मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रिय मायमराठी

शिव कन्या ·
प्रिय मायमराठी, तुझा प्रांत सोडून तब्बल एक तप उलटून गेले, म्हणूनच कदाचित् तुझी आठवण इतर कुणाहीपेक्षा माझ्या मेंदूत जास्त येरझाऱ्या घालत असावी. तुला न ऐकणे म्हणजे, कान असून श्रवण नसणे. तुला न वाचणे म्हणजे, डोळे असून आंधळे असणे. तुझे देवनागरी रूप महिनोंनमहिने नजरेस पडत नाही, तेव्हा डोळे दुखून येतात. लहानपणी, कुठल्याही परप्रांतातून घरी परतताना, तुझ्या साजिऱ्या रूपातला फलक वाचला कि डेरेदार सावलीत परतल्यासारखे वाटायचे. चित्रविचित्र लिपींचा न कळणारा प्रांत सोडून तुझ्या कळणाऱ्या रूपाशी आले, कि सुखरूप वाटायचे.

मातृभाषा

शिव कन्या ·

माहितगार 22/02/2018 - 17:47
रोचक , पण प्रांजळपणे सांगायचे झाल्यास वही नेमकी कुणाची असा अनाहुत प्रश्न येऊन अर्धाक्षणभर अडखळल्यासारखे झाले. वही कुणाचीही असो प्राण कंठाशी आल्यावर आई गंssss ची हाक पोहोचते पण तो पर्यंत तिचा विसर पडणार्‍यांचे काय ? सारखे नसते प्रश्न पडणार्‍या माहितगाराचे काय करायचे असा प्रश्न कुणास पडल्यास मनमोकळे क्षमस्व.

In reply to by अभ्या..

शिव कन्या 23/02/2018 - 00:07
वेलांटी हे शब्द रूप एकदम बरोबर. पण विलांटी हे ध्वनी रूप एकदम चूक नाही. आम्ही आपलं ते व ला टोपपदर दिला..... कलाकार आहात, कळेल.

तू काना, मात्रा, विलांटी, शिरोरेखा घेऊन माझ्या वहीत हळूहळू लिहित जातोस, तेव्हा मी तुझे राजस हात लोभस डोळे पहात राहते. तुझ्यात इतका जीव का गुंतावा? तू माझ्या हातांचे देवनागरी चुंबन घेऊन म्हणावे, मातृभाषा कि काय तिच्यातच जीव अडकतो बघ, आई गंssss म्हटल्याशिवाय प्राणसुद्धा जात नाही.... शाईचे बोट धरुन तू परत रात्रीच्या शांतप्रहरी काना, मात्रा, विलांटी, शिरोरेखा घेऊन माझ्या वहीत तुझेमाझे हितगुज हळूहळू लिहित राहतोस... शिवकन्या

बाप रे बाप..

ss_sameer ·

ज्ञानव 12/02/2018 - 14:55
पूर्वी तात्या, आबा, दादा हि बाप कॅटेगरी होती. अण्णा, नान, बाबा ही वडील कॅटेगरि झाली. माझा मित्र सकाळी कॉलेजला जाताना उशिरा ट्रेनला पोहोचला कि कारण सांगायचा "काष्ट्याने उठावलेच नाही रे...." पण आम्ही कधी घरी गेलो तर गडी सुतासारखा सरळ असायचा. तात्यांना फुल्टू टरकून...

मित्रहो 12/02/2018 - 20:34
लेख मस्त आहे. आम्ही कॉलेजला असताना पोर एकमेकाला बापाच्या नावाने हाक मारायचे. ज्याच्या कुणाच्या वडीलांनी आमच्या गप्पा ऐकल्या असतील त्यांची मानसिक अवस्था काय झाली असेल कल्पना न केलेलीच बरी. बापाची भिती आज कमी झाली हे जरी खरे असले तरी मुलांपासूनच्या अपेक्षा वाढत आहेत.

