प्रवास ४

जॉनी's picture
जॉनी in जनातलं, मनातलं
11 Nov 2016 - 10:48 pm

प्रवास ३

"ऍट टाइम्स यु मे नीड टू ऑपरेट फ्रॉम बिहाइंड दी एनिमी लाईन्स, अँड वी बिलिव्ह यु विल बी एबल टू डु धिस"

काय घडतंय त्यावर आशुतोष चा विश्वास च बसत नव्हता. पत्र हातात पडल्यावर त्याने रात्री ते उघडलं आणि त्याला धक्काच बसला. रॉ मुख्यालयातून आलं होतं पत्र. सीओ सरांच्या स्पेशल रेकमेंडेशन वर त्याला रॉ मधून बोलावणं आलं होतं. आज तो आणि दोन इतर तरुण रॉ मुख्यालयात जॉईंट डायरेक्टर सिंघल समोर उभे होते. दोघांपैकी एक जण सिक्कीम केडर चा आयपीएस अधिकारी, तर दुसरा आयबी मधून आलेला. इतके दिवस आशुतोष फक्त रॉ बद्दल विचार करत असे. अर्थात रॉ च्या कामाविषयी जनरल माहिती बऱ्याच जणांना होती. आशुतोष ला हि होती. पण त्यातल्या अफवा किती आणि तथ्य किती हे त्याला नव्हतं माहित. एजंट्स ची रिक्रुटमेंट कशी होते ह्याबद्दल सुद्धा प्रत्येकजण वेगळं काहीतरी सांगायचा. त्याने असं ऐकलं होतं की सिव्हिल सर्व्हिसेस मधल्या पहिल्या शंभर लोकांना रॉ कडून ऑफर येते, आपल्या एलिट कमांडो फोर्स मधून निवडून घेतात, इतकंच नाही तर टेक्निकल बॅकग्राउंड साठी भारतातल्या अनेक कॉलेजेस मधून एखाद्या कंपनीच्या नावावर रिक्रुट करून घेतात. एकूणच, रॉने सिक्रसी व्यवस्थित मेंटेन केली होती. अर्थात, त्याला सीओ च्या रेकमेंडेशन वरून वरून जरी बोलावलं असलं तरी त्याला सुद्धा अनेक सायकोलॉजिकल चाचण्यामधून जावं लागलं होतं.

सिंघल यांनी बारीक काड्यांचा चस्मा काढून पुसून परत डोळ्याला लावला आणि पुढे बोलू लागले.

"आत्तापर्यंत तुम्ही मर्यादित काम केलं आहे, यापुढे एकाच वेळी अनेक अवघड कामं सांभाळावी लागतील. तुमच्या मनातल्या मलाच कशी ऑफर आली या प्रश्नाला सध्या माझ्याकडे उत्तर नाही, पण रॉ वर विश्वास असेल अशी अपेक्षा ठेवतो आणि तुमच्या निवडीला तुम्ही योगायोग समजणार नाही अशीही. सद्यस्थितीला आपल्यापुढे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यापैकी एक काश्मीर हा आहे. टू बी स्पेसिफिक, अनंतनाग मध्ये सस्पिशिअस ऍक्टिव्हिटीज बद्दलचे डिटेल रिपोर्ट्स आपल्याकडे असून योग्य पाऊलं उचलण्याची हीच वेळ आहे. या कामासाठी तुम्ही आत्ता तयार नाही आहात पण तीन महिन्यात तुम्हा तिघांना तयार करण्याची जबाबदारी माझी. अनेक गोष्टी एकाच वेळी अंगावर येतील, पण त्याला इलाज नाही. आय होप तुम्ही सर्व व्यवस्थित हाताळाल. क्लिअर?"
"येस सर"
"गुड, आय नाऊ टर्न यु ओव्हर टू मिस्टर देशमुख, असिस्टंट डिरेक्टर, रॉ. गुड बाय"

धडाधड येणाऱ्या वाक्यांनी कसं रिऍक्ट व्हावं हे कळायच्या आत सिंघल दरवाज्यातून बाहेर पडले आणि देशमुख बोलू लागले,

