जोगव्यानं त्या सकाळी गहिरे रंग भरले होते. मुग्धाळला पहाट गारवा उष्ण तांबूस किरणांत निथळत होता. पाणवठ्यालगत गुलाब ताटव्यांचे राज्य होते. मंत्राग्नी पुटपुटत त्याने हवनकुंडात स्निग्ध सोडला. उठून एकवार त्या महान तेजोवलयाकडे पाहिले.
"बस्तीर" कमलपात्राच्या जलधारा हातावर सोडत तो उद्गारला.
सेवकानं वाकून मानाचा मुजरा केला.
"एक ऊफाळता चहा"
समाधीवस्थेत जोगव्याने सिंहासन ग्रहन केले. एक पाय उकिडवा सोडत तो गरजला,
"नाउ"
खलित्यावरील राजमुद्रा उठून दिसत होती. दरबानानं तेजोवलय भडकवले.
"हिकडं येक कटींग.."
काळ गोठावला होता. राजधानीची चारी चक्रे रुतून बसली होती. अमृततीर्थाने भरलेले ते कमंडलू सेवकाने अलगद पकडले.
"टायर पंम्चर झाला कारं गाड्याचा?" तीर्थप्राशन करताना जोगव्यानं कळीचा मुद्दा मांडला.
***
काळंनिळं आभाळ. कपारीतले खेकडे. शेकोटीला लाकडे. "शंभो". दगडाखालची नांगी हातात धरत एकजण ओरडला.
"घावला का इंचू?"
नर्मदेतीरी अखेर निम्नतंद्रीतल्या साधकाला कंठ फुटला.
***
मरणाच्या थंडीत ते बेवडं कुडकुडत जागं झालं. चप्पल पायात घालून कसबसं झोकांड्या खातंच उभं राहीलं. गल्लोगल्लीची कुत्री भुंकत होती. एवढ्या पहाटेचा तो वायझेड माणूस ओढ्यात आंघोळ करत बसला.
"हरी ओम" शेवटची बाटली रिकामी करुन त्याने रस्त्यावर फेकली.
पाय लटपटत होते. बीडी भिजून गेेेली होती.
"हरी ओम माऊली. झोप झाली का?" वस्तादनं त्याला फाट्यावर मारला.
"आराम. राम कृष्ण हरी. कपभर घ्या. हरी ओम." फळकुटावर बसताना ते बेवडं पाय घसरुन पडलं. त्याला सुद नव्हती. काळ्याबिंद्र्या धोतऱ्यानं मटकुळं करुन त्याला खुर्चीत कोंबला.
तीनशेवीस चारशे. बनारस बिगर ईलायची. "एक गिलास हिकडं" तोंडातला मावा थुकत वस्ताद म्हणाला.
"बस्तीर"
पहिल्या धारंचं एंडरेल. काळे बुडबुडे. गावठी. धोतऱ्यानं गिलास भरला.
"टायर पंम्चर झाला कारं गाड्याचा?" दोन पेग झाल्यावर ते बेवडं बराळलं.
वाचने
6362
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय प्रतिभा आहे! धन्य.
अगदी
In reply to काय प्रतिभा आहे! धन्य. by एस
अगदी २
In reply to अगदी by प्रचेतस
+१
In reply to अगदी २ by चांदणे संदीप
हा मनुष्य
In reply to +१ by बोका-ए-आझम
भारी !!!!!!!
लिहित राहा भो.
कोणी समजावेल का मला हे काय
+1 मला पण समजला नाही.
In reply to कोणी समजावेल का मला हे काय by टवाळ कार्टा
या पामराला कोणी समजावून
In reply to कोणी समजावेल का मला हे काय by टवाळ कार्टा
या पामराला कोणी समजावून
In reply to कोणी समजावेल का मला हे काय by टवाळ कार्टा
मुग्धाळला पहाट गारवा उष्ण तांबूस किरणांत निथळत होता.
मुग्धाळला पहाट गारवा उष्ण तांबूस किरणांत निथळत होता.
मुग्धाळला पहाट गारवा उष्ण तांबूस किरणांत निथळत होता.
तूम्हाला एकदा भेटण्याची जबर
भारी प्रकरण आहे ....
विंचुच्या चाव्याने नशा करायची
इंगळीची नशा ... ? !
In reply to विंचुच्या चाव्याने नशा करायची by अश्फाक
खरच अज्जीब्बात कळलं नाही हो
जव्हेर सेहत केलिए तूं तो
काहीही श्ट्ट कळाले नाही .
दिलासा
म ला प ण का ही क ळ ले ना ही.