व.. व... व्हिडिओचा! ऊर्फ मिपा फिल्लम इन्स्टिट्युट!

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in जनातलं, मनातलं
18 Nov 2016 - 12:51 am

राम राम!

तर आता आपलं मिपा युट्युब चॅनल सुरु झालेलं आहे. आणि त्यावर दंगा करायला नवा उपक्रमही येत आहे. पण सर्वात मोठा प्रश्न अनेकांना आहे की हे व्हिडिओ बनवायचे कसे?!

काही नाही हो.. इयत्ता दुशली ब चा कार्यानुभवचा वर्ग आहे!

आम्ही मिपा युट्युब चॅनलवर अजुन दोन व्हिडिओज आणलेत.

१. सेक्स चॅट विथ पप्पु अ‍ॅण्ड पापा ह्या लेखाचं व्हिडिओ आर्टिकल
२. हा व्हिडिओ विंडोज मुव्ही मेकर मध्ये कसा बनवला ह्याची झलक

कथामाहिती

टपली अन टिचकी.

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
17 Nov 2016 - 11:05 pm

गिरीश कुबेर ह्या माणसाबद्दल आपल्याला लई आदर.(होता) त्याची सगळी पुस्तक अगदी घरी घेऊन वाचली. “एका तेलियाने” , “हा तेल नावाचा इतिहास आहे” , “हे युद्ध जीवांचे” “अधर्म युद्ध” ते अगदी हल्ली आलेले “टाटायन”. एकसो एक भारी पुस्तक. मराठीत तरी तेल आणि त्याच्या संघर्षाच्या इतिहासाबद्दल इतर कुणीही काहीही लिहिलेले मला माहित नाही. भाऊने आचार्य रजनिशांची जी बिन पाण्याने केली ते पाहून आपण खुश, माणूस समाजवादी. म्हणजे तसे आपण समाजवादी नाही पण एकंदरीत समाजवाद्यांचे विचार अगदी सगळे नाहीतरी बऱ्याच प्रमाणात आपल्याला पटतात.

मांडणीविचार

गेले.. द्यायचे राहुनी तुमचे 500 शें चे ते ऒझे

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
17 Nov 2016 - 5:56 pm

ढिश्श- क्लेमर! :- एका फाइव्हस्टार देऊळाच्या एका 'सेवक' भटजीची सद्य:~कालीन व्यथा! ;)

गेले.. द्यायचे राहुनी
तुमचे 500 शें चे ते ऒझे
माझ्या माळ्यावरी.. आ.. त,
करं-कचून बांधलेले..!

आलो होतो देवळात मी
काहि अभिषेकांसाठी फक्त
वर्षाचे "झाले किती???"
पाचशे पाचशे शोषिती रक्त

अडिच लाखा चा दगड
लावलाय त्यांन्नी सेह्विंग्ज ला
बाकीच्यांचे निर्माल्य
काहि.. शे-कोटिंचा पाचोळा!
================
मूळ गीतकार, गीत - आरती प्रभु

आगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीजिलबीबालसाहित्यभूछत्रीहास्यविडंबनसमाजजीवनमान

बोट - आयजीच्या जिवावर बायजी उदार

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
17 Nov 2016 - 2:31 pm

ही घटना बोटीवर घडलेली आहे. मात्र ती कुठेही घडू शकली असती आणि त्याचे परिणाम तितकेच तीव्र होऊ शकले असते.

मी बोटीवर थर्ड इंजिनियर होतो. एका मालवाहू बोटीवरच्या लोकांची संख्या हल्ली पंचवीसच्या आसपास असते. तेव्हां ती पंचेचाळीस असायची. इंजिनरूममध्ये काम करणार्या खलाशांचा एक म्होरक्या असायचा. त्याला ‘इंजिन सारंग’ म्हणत. आमचा इंजिन सारंग कोकणातला होता. वय साधारण पंचावन्न वर्षं.