"अनंतनाग हि भारतासाठी कायमच डोकेदुखी राहिलेली आहे. आमच्याकडे अनेक लॉंग टर्म योजना तयार आहेत पण त्या राबवण्यात अनेक अडचणी आणि धोके आहेत. त्यामुळे वुई हॅव नो फर्म सोल्युशन. लेट मी टेल यु, एक भारतीय म्हणून, एक सैनिक, पोलीस म्हणून तुम्हाला काश्मीर आणि तिथला दहशतवाद याबद्दल जी माहिती आहे ती दहा टक्के सुद्धा नाहीये. ट्रेनिंग मध्ये हि सगळी ओळख करून दिली जाईलच तुम्हाला, पण एक ब्रिफ माहिती म्हणून इतकं लक्षात घ्या की आपण आत्तापर्यंत आपल्या एजंट्स मार्फत सीमेपालिकडे जेवढ प्लॅनिंग होतं त्याच्या ऐंशी टक्के माहिती मिळवण्यात यशस्वी झालो आहोत. हे प्लॅनिंग म्हणजे बंदुकी घेऊन माणसं घुसवणं इतकंच असतं असं अजिबात समजू नका. त्याचे अनेक आयाम आहेत. आणि हेच काम तुम्ही काही काळासाठी करणार आहात, वर्षभराने आयदर यु कॅन कंटीन्यू इन रॉ, ओर यु कॅन गेट बॅक टू युअर पेरेंट सर्व्हिस. सो, आर यु बॉईज रेडी?

आवश्यक ती सर्व माहिती सांगून व व्यवस्था लावून देशमुख बाहेर पडले.

तीन महिने आशुतोष चं एक्सटेंसिव्ह ट्रेनिंग चालू होतं. त्याच्या अपेक्षांप्रमाणे काहीच घडत नव्हतं, पण जे चालू होतं ते त्याला मनापासून पटतं होतं आणि सर्वसामान्य माणूस म्हणून याआधी आपल्या आकांक्षा किती लहान होत्या असं त्याला वाटून गेलं होतं. दिवसातले अठरा तास ट्रेनिंग मध्ये घालवल्यावर झोपेपलीकडे काहीच सुचायचं नाही. मध्ये एकदा त्याच्या लक्षात आलं की इतक्या सगळ्या गडबडीत आपलं घरी बोलणंच झालं नाही. पण ट्रेनिंग मधून वेळ काढणं जड जात होतं. एकेदिवशी ट्रेनिंग नंतर झोपेचा विचार बाजूला सारून त्याने घरी फोन लावला, आणि आईची प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. कसंबसं तिला समजावून त्याने बाबांना फोन द्यायला सांगितलं.

"काय चाललंय आशु तुझं, इतक्या दिवसांनी फोन केल्यावर आम्ही काय समजावं?"

"बाबा खूप कामात होतो जमलं नाही. आईला तेव्हडी शांत करा"

"बरं ते बघू, पण काय चाललंय तुझं? त्या तुमच्या माधवन ला विचारलं तर तो काहीतरी फालतू उत्तर देऊन तू नाहीयेस असं सांगायचा. काही विचित्र असेल तर सांग मला, मी नंतर काही विचारात बसणार नाही"

"बाबा तुमचा मुलगा सैनिक आहे. आत्ता इतकंच सांगतो की मी एका महत्त्वाच्या मिशन वर आहे, इतक्यात सुट्टी मिळायची शक्यताच नाही. जमेल तसं मी फोन करत राहीन, पण नाहीच आला माझा फोन तर त्यासाठी तुम्हाला एक नंबर देऊन ठेवतो. पण त्यावर सारखा फोन करू नका"

"अरे पण आशु इकडे आई तुझ्या लग्नाचं घेऊन बसलीये"

"बाबा आता काही इलाज आहे का? काम सोडून कसं येणार? आणि हो, लग्न वगैरे इतक्यात काय लावलंय तुम्ही? आत्ता कुठं नोकरी मिळाली, करुद्या की थोडं एन्जॉय. प्लिज तुम्ही ते आईला जरा समजवा ना"

"घ्या म्हणजे दोन्हीकडे माझंच मरण. ठिकाय, ते लग्नाचं वगैरे नंतर बघू, पण अरे आधीच वर्ष होत आलंय तू आला नाहीस, आणि आता म्हणतोय सुट्टी मिळायची शक्यता नाही?"

