✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

प्रिय मायमराठी

श
शिव कन्या यांनी
Tue, 02/27/2018 - 07:03  ·  लेख
लेख
प्रिय मायमराठी, तुझा प्रांत सोडून तब्बल एक तप उलटून गेले, म्हणूनच कदाचित् तुझी आठवण इतर कुणाहीपेक्षा माझ्या मेंदूत जास्त येरझाऱ्या घालत असावी. तुला न ऐकणे म्हणजे, कान असून श्रवण नसणे. तुला न वाचणे म्हणजे, डोळे असून आंधळे असणे. तुझे देवनागरी रूप महिनोंनमहिने नजरेस पडत नाही, तेव्हा डोळे दुखून येतात. लहानपणी, कुठल्याही परप्रांतातून घरी परतताना, तुझ्या साजिऱ्या रूपातला फलक वाचला कि डेरेदार सावलीत परतल्यासारखे वाटायचे. चित्रविचित्र लिपींचा न कळणारा प्रांत सोडून तुझ्या कळणाऱ्या रूपाशी आले, कि सुखरूप वाटायचे. आज परदेशातून विमानतळावर पाऊल पडताच, ‘छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत,’ हे वाचले कि डोळे निवतात. तू फलकावर जन्मांतरीची ओळख घेऊन उभी असतेस. त्या ओळखीवर मी कधीच घर गाठलेले असते. प्रत्यक्ष सहवास नसतो, तेव्हा आठवण जास्त तीव्र होते. युरोपातील छोटे छोटे देश, आपापल्या भाषेत सगळे व्यवहार स्वतंत्रपणे करताना पहायची, तेव्हा तुझे स्वतःच्या अस्तित्त्वासाठी झगडणारे रूप आठवून, कसनुसे व्हायचे. स्वभाषेच्या उंबरठ्यात राहून, परक्या भाषेचे यथास्थित आदरातिथ्य करून, घरची मानमर्यादा सांभाळणाऱ्या अरबांना पाहते, तेव्हा तुझ्या घरात उर्मट घुसखोरी करणाऱ्यांकडे कौतुकाने पहात, त्यालाच प्रगतीचे लक्षण मानणाऱ्या बुद्धिवंतांसमोर, मी क्षणभर हतबल होते. इंग्रजी भाषा उत्तम येत असूनही, केवळ स्वतःच्या भाषेवरील उत्कट प्रेमापोटी आपल्याच भाषेत आजन्म उत्तमोत्तम लिहिणारे साहित्यिक पाहते, तेव्हा तुझी आठवण येते. तुम्ही जगातल्या कुठल्याही देशातून या, पण इथे आलात कि तुमच्या मुलांनी आमच्या शाळेत, आमची भाषा शिकली पाहिजे, असा नियम पाहते, तेव्हा तुझ्या माध्यमात चालणाऱ्या शाळा धडाधड बंद करणाऱ्यांचा संताप येतो. तुझी आठवण आणखी तीव्र होते. .....आज तर, तुझी बाजू घेणे म्हणजे पाप ठरवले जातेय. म्हणजे मग तुम्ही प्रांतवादी, झापडबंद मागास, स्वतः चीच लाल म्हणवून घेणारे! तुम्हाला इंग्रजी येत नाही, म्हणून तुम्ही मराठीचे गोडवे गाता, बाकीच्या भाषेत गोते खाता, तुम्ही कद्रू.... एक काय दहा आरोप. तुझ्यावरील प्रेमापोटी हे सगळे आरोप क्षणभर मान्य, पण आरोप करणारे तरी कुठल्या इतर भाषेची चांगली धन करतात? तुझ्याशी सवतासुभा करायचा, आणि परक्या भाषेत ‘आमचा मान राखा’ म्हणत हिंडायचे! केवळ इंग्रजी येणे म्हणजे विद्वत्तेचे झेंडे गाडणे, या पांगळ्या मानसिकतेतून लोक बाहेर येवोत, ही आजच्या दिवशी सदिच्छा. माय मरो, मावशी जगो, ही म्हण मला तुझ्याबाबतीत तर्कदुष्ट वाटते. मायशिवाय मावशीचे नाते तयारच होत नाही. आधी माय, मग मावशी. जन्मापासूनचा ‘आईsssssss’, ते मरे पर्यंतचा ‘आई गं’ तुझ्याशिवाय शक्य नाही, तिथे तुझे उपकार कसे आणि किती मानायचे! तू ‘राजभाषा’आहेस, “अभिजात”ही आहेसच, तुला तो दर्जा सरकार दरबारी मिळायचा तेव्हा मिळो! बाकी तू ज्ञानभाषा व्हावीस, म्हणून जगातल्या कुठल्या कुठल्या कोपऱ्यात शांतपणे काम करत राहणाऱ्या माझ्या सहोदरांना आजच्या दिवशी अभिवादन. तुझ्याविषयी प्रेम, कौतुक, अहंकाराचा वारा न लागलेला अभिमान, परकीय भाषांची मुलुखगिरी करून, परत तुझ्याच उबदार, मायाळू कुशीत विसावण्याचे आमचे शहाणपण अबाधित राहो. तू आमची ओळख आहेस, हे खरेच, पण आमच्यामुळे तुझी ओळख समृद्ध होईल, असा आमचा जगाशी आणि स्वतःशी व्यवहार राहील, ही खात्री देते. हे सगळे लिहिणे तुझ्यामुळे, तुझ्यासाठी आणि शेवटी तुलाच अर्पण. तुझी, शिवकन्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
वाङ्मय
भाषा
साहित्यिक
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
7251 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

