मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साहित्यिक

चिंब

कोमल ·
लेखनप्रकार
बऱ्याच दिवसांनी पाऊस पुन्हा सुरू झाला आणि ती धावत गच्चीवर पोहोचली. पावसाचं आणि तिचं नातं खूप जुनं. ती जन्माला आली आणि मोठी झाली ती अशाच भरपूर पाऊस पडणाऱ्या नगरीत. बाकी लोक जसं म्हणायचे "मी बरेच पावसाळे पाहिलेत" तसं ती म्हणायची "बऱ्याच पावसाळ्यांनी मला पाहिलंय". आणि खरंच तर होतं ते. तिच्या जन्माच्या वेळी वेड्यासारखं बरसून त्यानंही आनंद साजरा केलेला. पहिल्यांदा दप्तर पाठीवर लावून, त्यावरून रेनकोट घालून ती जशी शाळेला जायला निघाली तसा तोही आलाच. पहिल्या दिवशी खिदळत शाळेत पोहोचणारी ती एकटीच. आणि मग तर तिला सवयच लागली, पाऊस आला की दप्तराला रेनकोट घालायचा आणि आपण चिंब भिजत घरी यायचं.

स्वैपाकघरातून पत्रे ३

शिव कन्या ·
प्रिय अन्नपूर्णा, तू जेव्हा कुणाला कौतुकाने सांगतेस ना, आज अठरा वर्षे झाली पण या किसणीची धार जश्शीच्या तश्शी आहे, तेव्हा माझे खवल्याखवल्याचे अंग मोहरून येते. माझ्यावर खराखरा होऊ लागले कि मुळा, काकडी, गाजरं, रताळी, बटाटे, खोबरं यांची मस्ती अशी जिरते, मला फार मज्जा वाटते. I enjoy it. तुम्ही लोक माझ्या नावाचा इंग्रजी किस’शी चाबरट संबंध जोडून, कोट्या करता ना........., मी ऐकते ते! आधी मला माहित नव्हते इंग्रजी ‘किस’ म्हणजे काय ते!

आठवणी

चंद्रकांत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
‘आठवणी’ एक लहानसाच, पण अर्थाचे अनेक आयाम असणारा शब्द. आनंदाच्या पाकळ्या घेऊन उमलत राहणारा, कधी वेदनांच्या व्यथा घेऊन कोमेजणारा. आठवणी समुद्रासारख्या अथांग. आभाळासारख्या अफाट. क्षितिजासारख्या अमर्याद. आयुष्याच्या वाटेवरून प्रवास घडताना इच्छा असो, नसो स्मृतींची सोबत घडत राहते. कुणासाठी त्या आनंदाचं अभिधान असतात, तर कुणासाठी वेदनांचे वेद. आठवणींचं पाथेय घेऊन निघालेली माणसे सुखांचे कवडसे हाती लागताना हरकतात. पदरी पडणाऱ्या वंचनेच्या वेदनांनी विकल होतात. त्यांचं असणं, नसणं जेवढं कालसापेक्ष तेवढंच परिस्थितीसापेक्ष. आठवणींच्या ओलाव्याने मनाचं आभाळ भरून येतं.

पॉझीटीव्ह

शिव कन्या ·
लेखनप्रकार
( सत्तर शब्दांची लघुतम कथा लिहिण्याचा प्रयोग. ) पॉझीटीव्ह ...... त्याने चादर डोक्यावर ओढली. गुडूप अंधार. जग संपले. आता फक्त झोप. तेवढ्यात मेसेजची रिंग वाजली. बघणे भागच होते. त्याने मोठ्या कष्टाने पांघरूण बाजूला केले. स्क्रीनवर तिचा मेसेज चमकत होता, ‘पॉझीटीव्ह’. ‘Abort.’ याने इकडून मेसेज पाठवला. रडण्याची स्मायली तिकडून. ‘Don’t cry. Me too positive.’ ‘What?’ ‘Just got the reports. HIV positive.’ त्याने सरळ फोन बंद केला. त्याला याक्षणी काहीच, कुणीच नको होते. चादर ओढली. गुडूप अंधार. जग संपले. आता फक्त झोप. - शिवकन्या

लेखणी का कीबोर्ड ? (उत्तरार्ध)

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पूर्वार्ध इथे आहे: https://www.misalpav.com/node/42843 * * * * * * इ-माध्यम सध्या यांत प्रसिद्ध होणारे साहित्य ते साधारण ३ गटांत मोडते: १. वैयक्तिक अनुदिनी: येथे एखादा लेखक त्याचे लेखन स्वतःच जालावर नियमित प्रसिद्ध करतो. या प्रकारे जगातील कोणीही इच्छुक लेखक बनू शकतो आणि मनसोक्त, विनाअडथळा लिहू शकतो. २. संस्थळे: यांना एक प्रकारे जालावरची नियतकालिके म्हणता येईल. ३. इ-पुस्तकांची निर्मिती. या लेखाचा उद्देश मुख्यतः छापील व इ-नियतकालिकांची तुलना करण्याचा असल्याने (मराठी) संस्थळांना केंद्रस्थानी ठेऊन आढावा घेतो. अजून एक स्पष्टीकरण.

