काटा रुते कुणाला…..भाग ४

Jabberwocky's picture
Jabberwocky in जनातलं, मनातलं
8 Nov 2016 - 10:36 am

काटा रुते कुणाला…..भाग ३ http://www.misalpav.com/node/37949

आई नेहमी मला आणि रेवाला अशीच चिडवत असे. तिलाही रेवा फारच आवडत असे. का नाही आवडणार रेवा होतीच तशी. ती ज्यांच्या संपर्कात येत त्या लोकांवर तिच्या व्यक्तित्वाची अशी छापच पडायची.
या क्षणी मला रेवाशी बोलायचं नव्हतं पण आईसमोर असल्यामुळे मला तिच्याशी बोलणं भाग होत. मी बाहेरच्या हॉल मध्ये जायला निघालो तशी आई म्हणाली व्यवस्थित बोल तिला. कदाचित आईने ओळखलं असावं कि माझं डोकं बिक काही दुखत नाहीये आणि हे काहीतरी वेगळं दुखणं आहे.
मी हो म्हणालो आणि हॉल मध्ये आलो.
मी रिसिव्हर कानाला लावला.
हॅलो. मी
हाय, किती वेळ लावायचा फोनवर यायला? काय करतोयस? रेवा
झोपलो होतो. मी
माझ्याशी बोलल्याशिवाय? असं कसं करू शकतोस. रेवा लाडात येत म्हणाली.
ही मुलगी इतकं होऊनही कशी शांत वागू शकते. इथे माझा जीव चालला होता आणि हिला काहीच फरक पडत नव्हता. असं एक विचार माझ्या मनात येऊन गेला.
काय म्हणतीय मी. रेवा पुन्हा बोलली.
अरे हो ते कसं शक्य आहे, माझी इच्छा असो व नसो मी तुझ्याशी बोलायला पाहिजेच नाही का. इतका वेळ मनात साठलेला राग आता बाहेर पडायला सुरुवात झाली.
काय झालं असं का बोलतो आहेस. रेवा
काही नाही, माझी तब्येत ठीक नाहीये. मी
खरंच का? रेवा
हो. मी
तू ठीक तर आहेस ना सागर. तिचा कातर आवाज मला जाणवत होता.
तुझी तब्येत ठीक नाही ना, ठीक आहे मग थांब थोडा वेळ मी येते आपण डॉक्टरांकडे जाऊयात. चालेल? रेवा म्हणाली.
नाही त्याची काही गरज नाही. थोडी झोप काढली कि ठीक होईल. मी तिच्याशी शक्य तितक्या रुक्षपणे बोलत होतो.
मला रागाचा आणखी एक झटका आला.
तू माझी इतकी काळजी करत जाऊ नकोस, मला घेता येते माझी काळजी. मी म्हणालो.
ती काहीच बोलली नाही. ती दुखावली गेली.
मी पुढे बोलू लागलो. मला माहित आहे आपण सो कॉल्ड बेस्ट फ्रेंड्स आहोत आणि आता मला वाटायला लागलाय की आपण एकमेकांमध्ये गुंतत चाललो आहोत. हे योग्य नाहीये रेवा, खासकरून तुझ्यासाठी. एक ना एक दिवस आपण वेगळे होणार आहोत. आणि तेंव्हा आपल्याला त्रास होईल. त्याआधीच आपण आपल्या सवयी बदलल्या तर फार बरं होईल असं मला वाटत.
हो का? आणि हे माझ्यासाठीच का योग्य नाही असं तुला वाटत. तुला काय झालाय नक्की?

मला काही झालेलं नाही. पण मी पुढचा विचार करतोय रेवा. आणि हे तुझ्यासाठी चांगलं नाही कारण तुला माहित आहे मला खूप सारे मित्र आहेत त्यांच्यात मला स्वतःला नीटसा वेळ मिळत नाही. त्यामुळे मला तुझी उणीव फारशी भासणार नाही. आणि हो तू मला ओळखतेस मी एकदा कुणाशी नातं तोडलं की परत मागे वळून त्या व्यक्तीकडे पुन्हा पाहत नाही. आणि हे माझ्यासारख्या पाषाण हृदयी माणसाला सहज शक्य आहे जरी ती व्यक्ती तू असलीस तरीही. पण तुझ्यासाठी हे सगळं इतकं सहज नसेल रेवा. तुला फारच कमी फ्रेंड्स आहेत. आणि जे आहेत ते कसे आहेत हे आपल्या दोघांनाही चांगलच ठाऊक आहे. तू जेंव्हा जेंव्हा एकटी पडशील तेंव्हा तेंव्हा तुला माझी उणीव जाणवेल आणि तो त्रास तुला सहन नाही व्हायचा. म्हणूनच म्हणतोय आत्तापासूनच तू माझ्यापासून लांब रहा. ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतील त्यांच्यापासून दूर गेलेलंच बरं.
मी एका दमात कसलाही विचार न करता हे बोलून गेलो.

तू आज असा का वागतोयस? तुला कुणी काही म्हणाल का? रेवा आता रडायची बाकी राहिली होती.
कारण मला यापुढे त्रास नको आहे. मी
कसला त्रास? माझं काही चुकलंय का? रेवा
मला माहित नाही. पण बस आता थांबलं पाहिजे इथे. मी निश्चयाने म्हणालो.
असं नको रे बोलूस त्रास होतो मला. रेवा

मी पुढे काहीही न बोलता फोन ठेऊन दिला. आणि त्याचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवला कारण मला माहित होत ती पुन्हा फोन करणार. खरतर तिच्याशी आज मी जितकं कटू बोललो तस मी कधीच तिला बोललो नव्हतो. मी नेहमीच तिची खूप जास्त काळजी घ्यायचो. पण जाऊदे आता नकोच तिचा विचार करायला. तिच्याशी बोलायलाही नको असं मनाशी ठरवत मी पुन्हा माझ्या बिछान्यावर मला झोकून दिल. पण काही केलं तरी माझं तिच्यावरच प्रेम थोडच कमी होणार होत आणि मी थोडंच तिला विसरू शकणार होतो.
असंख्य त्रासदायक विचारांचं पांघरून घेऊन मी केंव्हा झोपी गेलो ते माझं मला कळलं नाही.

कथा

प्रतिक्रिया

शान्तिप्रिय's picture

8 Nov 2016 - 3:33 pm | शान्तिप्रिय

छान कथा

महासंग्राम's picture

8 Nov 2016 - 4:31 pm | महासंग्राम

भारी सुरुये कथा.... पुभाप्र