दक्षिण घळ भाग 5

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
13 Jan 2017 - 10:30 pm

दक्षिण घळ भाग 1

दक्षिण घळ भाग 2

दक्षिण घळ भाग 3

दक्षिण घळ भाग 4

दक्षिण घळ भाग ५

अशीच काही वर्षे निघून गेली. आणि एकदिवस अचानक यशवंता परत गावाकडे परतला होता. परत आलेला यशवंता चांगलाच तरणा बाड गडी झाला होता. गावात आल्यावर त्याने गावच्या मोठ्यांची भेट घेतली. तो परत वाड्यावर जाऊन राहणार असल्याची माहिती त्याने सर्वांना दिली. दाजी आणि आप्पा नसल्याने त्या वयात वाड्यावर रहायची इच्छा नसल्याने त्याने न सांगता गाव सोडले असे त्याने गावकऱ्याना सांगितले. गावकऱ्याचा त्याच्या बोलण्यावर विश्वास देखील बसला. त्याला वाड्यावर राहण्यास नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी तो वाडा त्याचाच होता. दाजी गेले त्यानंतर कोणीही कधीही आप्पाला बघितलेच नव्हते. तो कुठेतरी परागंदा झाला असे सगळ्यांचे मत पडले. आणि आपण ज्याला दाजींचा वारसदार समाजात होतो तो असा अचानक निघून घेल्यामुळे त्याच्या नावाने बोटे मोडत होते. म्हणून मग सर्वांनी यशवंताने हक्काने वाड्यातच रहावे असे मत व्यक्त केले. त्याप्रमाणे यशवंता वाड्यात राहायला लागला.

मात्र यशवंता चुकूनही वाड्याच्या वरच्या मजल्यावर जायला तयार नव्हता. दाजी गेले त्यावेळी जो बारीक दार ठोठावल्याचा आवाज सर्वाना एकू आला होता; तो यशवंताला आजही एकू येत असे. म्हणून मग त्याने घरकामासाठी भिकू नावाच्या गावातल्या एका अनाथाला ठेवून घेतले. हळू हळू यशवंता परत गावात रुळला. मात्र त्याचा स्वभाव नक्की कसा असावा याची कोणालाच कल्पना येत नव्हती. तो कधी सर्वांशी खूप मिळून मिसळून वागत असे, तर एखाद दिवशी कोणालाही ओळख दाखवत नसे.

खर तर त्याला त्याच्या गावी कधीच यायचे नाह्वते. पण तरीही तो आला होता आणि त्याच्या स्वतःच्या वाड्यातच राहात होता. त्याचे गावात परत येण्याचे कारण फक्त त्यालाच माहित होते. अलीकडे तो जिथे जाई तिथे त्याला आप्पाचा चेहेरा दिसू लागला होता. रात्री झोपला की त्याला स्वप्न पडत असे आणि त्या स्वप्नात आप्पा येऊन त्याला एकच सांगत असे;'यशवंता गावाकडे जा... तुला दाजींचा शेवटचा निरोप नाही कळला. तो समजून घे. दक्षिण घळीत आणि दरवाजात काहीतरी आहे. जा... गावाकडे जा.....'

त्या सतत पडण्याऱ्या स्वप्नांच्या भीतीने यशवंता गावात परत आला होता. गावात आल्यापासून मात्र त्याला स्वप्न पडण बंद झाल होत. दक्षिण दरवाजा आणि त्यापुढे असणारी ती घळ तिथे जाव की नाही याचा यशवंता सारखा विचार करत होता. गावात आल्यानंतर त्याला अनेकांनी त्याबाजूचे आलेले विचित्र अनुभव सांगितले होते. मुळात बदनाम असणारी ती दक्षिण घळ दाजींच्या मृत्यूनंतर जास्तच बदनाम झाली होती. एकूण त्या सगळ्या ऐकीव गोष्टी एकून यशवंताचे तर त्याचे धाबे दणाणले होते.

खूप प्रयत्नांनंतर कृष्णा त्याच्याबरोबर त्यादिवशी यायला तयार झाला होता. एकदा त्या घळीत जाव आणि परत येऊन गावातून परत पळून जाव अस यशवंताच्या मनात होत. त्याला त्या स्वप्नांपासून सुटकारा हवा होता. मुख्य म्हणजे त्याला त्याच्या भूतकाळापासून सुटकारा हवा होता. त्यासाठी तो काहीही करायला तयार होता. पण त्याला मार्ग सापडत नव्हता.

दिवसांमागून दिवस जात होते. पावसाळा आला आणि गेला. गणपती आले आणि गेले. यशवंता अजूनही वडाच्या पाराच्या पलीकडे जायची हिम्मत करू शकला नव्हता. आणि पितृ पक्ष सुरु झाला. कधी नव्हे ते दक्षिण वेशीकडे थोडी वर्दळ दिसायला लागली होती. मधुनच कधीतरी कोणीतरी आपल्या पितरांना ताट ठेवायला तिथे जात होते. वेतोबाच्या मंदिरात रोजची दिवाबत्ती होत होती.

माणसांची वर्दळ बघून यशवंताची भीड चेपली. ही वर्दळ असतानाच एकदा पाराच्या पुढे जाता येईल आता असा त्याने विचार केला. संध्याकाळी जाण्यापेक्षा टळटळीत दुपारी जाव असा त्याने विचार केला. दिवसा बाकी कोणाची साथ नसली तरी उजेडाची साथ नक्की असते अस त्याच्या मनात होत. तसाच एक दिवस सोबत न घेताच यशवंता घराबाहेर पडला. घरातून 'कुठे जातोस' अस विचारणार कोणी उरल नव्हत. दुपारची वेळ असल्याने गावात देखील बाहेर कोणी दिसत नव्हत. त्यादिवशी अचानक पावसाची थोडी रिपरिप चालू झाली होती. त्यामुळे रस्त्यावर खेळणारी पोरसोर देखील वळचणीला पळाली होती. पाखर सुद्धा झाडावर आडोशाला बसली होती.

