मी बालपणी खेळविले, तुज खांद्यावर नाचविले
तुज खेळविता मी बाळा, ना केला कधी कंटाळा
तू किती जरी मज छळले- तव खेळी मन विरघळले
कधि घोडा-घोडा झालो; ओझ्याचे गाढव बनलो !
तू तळहाताचा फोड, पुरविले सर्व तव लाड
ठेवून 'रोज' मनी स्वार्थ , ना घालविला क्षण व्यर्थ !
कालांतरि होशिल मोठा ! सन्माना नसेल तोटा !
नोटांच्या पायघडया त्या- कुणि घाली सामोरी त्या
ना विसरावे तू मजला, ही एकच आस मनाला !
कधि कुणापुढे ना झुकलो; परि आता मी रे थकलो-
'ती' इच्छा मम पुरवावी ' मज वृद्धाश्रमी न ठेवी ! '
तव खांदा मला मिळावा- मजसाठी "सुखाचा ठेवा" !
विजू भाऊ - बहर माझा लिहिता
जगदंब जगदंब .. सॉरी .. राव
आत्मवृत्त आवडले. आणि
आत्मकथन आवडले.
आत्मकथन आवडले.