वकील साहेब 12/02/2018 - 20:42
वाह एकदम छान लेख. आवडला. आमच्या लहानपणी आमचे वडील घरी आले की आम्हीही घरी थांबत नसू. किंवा दुसर्या खोलीत जात असू. आता त्याबाबत खूप विचार केला कि आम्ही तेव्हा अस का वागायचो ? तर त्याच कारण अस असायचं की वडिलांना आम्ही त्यांच्या समोर रिकामे बसलेलो दिसलो की ते हटकून एखादे काम तरी सांगायचे किंवा अभ्यासाला तरी बसवायचे. अभ्यास झाला अस सांगितल कि म्हणायचे कि पूर्ण वर्षभराचा झाला का ? काहीच शिल्लक ठेवला नाही का? त्यांनी अस म्हंटल्यावर मुकाट्याने अभ्यासाला बसाव लागत असे. त्यात नंतर नंतर असे कळायला लागले कि ते काम होणे किंवा अभ्यास होणे हा मुद्दा नसून तू माझ्या समोर इतका निवांत बसलासच कसा ? हा तो मुद्दा होता. मग आम्ही भावंडे वडिलांसमोर जायचंच टाळायला शिकलो. मग त्यांना कामाचीही आठवण यायची नाही अन अभ्यासाला हि बसवावंस वाटायचं नाही. त्या पिढीतल्या सर्व मुलांच हेच कारण असेल का वडिलांसमोर न जाण्याचे कि अन्य काही कारणे होती ?

मस्त लेख. आम्ही कॉलेजला असताना पोर एकमेकाला बापाच्या नावाने हाक मारायचे. ज्याच्या कुणाच्या वडीलांनी आमच्या गप्पा ऐकल्या असतील त्यांची मानसिक अवस्था काय झाली असेल कल्पना न केलेलीच बरी. असले उद्योग कधी कधी अंगाशी यायचे. http://www.misalpav.com/node/28534

नाखु 12/02/2018 - 21:06
झाल्यानंतर बापाचे हाल आणि पोरांचे ताल खर्या अर्थाने समजतात. आपण वाजवीपेक्षा जास्तच वांड होतो का वाजवीपेक्षा जास्तच शामळू ह्याची नैसर्गिक तुलना करून आपलाच लोच्या होतो ते वेगळेच. लेख आवडला पितृप्रेमास पारखं होऊनही "बाप"पदाचे आंबटगोड पदार्थ अनुभवत असलेला नाखु पालकायनी

मला शाळेत एकदा विचारलेले, तुला तुझ्या वडीलांबद्दल काय वाटते? मी सांगितले, "भीती!" विचारणारा काही क्षण गोंधळून गेला. सारा वर्ग विचारणाऱ्या शिक्षकाच्या चेहऱ्याकडे पाहून फिदीफिदी हसत होता. गोंधळ इतका वाढला की पुछो मत. त्यानंतर बसण्याच्या जागेवर फुटलेल्या फटाक्यांमुळे माझे बसायचे हाल झाले. हे त्या काळचे उत्तर आहे. सध्या असे कोणी उत्तर दिले तर अमेरिकेत जसा नाईन वन वन ला फोन करतात तसाच पोलिसांना फोन करून वडिलांची(च) चौकशी करायला घेतील. पूर्वी बापास शाळेत बोलावणे म्हणजे पोराने कोणता तरी अनंत अपराध केल्याची नांदी असे.

पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर"

निमिष सोनार ·

manguu@mail.com 03/02/2018 - 08:59
सख्या गटणेच्या डायरीतलं पान इकडे आलेलं दिसतयं

पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर" लेखिका: इंद्रायणी सावकार रिया पब्लिकेशन अजब डीस्ट्रीब्युटर्स सूचना: अलेक्झांडर = सिकंदर पोरस = पुरू = पुरुषोत्तम = पौरव देशाचा राजा चाणक्य = कौटिल्य = विष्णुगुप्त परीक्षण: नुकतेच "असा होता सिकंदर" हे पुस्तक मी वाचून पूर्ण केले. लेखिका "इंद्रायणी सावकार" यांची "लेखनशैली" काय वर्णावी? एकदम अद्भुत अशी शैली! कठीण आणि क्लिष्ट असलेला इतिहास विषय आणि त्यातल्या त्यात अलेक्झांडर सारख्या जगप्रसिद्ध प्राचीन ग्रीक व्यक्तिमत्वाबद्दल लिहायचे म्हणजे एक आव्हान होते पण इंद्रायणी यांनी कमाल केली आहे.

लोकसंस्कृतीचा आदिम नाद (भाग दोन)

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

खरी गोष्ट आहे. हळुहळु आपल्याच रुढी परंपरांपासुन माणसे दुर जात चालली आहेत. बादवे- पुरलेले प्रेत उकरुन मुख दर्शन घेण्यामागे काय कारण असावे?

धन्यवाद राजेंद्र मेहेंदळे जी.. आठवणी चाळवणे.आपल्या माणसाचा चेहरा पुन्हा पाहणे. असे काही हेतू या मागे असावेत.

प्रचेतस 02/02/2018 - 19:22
लेख आवडला. मध्यंतरी कै. मुरलीधर खैरनार ह्यांच्या शोध कादंबरीत काही प्रथांचं तपशीलवार वर्णन वाचलं होतं. चिरा बसवण्याचा कार्यक्रम म्हणजे काय?

