आईचा तिळगूळ

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
14 Jan 2017 - 7:06 pm

सकाळची कामं आटोपून, मस्त आल्याच्या चहाचे घोट घेत, वर्तमानपत्र हातात घेतलं. आजचच आहे ना बघण्यासाठी तारीख बघितली, १३ जानेवारी २०१७ (आम्ही इतके शिस्तीचे नाही बरं, कुठल्याही तारखेचं वर्तमानपत्र हाती येऊ शकतं) अरे बापरे! म्हणजे उद्या १४ जानेवारी, मकर संक्रांत! तिळगुळ करायचा राहुनच गेलाय अजून. आळस झटकून मी उठले. तिळगुळाचं साहित्य साटपपणे कध्धीच आणुन ठेवलं होतं पण परिक्षेचा अभ्यास कसा आदल्या दिवशी, ताजा ताजा करायचा असतो, मी तिळगुळही तसाच करते, अगदी ताजा ताजा.

पाकक्रियामौजमजाआस्वाद

शिव शिव

कर्रोफर नमुरा's picture
कर्रोफर नमुरा in जे न देखे रवी...
14 Jan 2017 - 5:41 pm

कुणी छापिती शिवमुख ध्वजी
कुणी घालिती राजमुद्रा करी
शिवरायांची तत्वे न कळे काही
दाढी वाढवून जो तो आरशात पाही

© कर्रोफर नमुरा

vidambanअनर्थशास्त्रशिववंदनाअद्भुतरसचारोळ्या

वडील

वृंदा१'s picture
वृंदा१ in जे न देखे रवी...
14 Jan 2017 - 2:38 pm

प्रत्येक सणावाराला
तुमच्या स्पर्शाचं गोंदण आहे
मी केवळ एक क्षुल्लक खडा
पण मला तुमचं सोन्याचं कोंदण आहे ....

कविता

ती सध्या काय करते ?

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
13 Jan 2017 - 8:56 pm

नाना पाटेकरशी एकदा चित्रपटकथेवर चर्चा झाली होती. तेव्हा तो म्हणाला होता की सर्वोत्तम कथा ती, की जीचा जीव एका वाक्यात सांगता येतो.

ती सध्या काय करते ? एका वाक्यात सांगायची तर, ती सध्या काहीही करत असू दे, समोरासमोर आल्यावर, आपण जे तेव्हा बोलू शकलो नाही ते आठवून आणि अवघडून जाऊन, अजून दूर जाण्यापेक्षा, आज ते बोलून, दोघातलं प्रेम तितक्याच उत्कटतेनं आणि अपराधशून्य मनानं जपून, आपण एकमेकांशी सुहास्यवदनानं बोलू शकतो.

इतकी साधी स्टोरीलाईन सतीश राजवाडेनी जी काय बेहद्द रंगवलीये ती भान विसरुन पाहात राहावी अशी आहे.

चित्रपटप्रकटन

सुक्ष्म गीतकथा: सुक्ष्मकथांचा मजेदार उपप्रकार

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
13 Jan 2017 - 5:52 pm

एक इनंती: आधी २० सुक्ष्मकथा-१ हा दुवा वाचावा. मग पुढे धकावं.

सुक्ष्मकथेत अजून काय मजा आणता येईल याचा विचार करतांना एक नवीन उपप्रकार सापडला (मुळात ही कल्पना शैलेंद्र शिर्के यांची. कल्पनाविस्तार अन कथा मात्र माझ्या)
संकल्पना अगदी सोप्पीये- कुठल्याही गाण्याच्या धृवपदाची पहिली ओळ (किंवा दोन्ही ओळी) घ्यायची, दुसऱ्या ओळीत असे शब्द घालायचे की गाण्याचा अर्थ पुर्ण बदलून जाईल. शिवाय एक वेगळीच नवीन सुक्ष्मकथा तयार होईल.

कथाप्रतिभाविरंगुळा

महाराष्ट्राचे दुर्गवैभव आणि आपण

कर्रोफर नमुरा's picture
कर्रोफर नमुरा in जनातलं, मनातलं
13 Jan 2017 - 5:19 pm

महाराष्ट्र हा प्राचीन काळापासून एक समृद्ध, प्रगतीशील आणि पराक्रमी देश आहे, हे त्रिकाळ अबाधित सत्य आहे. प्राचीन काळी हा प्रांत ऋषीमुनींचे आणि महारथींचे दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा. भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम हे येथील राष्ट्रीकांचे वैशिष्ट्य राहिले आहे. अगदी कला, स्थापत्य आणि निसर्गसौंदर्य हे देखील या भूमीला वरदान ठरले आहेत. अजिंठावेरुळचे स्थापत्य तर जगाला भुरळ घालत आहेत. लोणारचे खारयुक्त सरोवर हे खगोलतज्ञ आणि वैज्ञानिक यांचे आवडते ठिकाण.

समाजविचार