भूमिका :
हा लेख मार्गदर्शनपर व्हावा, अशी आमच्या संपादकांची (म्हणजे आमची) इच्छा आहे. कोणालाही मार्गदर्शन करण्यासाठी त्या विषयातले कळावे लागते, हा एक सार्वजनिक गैरसमज आहे. आपल्याला ज्या विषयातले काडीचेही ज्ञान नाही, त्या विषयावरही बोलता येते. फक्त त्यासाठी विद्वान असावे लागते. आजकालची सामाजिक परिस्थिती पाहता, प्रत्येकाला कोणत्याही विषयावर बोलता येणे ही एक प्रातिनिधिक गरज बनली आहे. (फक्त पुण्यातच नाही, कोठेही.) अभ्यास करून विद्वान होणे हे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच शक्य होत नाही. त्यामुळे झटपट विद्वान होण्याची सोय ही एक अत्यावश्यक गरज झाली आहे.