मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साहित्यिक

'संस्कृती आणि समाज’

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे आज संस्कृती हा शब्द कोणी नुसता उच्चारला तरी आपण त्या व्यक्‍‍तीकडे चमकून पहावे अशी या शब्दाची जादू वा दहशत निर्माण झाल्याचे लक्षात येते. देशात किमान ज्या बाबींचे राजकारण होऊ नये असे वाटते त्या गोष्टींचेही राजकारण होऊ लागल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक व्यक्‍तिगत बाबींचे राजकीयकरण होऊन त्यावर राजकारण करणे सोपे झाले आहे. आज संस्कृती या संज्ञेचेही राजकीयकरण अगदी ठरवून होत असल्याचे लक्षात येते, नव्हे संस्कृती हा राजकारणाचा प्रमुख मुद्दा होऊ पहातोय की काय अशी शंका येऊ लागते.

अरि

शिव कन्या ·
लेखनप्रकार
अरि ....... त्यावर्षी पहिल्यांदाच एका भारतीय मुलाने शाळेत admission घेतली. अरिंधम त्याचे नाव. पण इतके अवघड नाव काय या अरबी मुलामुलींना घेता येईना. साहजिकच त्याचा अरि झाला. अकरावीत शिकत होता. तो म्हणजे आम्हा सर्व भारतीय शिक्षकांच्या जिव्हाळयाचा विषय! माझ्या जास्त जवळचा. कारण त्याने अकरावीला इंग्लिश साहित्य ठेवले होते, आणि पंजाबी असून महाराष्ट्रात बरीच वर्षे काढल्याने चांगले मराठी यायचे. म्हणजे, आमचे किती गूळपीठ असेल पहा!! तर वार्षिक क्रिडा महोत्सव सुरु झाला. हा जोश, हा उत्साह!!

( काल रातीला सपान पडलं )

गबाळ्या ·
हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. ) गेल्या काही दिवसांत मी काही कवींचे व त्यांच्या कवितांचे विडंबन केले. खरे तर एखाद्या कवीचे काव्य दुसऱ्या कोणाला नवनिर्मितीसाठी / विडंबनसाठी प्रोत्साहित करत असेल तर त्याचे श्रेय मूळ कविलाच जाते. त्यामुळे मूळ कवीचे श्रेष्ठत्व आणखीनच वाढते. मूळ कवीने विडंबन हे त्यांच्या कवितेचा अनादर आहे असे मुळीच समजू नये.

नवा कवी

गबाळ्या ·
मिपा ने सर्व साहित्यिकांसाठी खुला मंच उभा करून या युगातील एक महत्कार्य केले आहे. खुला मंच, फुकटात प्रकाशन आणि फुकटात श्रोते. हे म्हणजे नवकवींच्या हाती लेखणी दिल्यासारखेच झाले. आम्ही या सर्व नवकवींचे खंदे समर्थक आहोत.

कविराज

गबाळ्या ·
नमस्कार मिपाकर! मी मिपाचा नवीन सदस्य. तुमच्यासाठी एक रचना घेऊन आलो आहे. तुमच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे. अगदी परखडपणे तुमच्या प्रतिक्रिया मांडा. मग त्या सकारात्मक असोत, नकारात्मक असोत, तटस्थ असोत वा सल्ले/उपदेश असोत. स्वयंसुधारणेसाठी मला त्याचा नक्कीच उपयोग होईल. ( कवीला व्यासपीठ मिळणं, श्रोते मिळणं, हि पर्वणीच आहे. आणि कोणा कवीला जर श्रोते स्वतःहुन म्हणत असतील कि आम्ही तुमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत, तर ते त्या कवीचं अहोभाग्यच. असं भाग्य एका नवकवीच्या वाट्याला आलं. त्याची हि कविता.

राजाची नियत

शिव कन्या ·
लेखनप्रकार
राजाची नियत आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. राजा फार दयाळू आणि प्रजेचे हित पाहणारा होता. वेश पालटून आपल्या राज्यात फिरे. लोकांची सुख दुखे समजून घेई. एकदा फिरता फिरता एका गावात पोहचला. तहान लागली होती. दूर एक लहानसे घर दिसले. घरा भोवती ऊसाचा मोठा मळा होता. तिथे गेला. एक म्हातारी सामोरी आली. त्याने प्यायला पाणी मागितले. ती शेतात गेली. एक उस तोडला. उभ्या कांडक्यावर आडवा कोयता मारला. एक मोठा ग्लास भर रस निघाला. राजा बघतच राहिला! उसावर कोयता मारायचा अवकाश कि लगेच एवढा रस! रस पिऊन राजा तृप्त झाला. त्याने विचारले, ‘माई, हा काय जादूचा ऊस आहे का? इतका रस?

चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत

गंगाधर मुटे ·
लेखनप्रकार
१८ नोव्हेंबर २०१७ : महाराष्ट्र टाईम्स । मुंबई
 

चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत

दिवाळी अंक 2017

बोबो ·
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी !! कळविण्यास आनंद होतो की, यावर्षी खालील आठ दिवाळी अंकांमध्ये माझ्या कथा प्रकाशित झाल्या आहेत. १. आवाज - 'सनी दिवानी, आबा बंगाली आणि सदा' ही हलकीफुलकी कथा २. जत्रा - 'मिसळ खाणारी मुलगी' ही खुसखुशीत प्रेमकथा ३. धनंजय - 'पॉईंग' ही मनोरंजक विज्ञान कथा ४. मेहता मराठी ग्रंथजगत - 'सूड नावाची डिश' ही रहस्यकथा ५. सा. वार्तासूत्र (मराठी साहित्य परिषदेच्या कथास्पर्धेतील पारितोषिक विजेती कथा) - 'देखी जमाने की यारी' ही प्रेमकथा ६. वर्ल्ड सामना - 'नियतीचा संकेत' ही हलकीफुलकी प्रेमकथा ७.

कागदाचे झाड

शिव कन्या ·
प्रिय जिब्रान खलील, माझ्या लाडक्या मुला, कसा आहेस? देवाने तुला आता भरपूर कागद दिले असतील. पण आता तुला लिहायची इच्छा नसेल, कि अजूनही आहे? माहित नाही. आज तुला पत्र लिहावेसे फार फार वाटत आहे. काल रात्रभर तुझी आठवण येत राहिली, येतच राहिली. तू छोटासा. अरेबिक शब्द, वाक्यं लिहायचा छंद तुला. आईला म्हणालास, ‘आई, मला कागद दे ना आणून! मला लिहायचेय!’ तिने आजूबाजूला पाहिले. घरावर जप्ती येऊन ते दुसऱ्याच्या ताब्यात गेलेले. नवरा तुरुंगात. पदरात छोटी मुले.धर्माची बंधने. बाहेर अंदाधुंदी. छोटीमोठी कामे करून कशीबशी हातातोंडाला गाठ घालीत असे. तिने एकवार तुझ्याकडे असे पाहिले....

आठवणीतील दिवाळी

शिवम काटे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लहान असताना दिवाळीची चाहूल महिना-दीड महिना आधीच लागायची. हलकी हलकी गुलाबी थंडी पडायला सुरुवात झालेली असायची. शाळेत सहमाहीचा जवळपास सर्व अभ्यासक्रम शिकवून झालेला असायचा. शिक्षक मुलांची उजळणी घेण्याच्या उद्योगात गुंतलेले असायचे कारण सहामाही परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं असायचं. बच्चेकंपनीला तर कधी एकदाची परीक्षा होते आणि कधी मामाच्या गावाला आजी-आजोबांकडे पळतोय अस व्हायचं.