लेखणी का कीबोर्ड ? (पूर्वार्ध)

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पंधराव्या शतकात लागलेला छपाईयंत्राचा शोध हा खरोखर क्रांतिकारक होता. त्यापूर्वी उपलब्ध ज्ञान हे केवळ हस्तलिखित स्वरुपात साठवता येत असे. त्यामुळे त्याच्या समाजप्रसाराला खूप मर्यादा होत्या. छपाईचे तंत्र जसे विकसित झाले, तसे अधिकाधिक माहिती व ज्ञान बहुसंख्यांपर्यंत पोचू लागले. त्यातूनच समाजात लेखनपरंपरा विस्तारली. शिक्षणाच्या प्रसारातून अनेकजण लेखन करू लागले. त्याला छपाईची जोड मिळाल्याने छापील मजकुराची निर्मिती होऊ लागली. अशा प्रकारे ज्ञानप्रसार वेगाने आणि दूरवर होऊ लागला. निरनिराळ्या प्रकारची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी विविध छापील माध्यमे निर्माण झाली.

ग्रामीण आणि इतर वाद्य

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे तीस चाळीस वर्षांपूर्वी गावात बँड हा प्रकार फोफावला नव्हता. बँड अस्तित्वात असला तरी तो फक्‍त जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या गावी पोचला होता. तरीही अतिश्रीमंत घरातल्या लग्नात दूरवरून गावात बँड बोलवला जायचा. म्हणून अशा बँड ‍लावल्या गेलेल्या लग्नाची मजा पाहण्या- ऐकण्यासाठी आख्‍खा गाव जमा व्हायचा. बँडची नवलाई आख्या गावाला भुरळ घालायची. अन्यथा गावात गुरवचा वाजा वा सांबळचा वाजाच लग्नात वाजवले जायचे. आता तर सगळीकडे डीजेचा आवाज धुमाकूळ घालू लागला. तेव्हा सांबळाचा वाजा गावकुसात लोकप्रिय होता. सांबळाच्या वाजावर कोणालाही कोणत्याही चालीवर सहज नाचता येत असे.

बांडगूळं

चांदणे संदीप ·
काव्यरस
बांडगूळं आधीही दिसायची… पण, ती रानात. राईतल्या भल्याथोरल्या झाडांवर… ....जुन्या खोडांवर. आता मात्र ती दिसतात अगदी कुठेही… म्हणजे... रोपांवर वगैरे. इथपर चाललं असतं पण आता ती यायला लागलीत तणांवर.. माजलेल्या… …विचारांच्या तणांवर! संदीप चांदणे (११/६/२०१८)

आईचा मुलगा

शिव कन्या ·
साठ्ये आजी म्हणत,' काय गं तुम्ही पोरी! रात्रीबेरात्री फिरतां! घरं दारं सोडून इथे शिकायला येता, कि असे गुणं उधळायला येता?' त्यांचे म्हणणे कोsssणी कानात घालून घेत नसे, मनावर तर नाहीच नाही. त्या आठ मुली आपापसांत नेत्रपल्लवी करत आणि निघून जात. त्या काहीच न बोलता गेल्या, कि आजी आणखी खवळत. ‘अपर्णा गो, अपर्णा, कुठे गेली ही?’ अपर्णा, त्यांची एकुलती एक सून वरच्या मजल्यावर रहात असे. पण आजींच्या लक्षात रहात नसे. आपल्यापासून आपला मुलगा आणि सून वरच्या मजल्यावर वेगळे राहतात, हे त्या विसरून जात. तासभर अपर्णा अपर्णा करीत. जयंता मग तळमजल्यावरच्या ऑफिसमधून आईला पहायला मध्येच डोकवायचा.

अ का पेला - A cappella

राघवेंद्र ·
अ का पेला - A cappella हे नाव तसे जुनेच म्हणजे १५ व्या शतका पासून अस्तित्वात आहे. इटालियन भाषेतील हे नाव म्हणजे प्रार्थनेचे गाणे कुठल्याही वाद्याशिवाय एकटयाने किंवा समूहाने म्हणायचे असते. तसेही आपल्या संस्कृती मध्ये प्रार्थनेचे पाठ कुठल्याही वाद्याशिवाय म्हणले जातात. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत नव्या पद्धतीने हा प्रकार प्रचलित झाले. या मध्ये शाळा -कॉलेजमधील विदयार्थी समुहात गाणी म्हणु लागली. वाद्याऐवजी टाळ्या, पायाचा ठेका याचा वापर सुरु झाला.