्या

आजोबा ? व्हॉट रबीश.... :)

वाचताय ना रेवाक्का आणि यशो?

यशोधरा's picture

26 Jul 2016 - 6:43 pm | यशोधरा

होय तर! आत्याला सांगून टाकायची संधी का घालवली हो तुम्ही खटपट्या भाऊ? तुम्ही म्हणजे तुमच्या कथानायकाने हां..:D

मला तरी वाटतंय आत्या अचानक लग्न च लावुन देईल आपल्या कथानायकाचं ;) :ड मिस्टरी संपेल ब्वॉ तसं झालं तर.

खटपट्या's picture

26 Jul 2016 - 8:02 pm | खटपट्या

कथानायक तयार नाही अजून... :)

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2016 - 8:55 pm | टवाळ कार्टा

बदला रे...मेंटालिटी बदला...आत्याची नै...पोरींची ;)

खटपट्या's picture

26 Jul 2016 - 9:45 pm | खटपट्या

म्हंजे ?

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2016 - 9:28 pm | टवाळ कार्टा

म्हणजे त्या पोरीने चम्यासारखे त्याला झोपू दिले =))

खटपट्या's picture

27 Jul 2016 - 10:19 pm | खटपट्या

ओके आले लक्षात. पण मिपाला झेपणार नाही.

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2016 - 10:21 pm | टवाळ कार्टा

अर्रे...का नाही?? कोनाड्याची गरज नाहीये...मेन बोर्डावर सगळे खुलेपणाने लिहू शकतो ना

विडंबनाचे हक्क दीले तुम्हाला बस? घाला काय ता हैदोस...

उडन खटोला's picture

27 Jul 2016 - 10:52 pm | उडन खटोला

हैदोस?????????????

खटपट्या's picture

27 Jul 2016 - 11:11 pm | खटपट्या

त्यांना तेच हवेय ना...

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2016 - 11:15 pm | टवाळ कार्टा

फार चुकीचा समज :(

खटपट्या's picture

27 Jul 2016 - 11:18 pm | खटपट्या

ओके कशी वळवायची तशी वळवा...ओके ? चूकीच्या समजाबद्दल माफी...

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2016 - 11:27 pm | टवाळ कार्टा

माफी वगैरे कसली.... :)

हेमन्त वाघे's picture

29 Jul 2016 - 12:56 am | हेमन्त वाघे

मा चा क न ? रंभा ??????

मानवी चघळ लेला चोथा ??

ज्योति अळवणी's picture

26 Jul 2016 - 10:06 pm | ज्योति अळवणी

सगळे भाग आज आत्ता वाचले. खूप छान खुलवली आहेत गोष्ट. उत्सुकता वाढली आहे. लवकर पुढचा भाग लिहा

रातराणी's picture

27 Jul 2016 - 12:22 am | रातराणी

पु भा ल टा.

पीसी's picture

27 Jul 2016 - 3:07 pm | पीसी

खुप छान कथा.......पु. भा. लवकर लिहा.

अभ्या..'s picture

27 Jul 2016 - 4:38 pm | अभ्या..

मस्त जमलीय

धन्यवाद श्रीरंग, अरुण मनोहर, पैसाताइ, स्रुजातै, उडन खटोला, यशोधरा,टवाळ, ज्योती आलवणी, रातराणी,पीसी आणि अभ्या.

एस's picture

27 Jul 2016 - 10:27 pm | एस

पुभाप्र.

अभिजीत अवलिया's picture

27 Jul 2016 - 10:43 pm | अभिजीत अवलिया

नक्की कथा तुमची नाही ?

खटपट्या's picture

27 Jul 2016 - 10:46 pm | खटपट्या

नाय वो नाय....दमलो सांगून...

किसन शिंदे's picture

27 Jul 2016 - 10:51 pm | किसन शिंदे

फक्कड जमलीये कथा, सगळे भाग एकत्रच वाचले आता.

खटपट्या's picture

27 Jul 2016 - 11:11 pm | खटपट्या

धन्यवाद.

नीलमोहर's picture

27 Jul 2016 - 11:44 pm | नीलमोहर

छान चाललंय,
येऊ द्या पुढचा भाग लौकर.

निखिल निरगुडे's picture

28 Jul 2016 - 12:40 am | निखिल निरगुडे

मस्त लिहिताय... पुढील भागाची वाट पाहतोय..