यशवंता तसाच भिजत-भिजत निघाला. तो दक्षिण वेशीजवळच्या दरवाज्या जवळ आला. आज का कोणजाणे पण एकूण वातावरण खूपच शांत वाटत होत त्याला. कुंद हवा होती. टळटळीत दुपार अस आपण आपल म्हणायचं. पण सूर्यसुद्धा ढगांमध्ये झाकोळलेला होता. वारसुद्धा पडलेलं होत. यशवंताने वेस ओलांडली आणि वेतोबाच्या मंदिराजवळ आला. बहुतेक कोणीतरी नुकतच गाभाऱ्यात निरंजन लावून गेल होत. खोल आत मिणमिणता उजेड होता. यशवंताने सवयीने गाभाऱ्याच्या दिशेने हात जोडले आणि तो पुढे सरकला. पारावर काही ताट ठेवली होती. त्या रिपरिपीमध्ये सुद्धा काही चुकार कावळे त्यात चोच मारत होते. यशवंताची चाहूल लागून ते सगळे अचानक उडाले. त्यामुळे पत्रावळीवर ठेवलेले पदार्थ इतरस्त्र विखुरले.

"स्साले फुकटे..... जे दिसेल त्यात तोंड घालतील आपलाच हक्क असल्या सारखे." यशवंता स्वतःशीच बोलला. तो पाराजवळ उभा होता आणि त्याची नजर समोरच्या घळीकडे होती.

'पावसाचा जोर वाढला आहे का?' त्याच्या मनात आल. पण आज काहीही झाल तरी घळीकडे जायचंच असा त्याने निर्धार केला होता. म्हणून तर त्याने आज कोणालाही सोबत घेतल नव्हत. क्षण दोन क्षण थांबून त्याने पाय उचलला. कारण जर आपण अजून थांबलो तर परत मनातली भिती डोक वर काढेल आणि आपण मागे फिरू याची त्याला कल्पना होती. तो घळीच्या दिशेने चालायला लागला. चार-पाच पावल तो पुढे गेला असेल-नसेल आणि पाउस अचानक थांबला.

यशवंताला आश्चर्य वाटल. पण मग त्याच्या मनात आल की बर झाल पाउस नाही ते. दक्षिण वेशीच्या दरवाजातून बाहेर आलोच आहोत आणि आता घळीकडे जातो आहोत. एकदा तिथे जाऊन परत आलो की आपण गाव सोडून निघून जायला मोकळे. नाहीतरी आप्पाने स्वप्नात येऊन म्हंटले होते की ही घळ आणि दरवाजा यात काहीतरी आहे. खरतर त्या काहीतरीचा आपल्याशी संबंध असणे शक्यच नाही. कारण आपण पूर्वी कधीही इथे आलोच नव्हतो. पण त्या दु:स्वप्नांच्या चक्रातून बाहेर पाडण्यासाठीच केवळ एकदा तिथे जाऊन यायचं इतकंच. मनात विचार चालू होते आणि यशवंता घळीच्या दिशेने चालत होता. आता वातावरण थंड व्ह्यायला लागल होत. पण विचारांच्या तंद्रीत असलेल्या यशवंताला ते लक्षात आल नव्हत. तो चालत होता. तो घळीजवळ पोहोचला आणि काही न विचार करता घळीत उतरला. तो खाली खाली उतरत होता. अजून थोड पुढे .... थोड अजून.... विचारांची तंद्री लागली होती त्याची त्यामुळे तो कुठे जातो आहे त्याच त्याला कळत नव्हत. पावसामुळे खूपसा चिखल आणि सगळीकडे निसरड झाल होत.

अचानक यशवंता चालता चालता थबकला आणि समोरच दृश्य बघून भयंकर घाबरला. त्याच्या समोर एक पडक झोपड होत आणि त्याच्या बाजूला एका मोठ्याशा दगडाला टेकून एक तरुणी बसली होती. तिला बघून त्याला आश्चर्य वाटल. पण लगेच त्याला एकूण या घळीबद्दल ऐकलेल्या वंदता आठवल्या. तो गर्भगळीत झाला आणि हळू हळू मागे सरकत पाळायच्या तयारीत होता. पण तितक्यात त्या मुलीने त्याला बघितले आणि हाक मारली;"अहो... अहो... शुक-शुक.... माझी मदत करता का हो जरा?"

वळून पळायच्या तयारीत असलेला यशवंता तिच्या हाकेने बावचळला आणि त्याने मागे वळून बघितले आणि बघतच राहिला...

क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

छान लिहिलंय. फक्त ते "माझी मदत" ही विभक्तीची तोडफोड अगदी अलीकडची आहे. (हिंदीतल्या 'मेरी मदत करो' चे भ्रष्ट भाषांतर 'माझी मदत करा'). त्या काळात त्या तरुणीने "मला मदत करता का हो" असं विचारलं असतं.

पुभाप्र.

रातराणी's picture

14 Jan 2017 - 1:01 am | रातराणी

आवडला हाही भाग.

पैसा's picture

15 Jan 2017 - 1:09 pm | पैसा

लिखाण आवडले आहे.