प्रेरणा - तुकाराम पिच्चरवरील अनेक समीक्षा वाचून आमची झालेली कुंठितावस्था आणि एक सर्वाना परिचीत असलेले गाणे.
निवेदन - उगा छंद, यमक, मात्रा, वगैरे चूका काढू नयेत. भावनाओंको समझो !! :)
समिक्षेच्या वारीत मिळेना वाट हो...
कुणी म्हणे छान कुणी पुचाट हो...
आपली माणसं आपलीच नाती
तरी लेखकाची वाचकास भीती
तुकोबा.. कोणता झेंडा घेऊ हाती ||
आजवर ज्यांची वाचली समीक्षा
भलताच त्यांचा चेव होता…
पुरे झाली आता उगा माथेफोडी
तुकोबात माझा जीव होता
कळावा पिच्चर म्हणूनिया किती
लेखकच्या झूंडी इथे येती
वैरी कोण आहे इथे कोण साथी
तुकोबा ..