"बाबा मला काय आवडत नाही का तिकडे यायला? पण खरंच नाहीये ओ सुट्टी"

"बरं ठिके पण फोन तरी करत रहा निदान"

"हो हो करेन नक्की"

देशमुखांचा नंबर देऊन फोन ठेवला त्याने. आणि झोपून गेला, दुसरं काही करता आलंच नसतं त्याला.

एकदाचं ट्रेनिंग संपवून तिघे सुद्धा निघाले अनंतनाग ला. अर्थात आता तिघे एकमेकांना ओळखत नव्हते. आशुतोष ला वाटलं होतं आपल्याला आता रेहेमतुल्ला वगैरे नाव मिळणार, पण तसं नव्हतं. त्याचा रणजीतसिंग झाला होता. खरंच, त्याच्या अपेक्षेप्रमाणे काहीच घडत नव्हतं!

अनंतनाग मध्ये ठरलेल्या चहाटपरी जवळ आशुतोष थांबलेला असताना त्याच्या कानावर बोलणं पडलं.
"आजकल नये लोगोको देख के ये आतंकवादी होगा यही खयाल आता है. एक कटिंग देना मियाँ, घर जाणा है आज जलदी"
आशुतोष काय समजायचं ते समजला आणि त्या माणसाचा चहा पिऊन झाल्यावर त्याच्या मागे नकळत चालू लागला. जवळपास सहा फूट उंची असलेल्या त्या माणसाची शरीरयष्टी मध्यमच होती, पण आखीव बांधा आणि पिळदार स्नायू त्याने घातलेल्या झब्ब्यातून स्पष्ट दिसत होते. जरा बऱ्यापैकी असलेल्या वस्तीत दोघे पोचले. खोली बऱ्यापैकी मोठी होती, पण जरा आतल्या बाजूलाच होती. आजूबाजूला सामान्य लोक दिसत होते. असं असलं तरी अनंतनाग हे फुटीरतावाद्यांचं नंदनवन हे तो जाणून होता. आपली प्रत्येक कृती संकट ओढवू शकते हे हि त्याला चांगलं माहित होतं.

"ये है अपना सेफहाऊस. मेरा नाम जाननेकी जरूरत नाही है, बस यहा पे लोग आश्रफजी बुलाते है इतना याद रखना. बाकी, आजही हमे एक जरुरी काम करना है. दारू पीएगा?"

"नही शुक्रिया"

"हमेशा मत पिओ पर आज पिना पडेगा, क्युकी आजका काम दारू के गुत्तेपे है"

"ठीक है"

गुत्ता शब्द ऐकून हा पण मराठीच आहे की काय असा विचार आशुतोष च्या मनात चमकून गेला. त्याचसोबत कॉलेज मध्ये मित्रांसोबत प्यायलेली दारू आठवली, ssb सेंटर ला सिलेक्ट झाल्यावर मित्रांसोबत बार मध्ये बसलो होतो हेही आठवलं, आणि जॉइनिंग च्या काही दिवस आधी बिअर पिऊन घरी गेल्यावर आईला आलेला संशय पण आठवला. तेव्हाच आईला वाचन दिलं होतं की दारूला कधी स्पर्श करणार नाही, आणि त्याप्रमाणे वागला पण होता, पण आता शक्य नव्हतं.

"आणखी काय काय कॉम्प्रमाईज करावं लागणार काय माहित"

"बहोत कुछ करना पडेगा, समझ जाओगे धीरे धीरे"

आता आशुतोष ला खात्री पटली कि हा प्राणी मराठीच असणार, त्याने लगेच विचारलं, उत्तरादाखल तो हसून म्हणाला,

"टाईम पे पता चलेगा, पर महाराष्ट्र मे काम किया है इसलीये जाणता हु मराठी. अब निकले?"

