मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ज्योतिष

कार्ट्यांस...

नगरीनिरंजन ·
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

[ज्योतिष] ४ एप्रिलचा गुढीपाडवा- हिंदूंचा नववर्ष दिन अशुभ

युयुत्सु ·
लेखनविषय:
भारतीयांच्या मुहूर्तांसंबंधी काही चमत्कारिक कल्पना आहेत. त्या ठाम विश्वासाने ते पाळतात. गुढीपाडवा, दसरा कोणत्याही ग्रहयोगात सापडला असला तरी ते त्याला "शुभ"च मानतात. कोणत्याही पंचांगकर्त्या ज्योतिर्विदाने याची दखल घेतलेली मला तरी आठवत नाही. आता हेच बघा! दिनांक ३ एप्रिल २०११ रोजी सायन मेष राशीत १३ अंश ३३ मि वर अमावस्येची चंद्र-सूर्य युती होत असून ही अमावस्या अनेक अशुभ योग करते.

[ज्योतिष] सन २०११ मध्ये सक्रिय झालेले अपयशाचे मध्यबिंदू

युयुत्सु ·
लेखनविषय:
मागील एका पोस्टमध्ये अपयश आणि वैफल्याचे योग दाखवणार्‍या मंगळ-शनी = रवि ही रचना ज्या पत्रिकांमध्ये तयार झाली आहे, त्या पत्रिकांची जंत्री दिली होती. पण यातील सन २०११ मध्ये गोचर (म्हणजे चालू - इंग्लिशमध्ये ट्रान्झीट) ग्रहांमुळे सक्रिय असलेल्या जन्मतारखा कोणत्या हे कळले तर भाकीतात अधिक अचूकता आणता येईल. आता ही गोष्ट तपासायला ज्योतिषातील एक तत्त्व आपल्याला उपयोगी पडेल. ते असे, मंदगती (म्हणजे गुरु, शनी युरेनस नेपच्य़ून, प्लुटॊ) ग्रहांची भ्रमणे आयुष्यातील मोठी स्थित्यंतरे घडवून आणतात. तूर्त गुरु यातून आपण बाजूला ठेवू कारण तो सहसा "शुभ" मानला गेलेला आहे.

कोचिंग क्लासेस

प्रीत-मोहर ·
3

[ज्योतिष] दिनांक ५ मार्च २०११ रोजी होणारी मिश्र फलदायी अमावस्या

युयुत्सु ·
लेखनविषय:
दिनांक ५ मार्च २०११ रोजी सायन मीन राशीत १४ अंश ०० मि वर अमावस्येची चंद्र-सूर्य युती होत असून ही अमावस्या मंगळाशी सात अंशात युती करते. ही युती फार तीव्र म्हणता येणार नाही. पण गोचर मंगळाचा गोचर प्लुटोशी लाभ योग होत असल्याने अडकून पडलेली कामे मार्गी लावायला जी ऊर्जा लागते ती या अमावस्यामुळे बर्‍याच जणाना मिळू शकेल. पण काही जणाना गोचर शनीशी अमावस्येने केलेल्या quincunx (मला याचे मराठी नाव माहित नाही) या योगामुळे काही जणाना अमावस्या त्रासदायक ठरायची शक्यता आहे अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com

[ज्योतिष] अपयश आणि मध्यबिंदू ज्योतिष

युयुत्सु ·
लेखनविषय:
या अगोदरच्या पोस्ट मध्ये मध्यबिंदू ज्योतिषानूसार "अमाप यश" दाखवणार्‍या गुरु-प्लुटो= रवि या भौमितिक रचनेचा विचार केला. या वेळेला अमाप यशाच्या उलट म्हणजे अपयशी आणि वैफल्य निदर्शक मध्यबिंदूचा विचार करणार आहे. वैफल्य आणि अपयश यांचा विचार मंगळ आणि शनीच्या योगातून किंवा मध्यबिंदूतून केला जातो. मंगळ हा ग्रह कृती आणि उर्जेचा निदर्शक मानला जातो आणि शनी हा स्थैर्य, रचना, कायदा, अडथळे नीति-नियम इत्यादिंचा कारक ग्रह ज्योतिषात मानला गेलेला आहे. मंगळ आणि शनी एकाच वेळेला जर सक्रिय असतील तर संघर्षाला तोंड द्यावे लागते.

[ज्योतिष] आयुष्यातील उत्कर्ष आणि मध्यबिंदू ज्योतिष

युयुत्सु ·
लेखनविषय:
भारतीय ज्योतिषात योग ही एक गुंतागुंतीची कल्पना आहे. त्यात राजयोगाला विशेष स्थान आहे. राजयोगाची फले अनेक असू शकतात पण सहसा एका सामाजिक स्तरातून दूसर्‍या वरच्या सामाजिक स्तरात जाणा-या प्रयत्नवादी, धडपडणा-या व्यक्तींच्या पत्रिकेत राजयोग किंवा इतर शुभ योग कार्यरत असल्याचे मानाले जाते. पण इथे एक गोची आहे, ती अशी की भारतीय ज्योतिषात शुभ योग सतराशे साठ आहेत, शिवाय ते बाबा आदम च्या काळातले आहेत. राजयोगाना निष्फ़ल करणारे योग सतराशे साठ गुणिले दोन (कदाचित जास्तच) आहेत. त्यामुळे भारतीय ज्योतिष वस्तुनिष्टपणे अभ्यासणा-यांची भंबेरी उडते. पाश्चात्य जोतिषात इतकी गुंतागुंत दिसून येत नाही.

[ज्योतिष] दिलगीरी

युयुत्सु ·
लेखनविषय:
माझ्या अमावस्येवरील लेखात अनवधानाने अमावस्या सायन मिथुन राशीत आहे असा उल्लेख झाला आहे. कट न पेस्ट केलेला मजकूर नजरचूकीने पूर्ण संपादित झाला नाही. त्याबद्दल दिलगीर आहे. कुंभ रास बरोबर आहे. मिपा च्या नवीन अवतारात लेख संपादित कसा करायचा हे माहित नसल्याने ती चूक दूरूस्त करता आली नाही. त्याबद्दल क्षमस्व!

[ज्योतिष] दिनांक ३ फेब्रुअरी २०११ रोजीची अपघातदर्शक अमावस्या

युयुत्सु ·
लेखनविषय:
दिनांक ३ फेब्रुअरी २०११ रोजी सायन मिथुन राशीत १३ अंश ५१ मि वर अमावस्येची चंद्र-सूर्य युती होत असून ही अमावस्या मंगळाशी युती करते. मंगळ हर्षल बरोबर अर्धकेंद्र योग करत असल्याने अमावस्या प्रामुख्याने अपघातदर्शक बनली आहे. ज्या जन्म दिनांकाना ही अमावस्या विशेष त्रास देउ शकते त्या जन्म तारखांचे गणित करून पुढे दिल्या आहेत. खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत मंगळ सक्रिय होत असल्याने मंगळाने केलेल्या योगानुसार अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील. अधिक वाचण्यासाठी इथे भेट द्या...http://rajeev-upadhye.blogspot.com/2011/01/blog-post.html

व्याख्याच व्याख्या

स्पा ·
काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या. बघा आवड्तायेत का? अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर