1) कोल्हापुरी चिकन मसाला.
रविवार निवांत बारा वाजेपर्यंत लोळून कंटाळा आला. मग मध्येच चिकन खायची हुक्की आली.
मनात आले की आज सुट्टी आहे तर हॉटेल मध्ये जाण्यापेक्षा स्वतःच बणवुया . लगेचच बाजारातून सगळे समान घेऊन आलो. जसे की चिकन, सुहना मसाला, कोथिंबीर, कांदे, तीळ, ओले खोबरे ई. आज काहीही झाले तरी झणझणीत चिकन बनवायचे आणि मिपावर पाककृती टाकून प्रतिसादांचा पाऊस पाडायचा असे मनात ठरवून मी स्वयंपाक घराकडे वळलो. चिकन बनवण्यासाठी जे काही मसल्याचे वाटण करतात ते करत असताना त्यात ओले खोबरे घालावे लागते.. मी मुद्दाम थोडे जास्त खोबरे घातले...