In reply to by प्रचेतस

सालदार 20/02/2018 - 13:41
चिरा बसवणे म्हणजे, घरातिल मृत व्यक्तिंच्या नावाने दगडाच्या मूर्तींची प्रतिस्ठापणा करणे. चिरा = दगड मी ह्या कार्यक्रमात साग्रसंगित भाग घेतला आहे. ज्या दिवशी चिरा बसवतात त्याच्या आधल्या दिवशी संध्याकाळी दगडी मूर्ती मूर्तीकाराकडून आणल्या जातात आणि घरात सजवून मांडल्या जातात. मग त्या मूर्तींसमोर रात्रभर जागरणाचा कार्यक्रम असतो. सकाळी ५ विर (भाऊबंदकितील लोकं) तयार केले जातात. विरांच्या अंगावर नवी साडी फुलीच्या(X) आकारात गुंडाळली जाते. प्रत्येक विराच्या हातात तलवार दिली जाते (तलवार लोखंडी असते आणि नाहीच मिळाली तर लाकडी असते) आणि तलवारीच्या टोकाला लिंबू लावला जातो. मग बैलगाडीवर चिरा ठेवल्या जातात आणि त्यासमोर हे विर वर्तुळात नाचत निघतात. सगळे विर ओरडत असतात "विरो विरो विरो विर". डफ वाजत असतो. गावातील इतर परिवार हंड्याने रस्त्यावर पाणी ओततात आणि त्या पाण्याच्या खुणेवर विर नाचत पुढे जातात. हे सगळे जात असतात ज्या ठिकाणी चिरा बसवायच्या आहेत तिकडे. तिथे पोहचल्यावर मग बोकड, मेंढा आणि कोंबड्याचा बळी दिला जातो (काही लोकांना हे आवडणार नाही, पण मी पाहीलं ते असच होतं). त्यानंतर एका ओट्यावर चिरा बसवल्या जातात व स्वयंपाकाला सुरुवात होते.

- डॉ. सुधीर रा. देवरे मित्राबरोबर दळवटजवळच्या कोसुर्डे गावाच्या रानखळीवर प्रत्यक्ष कोकणा लोकांच्या डोंगर्‍या देवाच्या भक्‍तांचा अनुभव घेतला. रात्रभर त्यांच्याबरोबर थंडीत थांबलो. त्यांच्या सोबत भुज्या नावाचा कुठलीही चव नसलेला पदार्थ खाल्ला. नागलीची भाकर खाल्ली. कडाक्याच्या थंडीत शेकोटी शेजारी बसून संपूर्ण रात्र डोंगर्‍या देवाच्या उपासकांचा नाच, अंगात घेण्याची पध्दत, काकडा आणि चिमटा उघड्या अंगावर मारून घेण्याची पध्दत, त्यांचे आदिम हुंकार, नाच पहात, थाळीवरची कथा ऐकत थंडीत कुडकुडत बसलो. शिवार देव, वाघ देव, नागदेव, भूते यांची लोकश्रध्देच्या मुळातून माहिती भक्‍तांकडून काढत होतो.

प्रवास

शिव कन्या ·
प्रवास तो म्हणाला, ‘मोना, प्लान चेंज! अब हम रेलसे नहीं, driving करके जायेंगे!’ त्याने गाडी बाहेर काढली, तेव्हा ती तिच्या कोषातून बाहेर पडली . गाडी शहरातील धूळधूर अंगावर घेत, गर्दीतून वाट काढू लागली. गाडी शहराबाहेर आली, त्याला तरतरीत वाटू लागले.....

कळ

शिव कन्या ·

मिसळपाव 07/01/2018 - 05:39
सुरेख लिहिलंय. अनुप जलोटाने गायलेली एक गझल आहे, कोणी लिहील्येय ते आठवत नाही आता - "तुम्हारे शहर का मौसम". या लिखाणावरनं त्यातला एक शेर आठवला; तुम्हारे बस मे अगर हो तो भूल जाओ हमे, तुम्हे भुलाने मे शायद हमे जमाना लगे ... टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

सस्नेह 12/01/2018 - 13:10
मनातील खोलवरच्या विचारांचे बारकावे छान टिपले आहेत. रच्याकने, एखादा पुरुष इतक्या हळुवार नि भावुक अंत:करणाचा असतो ?

