कलाकारी

मयुरMK's picture
मयुरMK in मिपा कलादालन
3 Aug 2016 - 12:31 pm

dslr घ्याची खूप इच्छा होती घेतला एकदाचा. मी फोटोग्राफर नाही पण काही क्षण फोटोमध्ये बंदिस्त करायला आवडत मी यापूर्वी कधी dslr हातात सुद्धा घेतला नाही नेट वरूनच मी शिकतोय शिकता शिकता काही क्लीक केले आहे. काही एडिट केले आहेत . कसे आहेत ते सांगा . PicsArt_07-29-01.12.35 PicsArt_07-30-04.38.00 FB_IMG_14672970695680092 IMG_20160607_194957 IMG_20160701_183603 PicsArt_06-05-11.28.59 PicsArt_06-27-10.19.17PicsArt_07-01-11.37.08 PicsArt_07-01-11.41.51 PicsArt_07-02-09.47.06 PicsArt_07-21-11.36.02 PicsArt_07-24-11.04.01 DSC_0439 PicsArt_07-26-08.17.26 CSC_0492 DSC_0336

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Aug 2016 - 12:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजुन येऊ दे....

-दिलीप बिरुटे

मयुरMK's picture

3 Aug 2016 - 12:44 pm | मयुरMK

:) अजून चांगले फोटो देण्याच्या प्रयत्न करेन सर

मार्मिक गोडसे's picture

3 Aug 2016 - 12:44 pm | मार्मिक गोडसे

सध्यातरी पोस्ट प्रोसेसिंगपासून दूर रहा. DSLR कॅमेरातील सेटिंग निट समजावून घ्या व त्यावर प्रयोग करून कॅमेरान्रे अधिक चांगले फोटो काढण्याचा प्रयत्न करा.

धन्यवाद मार्मिक गोडसे :) आणि तास पण हे सर्व मोबाईल वर एडिट केले आहे फोटोशॉप अजून तर वापरलं नाही एडिट न करत पुढचे फोटो पोस्ट करेन

अहाहाहा,
सुरेख.
येउद्या अजून.

टवाळ कार्टा's picture

3 Aug 2016 - 2:03 pm | टवाळ कार्टा

जब्राट

स्पा's picture

3 Aug 2016 - 2:31 pm | स्पा

माईंडवाॅबलिंग वर्क

मला पण शिकवा ना

अभ्या..'s picture

3 Aug 2016 - 2:36 pm | अभ्या..

मला पण....
स्पावड्याला एकट्याला शिकविले तरी चालेल. मी त्याच्याकडून शिकेन.

उडन खटोला's picture

3 Aug 2016 - 3:12 pm | उडन खटोला

अरे ए, गप्प बसा कि.
जर्रा म्हणून प्रोत्साहन देत नाहीत ही पोरं. दुत्त दुत्त

अत्रुप्त आत्मा's picture

4 Aug 2016 - 9:16 pm | अत्रुप्त आत्मा

माईंडवाॅबलिंग वर्क

मला पण शिकवा ना

=)) हल कट पांडूऊऊऊऊऊऊ! =))

मी पण येणार पांडू बरोबर शिकायला! ;)

अहाहा!! किती ते पांडुप्रेम!!

नाही मी कसा शिकवणार स्पा भाऊ तुमचे फोटो पहिले मी खूप छान तुमच्याकडून शिकायचं आहे मला अभ्या भाउ धन्यवाद :)

संजय पाटिल's picture

3 Aug 2016 - 3:21 pm | संजय पाटिल

छान आहेत फोटो.. आवडले..

किसन शिंदे's picture

3 Aug 2016 - 3:26 pm | किसन शिंदे

त्या पहिल्या फोटोचं काय भरीत केलंय, अन् ते फोटोंमधले माॅडेल तुम्हीच का? लॅण्डस्केप तितके जमले नाही जितके पोर्ट्रेट जमलेत. वर मार्मिकरावांनी म्हटल्याप्रमाणेच म्हणतो, आधी कॅमेर्यातल्या सेटिंगकडे लक्ष द्या. पोस्ट प्रोसेसिंग काय आमचा स्पावड्याही शिकवेल तुम्हाला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Aug 2016 - 3:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसनदेवा, उत्साह घालविणारा प्रतिसाद वाटला, पण चालायचंच.