बऱ्यापैकी पॉश बार होता. आज आशुतोष ला एक महत्वाची माहिती कळाली, ती म्हणजे ओल्ड मॉंक पिणारा फौजीच असतो असं लोक समजतात. अनंतनाग मधलं एकूण वातावरण त्याच्या लक्षात आलं होतं आणि फौजी असणं हे इथे धोक्याचं आहे हे त्याला उमगलं होतं. आणि कदाचित त्यामुळेच समोर आयबी ची बॉटल होती.

"क्या हालचाल आश्रफजी?" एक इसम त्यांच्यासोबत येऊन बसला.
"बेहेतर जनाब, इनसे मिलीये, रणजीतसिंग है ये, पुरानी पेहेचान है हमारी"
"बाहरसे आये है?"
"हांजी श्रीनगर के रेहनेवाले है, कूछ काम से आये है"
"अच्छा है मजे करो. सिगरेट पीओगे?
"नही जी, शुक्रिया"

संभाषण चालू असताना अश्रफ आणि त्या इसमामध्ये नोटांची देवाणघेवाण झाली आणि मग तो इसम निघून गेला. आशुतोष ला खूप आश्चर्य वाटत होतं कारण गुप्तता वगैरे ठेवतोय असं कुठेच काही दिसत नव्हतं. सहजरीतीने आपली ओळख संगीतली जाणार नाही, नाव वेगळं सांगितलं जाईल, बाकी काही बोललं जाणार नाही अशी त्याची अपेक्षा होती.
पण पुन्हा, त्याच्या अपेक्षेप्रमाणे काहीच घडत नव्हतं!

सेफ हाऊस ला परत आल्यावर त्याने कुतूहलाने अश्रफ ला याबद्दल विचारलं. यावर अश्रफ ने त्याला गोल्डन रुल सांगितला.

"हम कुछ छुपा रहे है ये किसिके ध्यान में न आने देना ये सबसे जरुरी है, और इसिलिये हम कम से कम सिक्रसी रखे यही उपाय है. और यही मेरा सिक्रसी मेंटेन करनेका तरिका है"

हे ऐकल्याक्षणीच आपण एका गौरवशाली संस्थेसोबत काम करतोय हा अभिमान आशुतोष च्या चेहेऱ्यावर झळकून गेला. पुढे सुरु झालं माहितीचं विश्लेषण.

"इन नोटोमे हि अपना सिक्रेट मेसेज है, वो ढुंढना तुम्हारा काम है. युज एव्हरी पोसिबल थिंग इन धिस रूम टू डिकोड मेसेज, और सुबेहतक बताना मुझे, तबतक मैं चलता हु, आयबी खतम करनी है."

आणि अश्रफ आयबी उघडून त्यात बुडून गेला.

इकडे आशुतोष चं डोकं विचार करून करून दुखू लागलं होतं, पण त्याला काही कळत नव्हतं. आणि आता तर अश्रफ शेवटचं वाक्य काय बोलला ते सुद्धा आठवत नव्हतं. वैतागून तो अश्रफ समोर जाऊन बसला.

"ओह, दॅट वॉज क्विक मॅन"
"थँक्स, पर मुझे मेसेज नही मिला"
"वो तुम्हारे मराठी में केहते है ना, काखेत समथिंग अँड गावाला समथिंग..सब कुछ यही पे है, जाओ ढुंढो जल्दी"

आणि आशुतोष ची ट्युब पेटली. खोलीत असं काहीतरी असणार ज्याचा त्याला उपयोग होणार होता. अश्रफ ला हि समजलं की आपण खूप सोप्पी हिंट दिली. जीभ चावून तो म्हणाला,

"रुक रुक, अब बार मी पी हि ली है तो दो पेग मारके जा मेरे साथ"

