मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रौद्ररस

<<बिन-पाण्याची दाढी>>

सुहास.. ·
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा : http://misalpav.com/node/21389 "तुझ्या हाती ब्लेड आहे" खुंट, खुंटच राहतात, तेव्हा वेदना वळावते, घोटतात नाजूक गालही! चेहरा जळत असला, तरी गळा रक्ताळलेला असतो- वरचा!! फक्त असे केश उमलत जाऊन, 'फेस' मुळातुन सुरकुतू नये, इतकंच जपतोय.. शेवटी, बिन-पाण्याची ही 'दाढी जितकी नीटनेटकी तितकाच आयुष्याला गोरेपणा....!! -डहाणु

तुझी म्हातारी मेली तर मी काय करू..

परिकथेतील राजकुमार ·
प्रेरणा :- मला झालेला 'डायरीया'. मी तर रस्त्याने बोंबलत हिंडत होतो मी तर भेळपुरी खात होतो मी तर पोरीला गंडवत होतो बोंबलत हिंडत होतो, भेळपुरी खात होतो पोरीला गंडवत होतो तुला मिर्ची लागली तर मी काय करू.. मी तर उकीरडे फुंकत होते मी तर रवंथ करत होते मी तर डोळे मारत होते उकीरडे फुंकत होते, रवंथ करत होते डोळे मारत होते तुला मिर्ची लागली तर मी काय करू . आग लागो सार्‍या दुनीयेला, गेम टाकणार तुझ्यावर प्रेमदिवाणा..

अजि ये प्रोभाते - आज पहाटे रविकर आला

यकु ·
कवी मग तो कुठलाही असो, त्याच्यात ऋषि बनण्याची संभाव्यता असते. कारण मनाच्या एका विशिष्‍ट अवस्‍थेत त्याला जे झप्पकन दिसून जातं ते तेवढ्याच झगझगीतपणे व्यक्त होणार्‍या शब्दांत बांधण्याचे कसब कवीकडे असते. ऋषिलाही ते दिसत असते; पण त्याला कविता करण्‍याची गरज पडत नाही कारण ऋषिने पाहिलेले आणि समोर मांडलेले 'सत्य' असते. म्हणून ऋषिच्या वाणीला धर्मग्रंथांत स्‍थान मिळते. कवीची अवस्था मात्र जाणीवेच्या दृष्‍टीने काहीशी खालची मानली जाते कारण कवी सत्य आणि सामान्यत: जग जसे असते त्यातील सीमारेषेचे सतत अतिक्रमण करीत असतो.

कोण येथे गुरुवर्य ?

गणेशा ·
लेखनविषय:
काव्यरस
कोण येथे गुरुवर्य ? खितपत पडले शौर्य अहिंसेचे पुतळे मानतो मौनात दडले क्रौर्य झाकोळला स्पष्ट अंधार मुखवट्यात गळले धैर्य स्त्रीत्वाची ताकद जाणतो खुऱाड्यात लुटले कौमार्य घुंगूरपाण्यात डुबले नेत्र कळले कोणास सूरगांभिर्य दगडात ईश्वर जाणतो देवत्व शोधतो सूर्य भावनांचा गच्च बाजार मनात हरवले माधुर्य वैराग्यात निरपेक्षता मानतो अहंकारातून घडते कार्य ---- शब्दमेघ (कविता पुन:प्रकाशित, नविन काव्य सुचत नसल्याने फक्त कविता वाचताना आपलीही एखादी कविता आता असावी या भावनेमुळे पुन्हा येथे कविता देत आहे. गोड माणुन घ्यावी.)

!!...'मानवी भूकंप'...!!

सन्दीप१२३३० ·
लेखनविषय:
!!...'मानवी भूकंप'...!! गोष्ट आहे ही एक ग्रासलेल्या मुलीची दरड कोसळली एके दिवशी तिच्यावर कृत्रिम आपत्तीची... असा काही झाला होता तिच्या मनावर आघात 'मानवी भूकंपा'चा घडला होता कृत्रिम अपघात... भूकंपाचे केंद्र होते जवळचेच एक घर राहात होता तिथेच तिचा तो 'प्रियकर'... प्रेमात असा काही दिला होता त्याने धोका एकाच फोन कॉल ने बसला होता तिला मोठा धक्का.. त्याच्या दूर जाण्याने तिच्या पायाखालची जमीनच हादरली होती मनाच्या भूकंपाची ती तीव्रता रिश्टर स्केलवर देखील मोजण्याजोगी नव्हती.. मनाचे तुकडे दिसत होते सर्वत्र विखुरलेले.. अन, आठवत होते जुने दिवस जेव्हा गीत नवे स्फुरलेले.. मानवी भूकंपामुळे जरी झाली हो

प्रचंड गारठा

प्रशांत उदय मनोहर ·
------ भाग १: ------ प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! बर्फ़च घेऊन जणु बाहेर वाहतोय सुसाट वारा ! सूर्यकिरणांनी चकाकतोय दवबिंदू... की पारा? निसर्गाने उघडलाय बघ! सौंदर्याचा गाभारा.... माझ्या हातात तुझा हात उबदार जरा... तुझ्यासवे चालत चालत सरावा जन्म सारा.... प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! तुझ्यासह घालवलेला क्षण क्षण न्यारा....! ------ भाग २: ------ प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! झोपावे जरा, अजून कामाचा शीण नाही गेला सारा.... पहाटे पहाटे पेपरवाल्याने बेल वाजवली कराकरा.. सकाळी सकाळी "ही" का आवरतेय आज घरातला पसारा? आज रविवार!

धर्माच्या अड्ड्यात निधर्मी देश

अत्रुप्त आत्मा ·
काव्यरस
या कवितेची प्रेरणा---प्रकाश१११ यांची निधर्मी देशात..!! ही कविता,हे उघड आहे.पण तरीही दोन्ही मध्ये एक मूलभूत फरकही आहे.

कोण येथे गुरुवर्य ?

गणेशा ·
लेखनविषय:
काव्यरस
कोण येथे गुरुवर्य ? खितपत पडले शौर्य अहिंसेचे पुतळे मानतो मौनात दडले क्रौर्य झाकोळला स्पष्ट अंधार मुखवट्यात गळले धैर्य स्त्रीत्वाची ताकद जाणतो खुऱाड्यात लुटले कौमार्य घुंगूरपाण्यात डुबले नेत्र कळले कोणास सूरगांभिर्य दगडात ईश्वर जाणतो देवत्व शोधतो सूर्य भावनांचा गच्च बाजार मनात हरवले माधुर्य वैराग्यात निरपेक्षता मानतो अहंकारातून घडते कार्य ---- शब्दमेघ (कविता पुन:प्रकाशित)

श्लील अश्लील

चित्रगुप्त ·
लेखनविषय:
श्लील अश्लील जन्मताक्षणी मी आईला विचारलं माते माझा जन्म श्लील की अश्लील माता म्हणाली बाळा श्लील रे श्लील मग मी धर्ममार्तंडांना म्हणालो मार्तंडहो माझा जन्म श्लील की अश्लील ते एकरवानं उद्गारले अश्लील अश्लील

फ्रायडे टाईमपास

मुक्तसुनीत ·
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