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

3 Aug 2016 - 3:41 pm | किसन शिंदे

चालायचंच.

अभ्या..'s picture

3 Aug 2016 - 3:46 pm | अभ्या..

नशीब किस्न्याने "मॉडेल तुम्हीच मग फोटो कुणी काढले?" हा प्रश्न विचारला नाही.
बाकी तसा किस्ना हुशार...

किसन शिंदे's picture

3 Aug 2016 - 3:55 pm | किसन शिंदे

=))

मयुरMK's picture

3 Aug 2016 - 5:06 pm | मयुरMK

धन्यवाद त्याला. double exposure म्हणतात आणि ट्रायपॉड आहे माझ्याकडे व माझ्या कॅमेरा vari-angle screen type आहे. व mi -l3 आहेच कि :)

हे नवीनच आहे तंत्र आमच्यासाठी.
धन्यवाद

संदीप डांगे's picture

3 Aug 2016 - 6:13 pm | संदीप डांगे

हो ना,
नेमकं कसं करतात हे डबल एक्स्पोजर?

मयुरMK's picture

4 Aug 2016 - 12:45 pm | मयुरMK

संदीप भाऊ http://www.digitalartsonline.co.uk/tutorials/photoshop/create-double-exp... इथे डबल एक्सपोजर बाबत सर्व उत्तरे मिळतील

संदीप डांगे's picture

4 Aug 2016 - 1:35 pm | संदीप डांगे

साहेबी भाषा झेपत नै हो, मऱ्हाटी लिवा, आम्हाला कळेल असं..☺

मी काय म्हन्तो भौ, येवढे फोटो टाकलेच हात तर त्या डबल एक्सपोजर येकांदा लेक पाडून टाका. समजंलशा भाशेमंदी!!

सूड's picture

3 Aug 2016 - 3:26 pm | सूड

फुलांचे फोटो आवडले.

प्रसाद भागवत १९८७'s picture

3 Aug 2016 - 5:27 pm | प्रसाद भागवत १९८७

कडक फोटो आहेत दादा अजून येऊ द्या कि फोटो ......

मयुरMK's picture

4 Aug 2016 - 12:29 pm | मयुरMK

प्रसाद भाऊ pc वर आहेत raw फोटो त्याचा डाटा घेऊन टाकेन इथे हे एडिट केले आहेत. धन्यवाद :)

प्रसाद भागवत १९८७'s picture

3 Aug 2016 - 5:28 pm | प्रसाद भागवत १९८७

प्रत्येक फोटो चे कॅमेरा चे सेटिंग पण सांगा

प्रचेतस's picture

3 Aug 2016 - 5:41 pm | प्रचेतस

अतिशय सुंदर फोटो.
येऊ द्यात अजून.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Aug 2016 - 9:13 pm | अत्रुप्त आत्मा

मी आगोबाशी सहमत आहे!

खटपट्या's picture

4 Aug 2016 - 10:36 pm | खटपट्या

मी बुवांशी सहमत आहे!

किसन शिंदे's picture

4 Aug 2016 - 11:23 pm | किसन शिंदे

बुवा स्पावड्याशी सहमत आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Aug 2016 - 11:45 pm | अत्रुप्त आत्मा

=))

मुक्त विहारि's picture

3 Aug 2016 - 5:53 pm | मुक्त विहारि

मस्त.

खटपट्या's picture

4 Aug 2016 - 5:38 am | खटपट्या

छान

चौकटराजा's picture

4 Aug 2016 - 6:26 am | चौकटराजा

आपला फोटोग्राफीकडे पहाण्याचा दॄष्टीकोन एकदम वेगळा आहे. तो ग्राफिक आर्ट च्या जवळ जाणारा आहे. मस्त मस्त देखावे, सूर्र्यास्त ,क्लोजप्स वगैरे नेहमीच्या पेक्षा वेगळा . मस्त प्रयत्न. या प्रयत्नाना ग्राफिक आर्टचा चष्मा लावूनच पाहिले पाहिजे.

