पुण्यात औन्ध मधे बंगला उभा आहे ऐटित
जळू नका लोकहो ... राव आहे आय़् टीत
पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ' ,
........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.
पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
.... आहेत आमचे फार नाजुक.
चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा,
मी आहे म्हैस तर............ आहे रेडा.
अधिकमासात आईने दिली चांदिची परात,
सखींनो २७ फेब्रुवारीला .... ची आली होती हत्तीवरुन वरात.
मिताली बिल्डींग,तिसरा मजला घर नं - ११ , घराला लावली घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी.
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
...