शिव कन्या 19/01/2018 - 08:02
अभ्या भाऊ, प्रचेतस, एस.... मन: पूर्वक धन्यवाद. पुरुषांचे हृद्य इतके हळूवार असते का?..... स्नेहांकिता ताई.... असणार, त्याशिवाय वरील पुरुष वाचकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या नसत्या. लिहिताना मलाही किंचित ही शंका आली होती, पण तरीही, हृदयावर विश्वास ठेवून लिहिली.

कळ .... तिच्या हसऱ्या फोटोवर एक नजर फिरवली. सगळे प्राण बोटाच्या अग्राशी आणून डिलीटचा ऑप्शन वापरला. मोबाईल बंद केला. एक भला मोठ्ठा दगड मनाच्या दाराशी ठेवला आणि कौशिकदा उठले. Backstage वाले आपापल्या कामात मग्न होते. खिळे, फळकुट, हातोडे, गिरमीट, हा कपडा, तो स्टूल, तो आरसा, ही पिशवी कुठे अडकवायची.... एक ना दोन! शुभारंभाच्या प्रयोगाची तारीख जवळ येत होती. तयारी जोरात चालू होती. कौशिकदा या नाटकाचे दिग्दर्शक. सगळी हयात ‘नाटक’ या एकाच विषयात गेलेली. आपण केलेली नाटकं संख्येत मोजण्यात त्यांना फारशी रुची नव्हती. सतत नाविन्याचा ध्यास. प्रयोग करीत रहायचे.

सांस्कृतिक भारत (संक्षिप्त)

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
- डॉ. सुधीर रा. देवरे भारत देशाची राजधानी दिल्ली असून भारताचे सर्वात मोठे शहर मुंबई हे आहे. भारताची आर्थिक राजधानी सुध्दा मुंबईच आहे. देशाचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,287,263 चौरस किमी इतके आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 1,210,854,977 इतकी आहे. (आजची-2017 ची लोकसंख्या 1,293,057,000 इतकी असावी.) भारताची साक्षरता 86.43 टक्के असून राष्ट्रीय अधिकृत भाषा हिंदी आणि इंग्रजी या असल्या तरी देशात त्या त्या राज्यात त्या त्या प्रांतीय भाषा अधिकृत मान्यताप्राप्त आहेत.

कमलताल

शिव कन्या ·

पलाश 30/12/2017 - 02:29
सुरेखआणि चित्रदर्शी. आजही, आवाजाचा कंटाळा आला कि तुझे मौन आठवते. काही असुंदर दिसले, कि तुझे राजीव रूप आठवते.... आणि तोडलेली फुले पाहिली, कि तुझ्यात खोल रुजलेले असंख्य पद्म आठवतात. हे फारच आवडलं.

(ताल = सरोवर) प्रिय कमलताल, मी आता फार फार दूर निघून आलेय. पण जेव्हा वारा स्तब्ध होतो, पानही हलत नाही तेव्हा, मन थेट तुझ्यापाशी जाऊन पोहचते. कितीही चाललो तरी पाय न दुखण्याचा एक काळ असतो. पहाटे उठावे. पाठीवर सॕक टाकावी. मिळेल ते वाहन घ्यावे. फारसे गुगल न करता, उंच उंच हिमालयात गुडूप व्हावे. तो पर्वतराज संपन्न. त्याची अगणित शिखरे. हे पार करेपर्यंत ते, ते पार करे पर्यंत ते, आणखी पुढची, आणखी पुढची शिखरे. प्रत्येक शिखर कोरीव. आकाशाला कातणारे. या शिखरांच्या पायथ्याशी कुठे कुठे माणसांची वस्ती. फार विरळ. अशीच चालून चालून दुपार उलटली. ते चालणे फार लयदार असे. उंच उंच झाडांतून जाणारी नागमोडी वाट.

मजूर

शिव कन्या ·
मजूर .... 'संध्याकाळ झाली कि बरं वाटतं. दिवसभरातली अंगावरची वाळू सिमेंट झटकली जाते. चहापाणी होऊन, अंगावर असे बरे कपडे येतात. हातात आपला खटक्यांवर चालणारा मोबाईल येतो. स्क्रीनवाला नवा घेईन ..... पण बघू. घरी पैसे पाठवायचेत. घरी पैसे पाठवण्यासाठी तर इतक्या दूर आलो. मागच्या वर्षी सुरु झालं होतं हे बांधकाम. बरोब्बर एका वर्षात ही उंचच उंच इमारत उभी राहिली. तसे मला इथे येऊन दोन वर्ष झाली ...... हं, वर्षदोनवर्षं होताच घरी जायला मी काय इंजिनीअर नाही. झालो असतो का इंजिनियर? १२ वी पर्यंत नेटाने शिकलोच. पण गरिबी, भूक........