अमर - कथा
"आर..जा..र भाड्या, म्या काय लगच मरत नाय.संमद्यांना घालुन मरीण,म्या अमर हाय". केश्याच्या बाप बसल्या जागी किरकीरला.
*****************************************************************************************
.केश्याचा बाप गावचा मांत्रीक होता. आखा गाव त्याच्या कड याचा, भुत्,भानामती की सर्दी ,पडसं गाव वाल्याला मात्रींका शिवाय पर्याय नव्हता.
केश्याच्या बापाला पाच वर्षापुर्वी अंगावरन वार गेलत्,बाप बसल्या जागीच सगळ करायचा,कुणी गावातल सकुन बगायला आल की केश्याच काम असायच बापाला देवी म्होर नेऊन ठेवायच.बाप बसल्या जागी घुमायचा.
घराच्या किंमतीत ३०% घट ? मदत हवी आहे
मी महिन्या पूर्वी ठाण्यात हायलँड हेवन या ठिकाणी वन बीचके बुक केलाय, आता अश्या बातम्या येऊ लागल्यात कि घराच्या किंमती कमी होणार आहेत म्हणून काय करावे सुचत नाही. कृपया तज्ञ मंडळी कडून या विषयावर मदत हवी आहे.
.
घराची किंमत ५३ लाख + पार्किंग + २ वर्षाचा मेंटेनन्स + क्लब आणि इतर धरून ७४ लाखाला पडलाय.
अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही, बुकिंग ८०-२० स्कीम मध्ये केलेले आहे. आता १४ लाख सुरुवातीला भरले आहेत. बाकी ६० लाख घर ताब्यात मिळाल्यावर २०१९. अजून बिल्डिंग चे काम सुरु झालेल नाही.
काय करणे योग्य ठरेल; कृपया तज्ज्ञ मिपाकरानी आपले बहुमोल मार्गदर्शन करावे.
धन्यवाद
विदाऊट अ ट्रेस - १ - लॉस्ट कॉलनी
Without A Trace
अनादी अनंत कालावधीपासून मानवाला अज्ञात प्रदेशाचं कायम आकर्षण राहीलेलं आहे. जास्तीत जास्तं भूमीवर आपलं स्वामित्वं प्रस्थापित करावं ही सहज मानवी प्रवृत्ती हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. इसवीसनापूर्वीपासूनच भूमध्य समुद्राच्या सान्निध्यात ग्रीक आणि इजिप्शियन संस्कृती पूर्णत्वाला पोहोचलेल्या होत्या. पूर्णत्वास गेलेल्या या संस्कृतींना नित्यनवीन प्रदेशाची आस होतीच! अलेक्झांडरने भूमध्य समुद्र ओलांडून पर्शियन साम्राज्य काबिज करुन भारतावर केलेलं आक्रमण या विस्तारवादी मनोवृत्तीचाच परिपाक होता.
न्यूरेम्बर्ग - भाग १
न्यूरेम्बर्ग - भाग १
न्यूरेम्बर्ग खटल्यांबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते चालवले गेले हीच आहे. दुसरं महायुद्ध हे इतिहासातलं सर्वात संहारक युद्ध होतं. त्याच्या शेवटी विजेते आणि पराभूत हे दोघेही प्रचंड थकलेले होते. युरोपची दुर्दशा झाली होती. जर्मनी जवळपास पूर्णपणे उध्वस्त झाला होता. तिथले बहुसंख्य नागरिक उपासमार आणि रोगराई यांचा सामना करत होते. त्याचमुळे दोस्त राष्ट्रांनी एक न्यायासन निर्माण केलं, त्यावेळी हयात असलेल्या सर्व उच्चपदस्थ नाझींना त्याच्यासमोर उभं केलं, खटला चालवला आणि हे सर्व युद्ध संपल्यानंतर एका वर्षाच्या आत घडलं, हीच मुळात एक अविश्वसनीय गोष्ट होती.
प्रवास ५
दोघे एकमेकांसमोर बसले होते. अश्रफ कसल्यातरी विचारात गुंग होता. आशुतोष त्याच्या विचारांचा रोख कुठे आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत होता. समोर टेबल वर नकाशे, पेनं पडलेली होती. अनेक कागदांवर कच्या स्वरूपात वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी लिहिलेलं दिसत होतं. आशुतोष त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होता पण त्याला काही ते जमत नव्हतं.
"मी सांगितलेली कामं खरंच करू शकशील का तू?" अश्रफने आशुतोषला विचारलं.
""अर्थात, पण आधी काय चाललंय ते कळू तरी दे मला"
(फक्त) ऑफिस ला पर्याय...
नमस्कार मिपाकरहो !
कृपया मला कुणी (फक्त) ऑफिसला साजेसा पर्याय सांगेल का?
अवतीभवती अशी बरीचशी माणसे आहेत ज्यांना तिथे काम करणे आवडत नाही आणि उपाशी राहणेही योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय माहित असल्यास सुचवावे.
धन्यवाद.
शंभो
जोगव्यानं त्या सकाळी गहिरे रंग भरले होते. मुग्धाळला पहाट गारवा उष्ण तांबूस किरणांत निथळत होता. पाणवठ्यालगत गुलाब ताटव्यांचे राज्य होते. मंत्राग्नी पुटपुटत त्याने हवनकुंडात स्निग्ध सोडला. उठून एकवार त्या महान तेजोवलयाकडे पाहिले.
"बस्तीर" कमलपात्राच्या जलधारा हातावर सोडत तो उद्गारला.
सेवकानं वाकून मानाचा मुजरा केला.
"एक ऊफाळता चहा"
समाधीवस्थेत जोगव्याने सिंहासन ग्रहन केले. एक पाय उकिडवा सोडत तो गरजला,
"नाउ"
खलित्यावरील राजमुद्रा उठून दिसत होती. दरबानानं तेजोवलय भडकवले.
"हिकडं येक कटींग.."
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?
गाभा: माझ्या एका मित्राला तू महाराष्ट्राच्या राजकारणात का जात नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the maraathaa , by the maraathaa, for the maraathaa" आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे ,
उदा .
१) महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुतेक आमदार मराठा आहेत .
२) मंत्रीमंडळात मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , पुणे किंवा पार्ले येथील भाषा क्वचित असते .
मायक्रोसॉफ्ट ऑफिस ला पर्याय...
नमस्कार मिपाकरहो !
कृपया मला कुणी मायक्रोसॉफ्ट ऑफिसला साजेसा पर्याय सांगेल का?
अवतीभवती अशी बरीचशी माणसे आहेत ज्यांना ते विकत घेणे परवडत नाही आणि पायरेटेड वापरणे योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय माहित असल्यास सुचवावे.
धन्यवाद.