मनापासून लिहिलंय. आवडलं.

एस
Tue, 02/27/2018 - 08:22 नवीन
मनापासून लिहिलंय. आवडलं.
  • Log in or register to post comments

छान

manguu@mail.com
Tue, 02/27/2018 - 08:50 नवीन
छान
  • Log in or register to post comments

मस्तच एकदम.

अभ्या..
Tue, 02/27/2018 - 09:09 नवीन
मस्तच एकदम. म मायेचा म मातीचा म मानाचा म मराठीचा म मनापासूनचा
  • Log in or register to post comments

अभ्या भौ

शिव कन्या
Tue, 02/27/2018 - 19:56 नवीन
म मिसळपावचा म मनापासून आवडला फलक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

खूप छान..

श्याम वामने
Tue, 02/27/2018 - 10:24 नवीन
खूप छान..
  • Log in or register to post comments

सुंदर

नूतन
Tue, 02/27/2018 - 10:35 नवीन
सुंदर सहमत
  • Log in or register to post comments

छान

श्याम वामने
Tue, 02/27/2018 - 10:54 नवीन
खूपच छान
  • Log in or register to post comments

@ शिव कन्या, लेख आवडला.

अनिंद्य
Tue, 02/27/2018 - 10:58 नवीन
@ शिव कन्या, लेख आवडला.
  • Log in or register to post comments

नेटका तरीही अनेक मुद्द्यांना

पलाश
Tue, 02/27/2018 - 15:04 नवीन
नेटका तरीही अनेक मुद्द्यांना स्पर्श करणारा हा प्रामाणिक लेख फार आवडला.
  • Log in or register to post comments

सुंदर मनोगत ! खूप आवडले !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 02/27/2018 - 15:08 नवीन
सुंदर मनोगत ! खूप आवडले !
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

अभिजीत अवलिया
Tue, 02/27/2018 - 15:14 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

सुबक लेख !

सस्नेह
Tue, 02/27/2018 - 15:36 नवीन
सुबक लेख !
  • Log in or register to post comments

+11

प्राची अश्विनी
Tue, 02/27/2018 - 17:39 नवीन
+11
  • Log in or register to post comments

रसिक भाषाप्रेमींचे मनापासून

शिव कन्या
Tue, 02/27/2018 - 19:57 नवीन
रसिक भाषाप्रेमींचे मनापासून आभार.
  • Log in or register to post comments

लेख आवडला

पैसा
Tue, 02/27/2018 - 22:45 नवीन
लेख आवडला
  • Log in or register to post comments

लेख सुरेखच. छान लिहिलंय, अगदी

पद्मावति
Tue, 02/27/2018 - 22:56 नवीन
लेख सुरेखच. छान लिहिलंय, अगदी मनापासून. आणि याला पण म मिसळपावचा म मनापासून आवडला फलक. +१. खरच सुरेख फलक.
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

निशाचर
Wed, 02/28/2018 - 07:25 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा