कांही वर्षांपुर्वी विद्युत उर्जा मोजणी आणि विजेची अभियांत्रिकी हिशेब तपासणी या क्षेत्रात काम करायची संधी मिळाली. त्याकाळी आम्ही (पक्षी: टीम)ठिकठिकाणी फिरून विविध संस्था, उद्योग, पाणीपुरवठ्याची पंपिंग केंद्रे, साखर कारखाने , रस्त्यावरचे दिवे यांचे उर्जा परीक्षण करत असू.
उर्जा म्हणजेच पैसा … त्यामुळे निर्मिती, वितरण, गळती , यातली मोजणी आणि वसुली यात प्रचंड तफावत असते. वीजेच्या वितरणामधून कोट्यावधीचे घोटाळे राजरोसपणे सुरु असतात, '' घोटाळा आवडे सर्वांना '' हे आपलं अघोषित ब्रीदवाक्य असल्यागत सगळं सुरळीत चालू असतं.