चहावाल्याचे पंख.....
- Read more about चहावाल्याचे पंख.....
- 31 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
चहावाल्याचे पंख.....
काय करतो? ......... चहा विकतो.
किती वर्षे झाली?........ चाळीसेक.
वय?...... साठीपार.
कर्ज?...... बरेच. कायमचे फेडतोय.
कशासाठी काढलेय?........ फिरण्यासाठी आणि shortfilm बनविण्यासाठी.
चौकोनी आयुष्य जगणाऱ्या मानसिकतेला अज्जिबात न पेलवणारा हा परिचय आहे श्री. हरि एम. मोहनन आणि त्यांची पत्नी मोहना यांचा!
केरळातल्या एर्नाकुलम् येथे गेली चाळीसेक वर्षे चहाचे दुकान चालविणाऱ्या या दाम्पत्याचे भटकंतीचे वेड कुणालाही आश्चर्य चकित करते. हातात पैसे असूनही कधीही आपल्या गावाशहराची वेस न ओलांडणारे लोक आहेतच!