मळमळ

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
10 Nov 2016 - 10:33 pm

रोजचा पेपर
कुठले कुठले लेख
पुस्तकं
मॅगझीनस्
ईंटरनेटवरचं मटेरीअल
सग्गळं आपल्याला झेपणा-या परीघात
.
.
.
काढ टिपणं
मार स्टॅटस् तोंडावर
फेसबुक वर नोटस्
व्हाॅटस् अप वर पोस्टस्
लिहीता येतंय, लिहीता येतंय
लाव धडाका
.
.
मिळेल त्यावर टीका
सेफ टार्गेटस् शोधायची
कॅबीनेट मिनिस्टर्स वगैरे
नगरसेवक डेंजर, येऊन मारू शकतो
किंवा हवेत बाण सोडायचे
समाज-बिमाज, शिक्षण व्यवस्था, पोलिस वगैरे
गेला बाजार जुने दिवस, बालभारती, संस्कृती
अगदीच काही नाही सुचलं तर

मुक्त कविताकविता

कधी वाटते

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
9 Nov 2016 - 11:21 pm

कधी वाटते तिच्यासाठी जगावे..
तिच्या कुशीतच अलगद मरावे..
कधी वाटते तिची बडबड ऐकावी..
तिची स्वराक्षरे कानी ठसावी..
कधी वाटते तिचा सोबती व्हावे..
चांदण्या रातीत तीला चंद्रापाशी न्यावे..
कधी वाटते तिला खूप काही शिकवावे..
तिनेही प्रेमाने मला दोन शब्द ऐकवावे..
कधी वाटते माझ्या कवितेत ती असावी..
माझ्या प्रेमाची छबी तिच्या हृदयी फसावी..
कधी वाटते ती असावी माझी सोबती..
तिनेही स्वीकारावी माझी अल्लड प्रिती..

कविताचारोळ्याप्रेमकाव्य

एक तू

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
9 Nov 2016 - 7:39 pm

मुरलीधर बन्सीधर
प्रेमसागर तू मनोहर
शामघन हरिहर
गोपाल तू भोळा

किसन तू मनमोहन
गिरिधर भाविकांचा
द्वारकाधीश नृपवर
माखनचोर गोपिकांचा

रूक्मिणीच्या वरा
तू यशोदरचा कान्हा
मीरेचा राणा
राधेच्या मोहना

स्त्रिमनाचा वेध
फ़क्त तुलाच जमेल
म्हणून 'नौछावर'
प्राण केले तुझ्यावर

कविता माझीकविता

गेम (शतशब्दकथा)

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
9 Nov 2016 - 3:37 pm

दुपारपासंनच शंकऱ्या आणि बाप्या पवळंमागच्या रूईटीच्या आडोशाने त्याच्या पाळतीवर होते. त्याला उचलताना कोणीही आजूबाजूला नसेल याचीही खबरदारी त्यांना घ्यायची होती. तो एवढासा जीव बागडत होता.

चारला अब्दुल्या काम थांबवून बाजेवर निजला. घरातूनही हालचाल जाणवेना. शंकऱ्याने बाप्याला खुणावले. बाप्या कापऱ्या आवाजात कुजबूजला, "अब्दुल्या उठला तर ठिवायचा न्हाय!"

पोत्याने कितीही धडपड केली तरी दोघांचे सुसाट पाय थांबणार नव्हते. गावाला वळसा घालून ते दुसऱ्या टोकाला रियाजच्या खोपटावर आले. पुरावे नष्ट करण्यासाठीची सर्व तयारी त्याने केलेलीच.

वाङ्मयकथासाहित्यिकkathaaमौजमजाअनुभवविरंगुळा

गोष्ट एका लग्नाची ...

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
9 Nov 2016 - 12:02 pm

गोष्ट एका लग्नाची ...
निंबाच्या सावलीत म्हातारबा म्हंजी माझं आजोबा , गावातल १-२ भावकीतील पांढरे टकुरे मी सोत्ता न माझा एक मित्र अशे आम्ही ४-५ जण यष्टीची वाट पाहत थांबलो होतो ,आता का बर? असा प्रश्न पडलंच तुम्हाला. तर म्याच सांगतो पैलेच, तर तर .. आम्ही चाल्लो होतो पोरगी पहायला !!!! माझ्याचसाठी :)
त्यात आमच्या गावातल्या यष्टीचा कारभार बेभरवशी, आली तर आली नई तर नई.

हे ठिकाणआस्वाद

ती....

Jabberwocky's picture
Jabberwocky in जे न देखे रवी...
9 Nov 2016 - 10:16 am

ती फुलंराणी,
सुगंध वेचणारी.
ती स्वच्छंदी,
आनंद उधळणारी.
चंद्रताऱ्यांचं वेड तिला,
ती माझं आभाळ उजळवणारी.
ती पणती,
अंधार गिळणारी.
ती अबोली अबोल,
पण मनातले भाव टिपणारी.
ती थंड झुळूक वाऱ्याची,
नभाला पाझर फोडणारी.
ती मोती शिंपल्यातला,
ती अथांग सागर प्रेमाचा,
ती गुलमोहर,
ती रानफुलं,
ती सोनाली,
ती सोनफुलं.....

(Dedicated to my wife)

प्रेमकाव्य