Skip to main content

रेखाटन

आज मी पुन्हा नापास झालो

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 18/06/2019 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी पुन्हा नापास झालो पुढल्या वेळेस नक्की पास होईन हीच अशा मनी बाळगून पुन्हा जोमात तयारीला लागलो मम्मी पप्पा दोघेही घरी चिंतातुर असतील मला वाईट वाटू नये म्हणून हळूच रडत असतील मी ठरवलंय मनाशी घट्ट हार मानायची नाही देत जायचं असेच पेपरवर पेपर जोपर्यंत नीट कळत नाही कधीतरी उगवेल सूर्य माझाही कधीतरी असें मीही कुणाचा तरी बाप पण सालं माझं पोर माझ्यावाणीच निघालं तर होईल नको तो ताप कितीही झालं तरी मी माझी विकेट फेकणार नाही बापाने एवढा पैसा लावलाय माझ्यावर फुक्कट घालवणार नाही माहित आहे , मुद्दल वाढत चाललीय पण एक दिवस , व्याजासकट देईन परतावा त्याआधी मला या परीक्
Taxonomy upgrade extras

कागदफूल

लेखक इरामयी यांनी रविवार, 28/04/2019 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
मम्म्मी, what is bougainvillea? माझी छोटी मला विचारत होती. मी तिला बोगनवेलीचं चित्र दाखवलं, थोडीशी माहिती वाचून दाखवली आणि मग माझं मलाच कळलं नाही की माझं मन भूतकाळात कधी घरंगळलं ते. माझ्या लहानपणी आम्ही मुली बोगनवेलीच्या फुलांना कागदी फुलं म्हणत असू. उन्हाळ्याच्या सुट्टया लागण्याच्या जरा आधीपासून आजूबाजूच्या घरांच्या कुंपणांवर एखाद्या सिद्धहस्त कलावंताने चितारल्यागत लगडलेली ती गडद गुलाबी पर्णसादृश फुलं म्हणजे बोगनवेलीची फुलं. या बिनवासाच्या फुलांची मला आणि माझ्या मैत्रिणींना कसली मोहिनी होती काय जाणे!

(दाराआडची आई)

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 05/04/2019 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 15/10/2018 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे कथानक: मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३ https://www.misalpav.com/node/43228 लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी : किल्ल्याच्या दिशेने मी निघालो खरा, परंतु मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत अंधारातील अनोळखी, निसरड्या पायवाटांवरून चालणे शक्य नव्हते.

फुलांचा फोटो

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/05/2018 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
‘ती आज येईल, तेव्हा तिला सांगेन,’ मनोहर कॅमेऱ्याची लेन्स पुसता पुसता स्वतःशीच म्हणाला. ‘तिला कळत नसेल, असं नाही, पण तिच्या लक्षात आलं नसेल. आपल्यातरी कुठं लक्षात आलेलं आधी!?’ सोनेरी फ्रेममधून त्याने बाहेर नजर टाकली. पाचगणीचा table land सकाळच्या कोवळ्या उन्हात फार लोभस दिसत होता. आज या batchला घेऊन जायचं होतं. आधी या मैदानावरून एक चक्कर, मग दऱ्याखोऱ्यात , जंगलात .....निसर्गाची प्रत्येक फ्रेम सुंदर, कशाचेही फोटो काढा! .... अठरा मुलंमुली, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या. आज तिसरा, उद्या शेवटचा दिवस. उद्या संध्याकाळी सगळे पांगतील. पुन्हा गाठ पडतील, न पडतील.... मनोहरला हे नवे नव्हते.