तेव्हां इ मेल वगैरे नव्हते. पत्रानीच बातम्या कळायच्या. एका पत्रात त्याला त्याच्या आईचं देहावसान झाल्याची बातमी कळली.

कथाप्रवासलेखअनुभवविरंगुळा

घाटलं!!

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
17 Nov 2016 - 12:42 pm

गौरी गणपतीला, शेतकापणी झाल्यावर मूगवणीला तसेच कोकणात बय्राच सणांना घाटलं करायची पध्द्त आहे. नेहमीचेच पदार्थ वापरून केलेला अजून एक चविष्ट पारंपारीक प्रकार!
साहित्यः
अर्धी वाटी तांदळाचा रवा, एक वाटी गूळ, एका नारळाचे ओले खोबरे (यातले अर्धी वाटी तसेच वापरायचे आहे आणि बाकीच्याचे दूध काढायचे आहे.), चार वाट्या पाणी, वेलची पावडर, सुंठ पावडर एक चमचा, हळद पाव चमचा, मीठ आणि केशर, एक चमचा तूप.
ghatla

सुट्टीच्या कल्पना

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
17 Nov 2016 - 12:19 pm

सुट्टी हा तसा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय . लहान असताना आतासारख्या छोट्या छोट्या नाही तर चांगल्या मोठ्या सुट्ट्या असत . एकदा सुट्टी पडली की डायरेक्ट १२ जून ला परत घरी. आता कामातून तासभर जरी सुट्टी मिळाली तरी बरं वाटतं :)) तर सांगायचा विषय काय प्रत्येकाचीच सुट्टी कुठे ना कुठे तरी गेलेली असते.माझीही गेली कधी कोकणात कधी पुण्यात कधी साताऱ्यात, कोल्हापूर तर दस्तुरखुद्द आमचंच गाव त्यामुळे ते तर आलंच. ह्या ठिकाणांवर बरंच काही लिहिलं आहे .पण मला सर्वात सुट्टीत जायला आवडायचं ते बदलापूर आणि कर्जत ला .बदलापूर व्हाया मुरबाड ते कर्जत अतिशय समृद्ध प्रदेश आहे हा.

वावरप्रकटन

डिमॉनेटायझेशन (भाग १)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
17 Nov 2016 - 12:05 pm

----------
भाग १ | भाग २ । भाग ३ । भाग ४ |भाग ५
----------

प्रस्तावना

ही प्रस्तावना लिहिण्याचे कारण या लेखनावर येऊ शकणारे काही संभाव्य प्रतिसाद आहेत. संकल्पनांविषयी कुठलीही चर्चा सर्वांना मनपसंद होईल, पूर्णपणे पटेल अश्या स्वरूपात करणे अशक्य असते असा माझा शिक्षणक्षेत्रातील गेल्या २० वर्षांचा अनुभव सांगतो. प्रत्येकाचे पूर्वग्रह आणि आकलन निराळे असते. मी त्याचा आदर करतो. आणि माझी जबाबदारी, संकल्पना तिच्या शुद्ध स्वरूपात तिच्या योग्यायोग्यतेबाद्ल टिप्पणी न करता मांडण्याची आहे, असे मानून चालतो.

अर्थकारणविचार

शूर नेते

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
17 Nov 2016 - 12:00 pm

(चाल : शूर आम्ही सरदार अम्हाला काय कुणाची भीती)

नेते आम्ही शूरवीर अम्हाला काय मोदींची भीती..
देव देश अन धर्म विसरूनी खेळू अंध ती निती..

भ्रष्ट सानिध्यात उमगली भ्रष्टाचारी रित..
खुर्चीवर जे बसवले आम्हा जडली येडी प्रित..
लाख पैसे ते चोरून नेईल अशी शक्ती या हाती..
देव देश अन धर्म विसरूनी खेळू अंध ती निती..
नेते आम्ही शूरवीर अम्हाला काय मोदींची भीती..

कविताविडंबनविनोदराजकारण