मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'

श्वेता२४ ·

बाजीगर 08/03/2026 - 09:50
आपली ही अतिसुंदर कविता वाचून इंदिरा संत यांची आठवण झाली. यात तुम्ही सर्व च समावेशले आहे, की कशी एक स्त्री आपले प्रतिभेचे पंख मिटून घरट्यात समर्पित झाली आहे, आपली उडान अर्पण करून. अभिनंदन.

कंजूस 08/03/2026 - 11:36
परिस्थितीला भेदून आशावादी आणि आनंदी होण्याची कल्पना आवडली. जगात विविध देशांत स्त्रियांना जे स्वातंत्र्य आहे त्यात भारत अगदी वरती आहे. फक्त त्यांनी पाऊल पुढे टाकायचे आहे.

श्वेता२४ 09/03/2026 - 12:39
आपल्याला रचना आवडली हे वाचून आनंद झाला. आपल्या मार्गदर्शन व प्रोत्साहनासाठी आभारी आहे.

अक्षरांचे पंख होऊनी परकी मला मी प्रश्न आज विचारते बेहिशेबी जीवनाचा ताळमेळच मांडते का कला साहित्य सारे ठेविले वेशीवरी अन् कुणाची पत्नी होऊन माप हे ओलांडते त्या नळाचे गीत सोबत ताल साधे भाकरी तान्हुल्याचा गोड चेहरा चंद्र म्हणूनी पाहते चांदण्यांचे शब्दमोती विखुरले दारी सडा कल्पना सारूनीही घर लख्ख माझे झाडते सोडुनी मज अन्य सर्वांना इथे प्राधान्य पण मीच मजला उचलूनी मग अग्रस्थानी ठेवते! अक्षरांचे पंख मजला हार का मग मानू मी? घेउनी स्वप्ने आभाळी मुक्त मी झेपावते...!! — श्वेता माईणकर सूर्यवंशी © 2026

काही आठवणी शब्दांत अडकतात… ❤️ | Marathi Kavita | Truptis Kavita

तृप्ति २३ ·

अभ्या.. 18/01/2026 - 18:52
अहाहा, काही आठवणी शून्य प्रतिसादाच्या, काही आठवणी व्हाटासपाच्या रोमँटिक शायरीच्या, काही आठवणी प्राडॉच्या हळवेपणाच्या तर काही त्यांच्या खिल्ली उडवायच्या...... . वेल्कम अ‍ॅन्ड थॅन्क्स फॉर युट्युब चॅनेल इन्व्हिटेशन. कवितेइतकेच थुकरट आणि निरागस आहे ते. (कसे जमते हे दोन्ही एकाचवेळी)

कंजूस 18/01/2026 - 20:00
आठवणी खूप आहेत जुन्या पण त्या सांगता येतात फक्त गप्पांचा अड्डा जमल्यावर. तर गेल्या बारा वर्षांतील फोटोंच्या रूपात छानपैकी बंदिस्त होऊन मोबाईलात किंवा मेमरी कार्डात पडलेल्या. कुणी भेटल्यास विचारतो दाखवू का त्यातल्या पन्नास? तर उत्तर येते माझ्याच पाहा अगोदर शंभर.

कांदा लिंबू 19/01/2026 - 09:50
सदर काव्यात्म लिखाणातील आशयाच्या व्यामिश्रतेचा आवाका हा केवळ आठवणींच्या परिप्रेक्ष्यापुरताच मर्यादित नसून तो चेहरा ते हसू अश्या दीर्घ पटलावर दृग्गोचर झालेला आहे असे या लिखाणाचे व्यासंगीक दृष्टीने परिक्षण केले असता आढळून येते. मिपासारख्या "मिसळपाव" असे मसालेदार विशेषनाम धारण केलेल्या तरीही लेखनाशयाच्या दृष्टीने अगदीच यःकिंचित अशा संस्थळावर, एखाद्या खानावळीत आचाऱ्याने त्याच्या झारीतून अनिवार जिलब्या पाडत राहाव्यात तसे लेखरूपी धागे आणि प्रतिसाद पाडत राहणाऱ्या कःपदार्थ मिपाकरांच्या लेखनप्रसवाशी सदर उत्तुंग उंचीच्या काव्यशिखराशी तुलना केली असता भांगेत तुळस उगवल्याचा किंवा माळरानावर अंकुर फुटल्याचा आल्हाददायक अनुभव साक्षेपी रसिकाला आल्याशिवाय राहणार नाही. ग्रीष्म-वैशाखाच्या काहिलीमुळे जशी धुक्यात गारठलेली शरद पहाट दुर्मिळ व्हावी तसेच आजकालच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तडाख्यात असे उच्च प्रतिभेचे अनवट लेखन दुर्मिळ झाले आहे. योग्य शब्दांची अचूक निवड, आवेशहीन निवेदनाचा तरल ओघ, आठवणविषयाचे तरल तरीही हृद्य असे शब्द-चित्रण आणि कृष्णार्जुनमैत्रीसम भावना-अभिव्यक्ती रूपकातून मांडलेले आशयघन विचार अशा या बांधीव काव्य-लिखाणाचे आज वाचन करण्याची आज मिपाच्या निमित्ताने सुसंधी प्राप्त झाली हा सुवर्णकांचन योगच म्हणावा लागेल. - (कला साहित्य काव्य समीक्षक) कांदा लिंबू