(साहेब असेच) ठोकत राहा

लेखक खिलजि यांनी बुधवार, 02/05/2018 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
ठोकत राहा घडत जाईन बोलत राहा ऐकत जाईन येऊन दे मनातले बाहेर सारे कल्पनेला अनाहूत बळ मिळेल शब्दपंखानी उडत जाईन पोहोचेन सत्वर कवींच्या गावा सुंदर कविता लिहीत जाईन रांगतोय सध्यातरी असं वाटतेय हळूहळू तुमच्या जवळ येत जाईन प्रेमाने प्रेमाला जोडत जाईन ठोकत राहा असेच हळूहळू घडत जाईन शोधत राहा स्वतःमध्ये मला इथेच पुढे असेन तुमच्यासमोर जवळ येता जरा , दूर दूर जात राहीन बनायचंय थंडगार बर्फ़ावानी माया करा मजवर आपुल्या लेकरावानी कल्पनेच्या जगात रमतो मी गाठेन मना " उन्मनी " {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या

लेखक खिलजि यांनी सोमवार, 30/04/2018 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
तप्त झाली धरा सारी दहाही दिशा त्या पेटल्या दिनकराशी हात मिळवुनी उग्र होऊनि परतल्या ॥ मरूत व्यस्त, घाले गस्त थैमान चहूकडे माजले पशु, प्राणी, झाडे, पक्षी नद्या नाले भाजले ॥ रुक्ष झाले वृक्ष सारे सावलीपण महाग ती यत्र तत्र वणवा पेटला स्वस्त झाली आग ती ॥ कोपला तो, झोपला तो भक्ती कमी जी जाहली मोह मायेत प्राण सारे म्हणुनी झाली काहिली ॥ {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

स्टिकीन

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 02/04/2018 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire स्टिकीन १८८०च्या उन्हाळ्यात मी एका निमुळत्या कनूमधून फोर्ट रँगेलहून निघालो. मला वायव्य अलास्काच्या बर्फाळ प्रदेशाची पाहणी पूर्ण करायची होती. १८७९च्या हिवाळ्यात मला ही भटकंती अर्धवट सोडावी लागली होती. सगळे सामान, म्हणजे फार काही नाही, ब्लँकेट इ.इ. बोटीत चढल्यावर माझ्या इंडियन सोबत्यांचा निरोप समारंभ सुरु झाला.

टी.सी.

लेखक तिमा यांनी शनिवार, 03/03/2018 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
अपडाऊनच्या दिवसांतली गोष्ट आहे. मुंबईहून बोईसरला जाण्यासाठी त्यावेळी फक्त लांब पल्ल्याच्या गाड्याच उपलब्ध असत. त्यामधे रोज प्रवास करणार्‍या, माझ्यासारख्यांना, बसायला मिळणे मुष्किल असायचे. त्यावर पर्याय म्हणजे, विरारपर्यंत लोकलने जाऊन तिथून सुटणारी शटल सर्व्हिस पकडणे. आमच्यासारखे, वेळाचे फारसे बंधन नसलेले, हा पर्याय स्वीकारीत. हे शटल प्रकरण फार गंमतीदार होते. रेल्वेच्या लांबच्या प्रवासासाठी अयोग्य झालेल्या जुन्या पुराण्या बोग्या, स्क्रॅप यार्डात पाठवण्याआधी, या शटल साठी वापरत. सहाजिकच मग, प्रथम वर्गातही सीटस्,पंखे,बर्थ, ट्रे, आरसे इत्यादि गोष्टी मोडकळीला आलेल्या असत.

बक्षिस समारंभ (शतशब्दकथा)

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 16/02/2018 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
अरे बापरे..एवढी सगळी प्रशस्तीपत्रके ? कमीतकमी अर्धा तास तरी लागेल हा सगळा गठठा संपायला... आयोजकांनी हे आधी सांगायला नको का ? सगळीकडची हीच बोंब. ..नियोजन म्हणून काही नाहीच. आणि एवढं करून मिळणारे मानधन किती ? सात हजार फक्त. कोण कुत्र तरी विचारत का सात हजारला .. छ्या.. वेळ काही संपतच नाही आजचा. कधी एकदा हॉटेलवर जाऊन झोपतो अस वाटतयं.. ................................................................................ माहितेय आज मला बक्षिस मिळणार! फक्त अर्धा तास राहिला आता.. आला की नंबर माझा..धावत जाऊन बक्षिस घेतो आता.. बापरे..यात चक्क पन्नास रुपये आहेत ..एवढ्या पैशाच काय करावं ?