मयुरMK's picture

4 Aug 2016 - 12:38 pm | मयुरMK

धन्यवाद चौकटराजा :) व सर्वाना धन्यवाद मी आणखीनत आणखी चांगले फोटो देण्याचा प्रयत्न करेन

नीलमोहर's picture

4 Aug 2016 - 12:39 pm | नीलमोहर

सरावाने अजून चांगले जमेल.
ग्राफिक आर्ट प्रकाराची आवड असल्यास त्याचीही प्रॅक्टीस, अभ्यास करा. इंटरेस्टिंग विषय आहे तो.

सर्व फोटो संदर आहेत.आता एडिट केलेल्या फोटोंनाही महत्त्व येऊ लागले आहे.तुला dslr आणि पोस्ट प्रसेसिंग दोन्हीही जमलं आहे.आणखी नवीन शिकण्याची गरज नाही.हौशी /व्यावसायिक कोणते आवडीचे आहे ते क्षेत्र निवड.सध्या फोटो स्टॅारीला अधिक महत्त्व आहे.दिलेल्या विषयाला समर्पक फोटो देणे याकडे लक्ष द्यावे लागते.

Bhagyashri satish vasane's picture

4 Aug 2016 - 4:59 pm | Bhagyashri sati...

छान आलेत फोटो, आवडले

पैसा's picture

4 Aug 2016 - 5:10 pm | पैसा

मोबाईलवरच्या फोटो एडिटिंग अ‍ॅप्सनी खूप चांगला परिणाम मिळत नाही वाटते. आधी प्रोसेस न केलेला फोटो आणि त्यासोबत एडिट केलेला फोटो असे इथे देऊन बघा त्याबद्दल लोक काय म्हणतात. तुम्हाला चित्रविषय बघायची दृष्टी आहे. एडिटिंग सावकाशीने शिकून घ्या. एस ची फोटोंबद्दल सुंदर लेखमालिका इथे मिपावर आहे. फोटो स्पर्धांचे अनेक जुने धागे आहेत. स्पाने एक दोन लेख लिहून फोटोशॉप शिकवायला सुरुवात केली होती. मग ती मालिका कुठे गेली त्यालाच माहीत.

अभिजीत अवलिया's picture

6 Aug 2016 - 6:19 pm | अभिजीत अवलिया

पहिले 2 फोटो आवडले. फोटो एडिट करताना त्याचा मूळ गाभा हरवणार नाही ह्याची काळजी घ्यावी असे माझे मत आहे.

उदाहरण द्यायचे झाले तर - बरेच लोक धबधब्याचा फोटो काढताना फिल्टर्स वगैरे वापरून एकदम स्मूथ पाणी दाखवतात. असे फोटो बघताक्षणी खोटे आहेत हे समजते. निसर्ग दाखवताना जसा आहे तसा दाखवावा. तुम्हाला तो कसा दिसावा असे वाटते तसा नाही.

फोटोशॉप / लाईटरूम पासून दूर राहिलात तर उत्तम.

संदीप डांगे's picture

7 Aug 2016 - 11:11 am | संदीप डांगे

स्मूथ पाणी फिल्टर ने नव्हे तर शटर स्पीड (एक्स्पोजर टाइम) ने करता येते,

कलाकाराला काहीतरी वेगळं जाणवत असते, इतरांशी शेअर करावेसे वाटते. स्मूथ पाणी हा खोटेपणा नाही. फक्त नजरेचा दोष आहे, अन्यथा सत्यात तर पाण्याचा प्रत्येक थेम्ब वेगळा कोसळत असतो!

अभिजीत अवलिया's picture

7 Aug 2016 - 4:53 pm | अभिजीत अवलिया

ऊप्स. स्वारी. 50 कामे एका वेळी करत बसले की असे होते.

थोडे अवांतर -
कलेच्या बाबतीत प्रत्येकाने नवीन काहीतरी केले तरच कला पुढे जाईल हे मान्य.
पण फोटोग्राफीच्या बाबतीत व्यक्तीची फोटो काढण्याच्या कलेत प्रगती होणे अपेक्षित असावे. जसे की फ्रेमिंग, कंपोसिंग किंवा काहीतरी नवा विषय घेऊन त्याची मांडणी.
पण ह्या ऐवजी जर फोटोशॉप वापरण्यात प्रगती झाली तर व्यक्ती चांगला फोटोग्राफर झाली असे कमीत कमी मला तर वाटणार नाही.