आणि आशुतोष नाकारू शकला नाही. त्याला असाही दाट संशय आला की हा मनुष्य मराठी च आहे. रात्री कधीतरी आशुतोष ला कामाबद्दल आठवलं. उठून तो काहीतरी शोधू लागला. कॉफीमशीन, बॅट, इस्त्री असं बरंच काही होतं, पण त्याला जे पाहिजे ते अजून सापडत नव्हतं. अचानक त्याची नजर कोपऱ्यातल्या उपकरणावर गेली. कुठलं तरी हायटेक मशीन वाटत होतं ते. दारूचा असर अद्याप उतरला नसल्याने त्याचं बटन शोधायला त्याला दहा मिनिटं लागली. ते चालू झालं आणि आशुतोष च्या लक्षात आलं की ते UV स्कॅनिंग मशीन होतं. विश्वाचं कोडं सुटल्यासारखं पळत जाऊन आशुतोष त्या नोटा घेऊन आला, आणि मशीन खाली धरल्या. त्याच्या डोळ्यांना सरावायला काही क्षण गेले, पण नंतर त्याला जो मेसेज दिसला तो पाहून आशुतोष नखशिखांत हादरला.

attack on salambad post

डोळ्यांसमोर सर्व काही तरळून गेलं त्याच्या. कर्नल माधवन, मेजर सिद्दीकी, इंग्रजी बोलणारा जगजीत, शार्प शूटर सुभेदार विकास, आपले सगळे मित्र. खुद्द आपल्याच पोस्ट वर अटॅक?? ज्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण कित्येक अतिरेक्यांना कंठस्नान घातलं, ज्यांच्याकडून इतक्या गोष्टी आजपर्यंत शिकत आलो, त्यांनाच धोका आहे, आणि आपल्याला हे माहिती असून सुद्धा आपण इथे अनंतनाग मधल्या अंधाऱ्या खोलीत काय करतोय??
भानावर येऊन आशुतोष ओरडला,

"अश्रफ, अश्रफ जल्दी आओ"

अश्रफ लोळत पडला होता. अचानक आलेल्या हाकेने खडबडून उठला. बघतो तर आशुतोष स्कॅनिंग मशीन समोर बसला होता.

"पागल हो क्या, चिल्ला क्यू रहे हो?"

"अश्रफ, सालामबाद पोस्ट पे अटॅक कि न्यूज है. हमे जल्दी कुछ करना होगा. सीओ सर तक मेसेज पोहोचाना होगा." आशुतोष घाईघाईत बोलला.

ते ऐकून अश्रफ ने डोळे चोळले, आणि यांत्रिकपणे गादीवर पडून परत झोपून गेला. ते बघून आशुतोष भयंकर चिडला. आत्तापर्यंत तो फक्त पॅसिव्ह भूमिका पार पाडत होता, पण आता शक्य नव्हतं. दारू तर कधीच उतरली होती खाडकन. साक्षात आपल्या भाऊबंदांवर संकट ओढवलेलं असताना दारू उतरणारच. अश्रफ कडे खाऊ कि गिळू असं बघत त्याने बेड ला जोरात लाथ मारली. अश्रफ परत खडबडून जागा झाला.

"अबे ज्यादा चढ गयी क्या? फिर नही पिलाऊंगा. मुझे क्या पता इतने में आउट हो जायेगा तू. बच्चा है अभितक"

बच्चा है अभितक हे ऐकून त्याच्या अंगाचा तीळपापड झाला. तीसच्या जवळपास अतिरेक्यांना मारलेला, कोल्ड ब्लडेड किलर बच्चा असतो??

"भें**, वहा मेरे दोस्त खतरे में है और तुम ये क्या बोल रहे हो?"

त्याचा इतका आक्रमक पवित्रा बघून अश्रफने जरा माघार घेतली.

