ती फुलंराणी,
सुगंध वेचणारी.
ती स्वच्छंदी,
आनंद उधळणारी.
चंद्रताऱ्यांचं वेड तिला,
ती माझं आभाळ उजळवणारी.
ती पणती,
अंधार गिळणारी.
ती अबोली अबोल,
पण मनातले भाव टिपणारी.
ती थंड झुळूक वाऱ्याची,
नभाला पाझर फोडणारी.
ती मोती शिंपल्यातला,
ती अथांग सागर प्रेमाचा,
ती गुलमोहर,
ती रानफुलं,
ती सोनाली,
ती सोनफुलं.....
(Dedicated to my wife)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1217
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाहवा!!
खूप आवडली कविता,
धन्यवाद :)
In reply to खूप आवडली कविता, by नीलमोहर
सुंदर कविता