आठवणी आठव्याला गेलं की खरंच खूप आठवणी आठवतात काही आठवणी गाण्यांमध्ये रमतात तर काही शब्दांमध्ये अडकतात काही आठवणी चेहऱ्यावर उगाच हसू आणतात तर काही आठवणी उगाच मनास छळू पाहतात काही आठवणी पुन्हा आठवणी मध्ये गुंतवतात तर काही आठवणी आठवणींचा गुंता सोडवू पाहतात काही आठवणी आयुष्य सुंदर बनवतात तर काही आठवणी आयुष्य जगायला शिकवतात. ही कविता तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल. ❤️ व्हिडिओला LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका! Written By: Trupti S. Tilloo https://www.youtube.com/@truptiskavita

नरो वा कुंजरो वा

चांदणे संदीप ·
पोटाची खळगी भरणे कारणी स्वार्थें, वैऱ्याची हो मनधरणी हसणे होईल पातक घोर भवती मूर्खांचा वाढेल जोर सत्य नित्य नको ओठी वाचेत मुग्धतेची पराकोटी आणि... मती निकामी होय तेधवा म्हणावे, नरो वा कुंजरो वा - संदीप भानुदास चांदणे

सणासुदीची सफाई

माहितगार ·
"नास्तिकांनी खायला कोंडा, उशाला धोंडाचं गाणं!" कितीही म्हटलं, तरी आपल्या देशाची पक्की जमीन धर्माच्या खाटेचीच सोय! पंथाच्या गादीची उब, सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप — आपलेसेपणा देणारी ही सोय बहुतेकांना हवीच असते, नाही का? सणांच्या आधी, माळ्यावरची समृद्ध अडगळ खाली उतरते, तेव्हा माळ्याचीही सफाई होते. तसंच काहीसं — मऊ मुलायम गादीसुद्धा, खूप दिवसांनी कडक होते. मग ती कारखान्यात जाऊन सासुफ-करून, पुन्हा मुलायम होते, स्वच्छ होते, दिवाळी अंकांनी वैचारीक कल्हई दिल्या सारखी. बेडही मधूनमधून हलवावा लागतो — कचरा, जळमटे बाजूला काढून पुन्हा नीट लावावा लागतो आपलच घर चकाचक दिसण्यासाठी . सणासुदीच्या निम

सहा कोवळे पाय

चांदणे संदीप ·

अभ्या.. 22/07/2025 - 00:40
इवलुशी प्रेरणा आणि तिचे इवलेसे भुभू आणि तिची इवलुशी कविता. क्युट क्यूट. . आवडली सॅन्डीबाबा.

In reply to by कंजूस

किटकांना सहा पाय असतात. मुंगी, मधमाशी, झुरळ, फुलपाखरू हे सर्व कीटक आहेत आणि त्यांना सहा पाय असतात. कमी असतील तर तुटले असतील, जास्त असतील तर जयपूर फुट समजावे.ह.घ्या. सहा पाय म्हणजे षड्रिपू, षड्रस असे काही आहे का?कवीता उलगडली नाही ती डोक्यावरून गडगडली. बाकी,कवीता आवडली.

गणेशा 20/08/2025 - 09:01
वा वा खूप दिवसांनी आलो या विभागात आणि पहिल्या दोन कविता वाचल्या मस्त वाटलं... बालकवीता करता आली असती ह्या विषयावर तुला. - गणेशा... अवांतर : एक महिन्या पूर्वीची कविता २ no वर. कमी लोक आहेत काय काव्य विभागात आजकाल. जुने कुठे गेले पाभे वगैरे

चित्रगुप्त 21/08/2025 - 13:45
'पेर्णा' सगळ्यात शेवटे टाकलीत, हे ब्येस केले. त्यामुळे खुमारी आणखीनच वाढली आहे. आधी मलापण कुठल्यातरी कीटकाविषयी, मग षड्रिपु वगैरे वाटू लागले होते. पण त्या दोन पिल्लांची गोड लगबग बघून कविता तर समजलीच, त्याशिवाय खूप गोड, निरागस काही बघण्यातला आनंद आणि समाधान लाभले. अनेक आभार. असेच प्रयोग करत रहावे ही विनंती.

