मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<<बिन-पाण्याची दाढी>>

सुहास.. · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा : http://misalpav.com/node/21389 "तुझ्या हाती ब्लेड आहे" खुंट, खुंटच राहतात, तेव्हा वेदना वळावते, घोटतात नाजूक गालही! चेहरा जळत असला, तरी गळा रक्ताळलेला असतो- वरचा!! फक्त असे केश उमलत जाऊन, 'फेस' मुळातुन सुरकुतू नये, इतकंच जपतोय.. शेवटी, बिन-पाण्याची ही 'दाढी जितकी नीटनेटकी तितकाच आयुष्याला गोरेपणा....!! -डहाणु

वाचने 2281 वाचनखूण प्रतिक्रिया 4

प्यारे१ 16/04/2012 - 17:20
थंड पेयाची अ‍ॅडिशन घालावीच लागते, कधी ना कधी कळतेपणानं, मळमळत्या चवीवर ऊतारा म्हणून | (बजेट वाढल्यानं होणारं दु:ख) कापताना खिशाला, त्याला होणार्‍या जखमा झाकून ठेवणं सोपं नाहिये, चेहरा कोरा ठेवून | (एक्स्पर्टीज नाही अजून) छटाकभराच्या पुर्चुंडीतला चखणा, सांभाळलाय तरीहि, बिड्या विझतातच अजूनहि | (मल्टीटास्कींग जमत नै) जमेल , आयुष्यात ऊरलेल्या , हे हि जमेल , कधीतरी - रात्रप्यारा ;)

In reply to by प्यारे१

पहाटवारा 16/04/2012 - 17:39
मस्त जमलेय .. हो पी-१ ! प्रतीक्रियांच्या पण पावत्या विडंबन-पुस्तिकेतूनच फाडतात बॉ मिपावर आजकाल ..