"देखो रणजीत, तुम्हे क्या लगता है, ये मेसेज सच होता तो मैं ऐसे दारू पीके पडा रेहता बेड पर?"
"मतलब?"
"अरे भाई ये मेसेज फेक है, मैं बस देखना चाहता था तुम क्या और कैसे रिऍक्ट कर रहे हो. ये वो नोट नही है जो उस आदमी ने दिये थे. वो तो मेरे जेब में है. और वो मैने पेहले ही पढ रखा है, उसका क्या करना है ये भी कल सुबह बताने वाला था तुम्हे. मैं पागल थोडी हु कि बिना कुछ किये पडा रहुंगा? बहिर्जी कि विरासत बतांते है हम भी. आगे से ध्यान मी रखना, बाप बाप होता है. पुरी दारू उतर गयी. चल अभी कॉफी पिला."

आपल्या समोर बसलेला इंटेलिजन्स मधला बाप आहे हे एव्हाना आशुतोष च्या लक्षात आलं होतं. आपोआप त्याची पाऊलं कॉफी मशीन कडे वळाली. अचानक त्याला काहीतरी स्ट्राईक झालं. झटक्यात वळून तो पुन्हा अश्रफ कडे आला,

"क्या कहां तुमने? किसकी विरासत?"

"पेहले तू कॉफी ला, बाकी बाते बाद में"

पुन्हा एकदा रॉ बद्दलचा अभिमान त्याच्या चेहेऱ्यावर झळकून गेला. अश्रफ त्याच्याकडे बघून स्मित करत होता.

क्रमश:

हे ठिकाण

प्रतिक्रिया

जॉनी's picture

11 Nov 2016 - 10:51 pm | जॉनी

भाग किती मोठा करावा ह्याचा अंदाज पूर्ण येत नाहीये मला अजूनही, तरीही समजून घ्या, मिपा वर नाही तर ओव्हरऑल पहिल्यांदाच लिखाण करतोय. मोठा करायचा प्रयत्न केलाय या वेळी.

ओव्हरऑल पहिल्यांदाच लिखाण करतोय.

वाटत नाहि...
शैली छानच आहे तुमच्या लिखानाची..

जॉनी's picture

14 Nov 2016 - 3:15 pm | जॉनी

कदाचित जास्त मिपा वाचनाचा परिणाम आहे.
:)

बोका-ए-आझम's picture

11 Nov 2016 - 11:05 pm | बोका-ए-आझम

पुभाप्र!

मस्तं. पहिल्या भागापासूनच पकड घेतलीय कथेनी.

पढिन्ग. आय मीन वाचिंग. पुभाप्र.

जॉनी's picture

12 Nov 2016 - 9:20 pm | जॉनी

बरंच इंग्रजी आहे पण कथेची गरज म्हणून टाकावं असं वाटलं.

संजय पाटिल's picture

13 Nov 2016 - 6:38 pm | संजय पाटिल

इंटरेस्टिंग!!!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

पैसा's picture

13 Nov 2016 - 10:36 pm | पैसा

एकदम उत्कंठावर्धक लिहिताय! एवढे मोठे भाग असू देत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Nov 2016 - 7:55 am | कैलासवासी सोन्याबापु

छान आहे हा पण भाग, रॉ अन इतर तत्सम संस्थांची बातच न्यारी.

बापू नारू's picture

14 Nov 2016 - 10:37 am | बापू नारू

बहिर्जी कि विरासत बतांते है हम भी.
अगदी योग्य शब्द वापरलेत .

वाचते आहे.. इतक्या लांबीचा भाग ठीकच आहे. खूप मोठाही नको, मग ते कंटाळवाणं होतं.

शलभ's picture

14 Nov 2016 - 7:22 pm | शलभ

मस्त आहे.

अजया's picture

14 Nov 2016 - 10:46 pm | अजया

पुभाप्र.

स्वाती दिनेश's picture

15 Nov 2016 - 5:18 pm | स्वाती दिनेश

उत्कंठा ताणली जाते आहे.
पु भा प्र
स्वाती

इरसाल कार्टं's picture

24 Nov 2016 - 4:00 pm | इरसाल कार्टं

पु भा प्र

नाखु's picture

24 Nov 2016 - 4:25 pm | नाखु

आणि वाट पहात आहे..