नादमय सरसर कोवळ्याशा वाटेवर कोवळ्या सहा पायांची चाल होई भरभर एकामागे दुजा चाले पुढचे न पाहताना पुढच्याचे ध्यान नाही पुढे पुढे चालताना कधीतरी भांबावून पुढचा जागी थिजतो हरवल्या मागच्याला चार दिशांत शोधतो मागलाही नकळत गेलेला पुढे जरासा थबकून तोही टाके पुढच्यासाठी उसासा क्षणातच पुन्हा होई नजरेत त्यांची भेट हुश्श मनात करूनि चालू पुढे त्यांची वाट - संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १५/०७/२०२५) (प्रेरणा)

गुरूंना वंदना

लाल गेंडा ·

युयुत्सु 20/07/2025 - 12:45
गुरुनिंन्दा गुरुवर्यास्ते हल्कटा: नीचाश्च श्रेयलंपटा:| फकन्तु क्षुद्रमानसा: पूजासक्ता: तथैव च|| -युयुत्सु प्रेरणा - वैद्य/डॉ० निन्दा वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर| यमस्तु हरति प्राणान्त्वन्तु प्राणान्धनान्यपि|| - सुभाषितरत्नभाण्डार

आकाशातले चंद्र तारे, हे जगाचे गुरु सारे जमिनीवरचे पाणी वारे, हे जगाचे गुरु सारे || उंच पर्वत, खोल दरी हळू जोरात वाहणारी नदी हे म्हणती, मानवा शिका रे जितके श्रम तिथेच यश सारे || पक्षी, प्राणी, वृक्ष आणि कीटक ते शिकवती, आयुष्य बिकट चिकाटीने पुढती जाता होते सगळे सरळ सुलभ || हे सगळे मनुष्याचे गुरू जन्मास येता होई शिक्षण सुरू बालक असो वा वृद्ध जर्जर शिकणे त्याचे न संपते खरेतर || त्या शिक्षणा देती मूर्त आकार ते आपले गुरू साकार || अ पासून शिकवता बाराखडी कधी वापरावी लागते छडी || तसेच शिकता जीवन कळते तेव्हा उमगते परी नंतर वळते || मोठे झाल्यावर कळतो तो पाढा तेव्हा शिक्षक देतात जीवनाचा धडा || क

जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..

माहितगार ·

कधी कधी प्रज्ञेची तर्री कमी पडते,मग कवीतेची रेसिपी विचारावी लागते...... आपल्या कवितेची पेरणा सांगताना आवघड वाटत असेल तर नका सांगू... बादवे,आवडली.

द्रव झाला महाग असा,मोजावे द्रव्य किती, किती फकस्त दोन घोट घेऊन कसे लिहावे, किती किती न परवडती प्याले,चकणाही महाग झाला दोस्तांसवे मयखाने शोधावे किती किती

गवि 17/06/2025 - 08:58
वाह छान. बादवे.. भूछत्री आली पण कोडाई कॅनाल आणि गरम पाण्याचे कुंड राहिले वाटते.

In reply to by गवि

माहितगार 22/06/2025 - 18:38
आम्ही आपले भूछत्री आणि जिलबी वाले. इतरांचे कोडाई कॅनाल पाट वहात आहेत आणि गरम पाण्याचे कुंड वाफा सोडत आहेतच त्याच्या दमटपणात आपली भूछत्री कधी कधी जन्मास घेते :)

जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे. जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला अवघडावे असे लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.

रात्रंदिन आम्हां ट्रॅफिकचा प्रसंग |

चामुंडराय ·
संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची क्षमा मागून. रात्रंदिन आम्हां ट्रॅफिकचा प्रसंग | हॉर्नचे आवाज आणि धूर ||१|| "रोड रेज" चे जीवा होतसे आघात | तरी दामटतो आपुले वाहन नित्य ||२|| मी म्हणे ह्या प्रदूषणाचिया बळे | अवघ्यांचे काळें केले तोंड ||३||

स्त्रीत्वाचे शीलहरण!

गंगाधर मुटे ·
स्त्रीत्वाचे शीलहरण!
 
स्त्रियाच करिती परस्परांचे 
शीलचारित्र्य हनन मस्त 
मातृत्वाचे वस्त्र फाडणे 
त्यांच्या लेखी दिसते स्वस्त
 
तारतम्य अन विवेकाचे
उरत नसते त्यांना  भान
कुस्करती मग एकमेकींचा 
स्त्रीयाच स्त्रीत्वाचा सन्मान
 
बघुनी नागड्या नालस्तीला
बीभत्सतेला येते ग्लानी
निती, सभ्यता, मानवताही
वितळून होती पाणी पाणी

आयकर सुट

बाबुराव ·
साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट! पोळीत लपला आलूवडा, चहा कपभर खास बजेटची चर्चा झाली, आता सगळं झालं बास खिशात राहतं थोडं, केला सगळ्यांनी नवस निर्मला ताईंनी बनवला सगळ्यांचा हसरा दिवस साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट! सायकल चालवली जरा, फिटनेसची शान बजेट ऐकत बसलो, झाला गोड ताण टॅक्सचा जुगाड संपला, हसू फुटलं मुक्त निर्मला ताईंनी दिली सूट, मिळालं आयुष्याचं गिफ्ट! साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट शेअर्स घेतले थोडे, पण मार्