मी बालपणी खेळविले, तुज खांद्यावर नाचविले
तुज खेळविता मी बाळा, ना केला कधी कंटाळा
तू किती जरी मज छळले- तव खेळी मन विरघळले
कधि घोडा-घोडा झालो; ओझ्याचे गाढव बनलो !
तू तळहाताचा फोड, पुरविले सर्व तव लाड
ठेवून 'रोज' मनी स्वार्थ , ना घालविला क्षण व्यर्थ !
कालांतरि होशिल मोठा ! सन्माना नसेल तोटा !
नोटांच्या पायघडया त्या- कुणि घाली सामोरी त्या
ना विसरावे तू मजला, ही एकच आस मनाला !
कधि कुणापुढे ना झुकलो; परि आता मी रे थकलो-
'ती' इच्छा मम पुरवावी ' मज वृद्धाश्रमी न ठेवी ! '
तव खांदा मला मिळावा- मजसाठी "सुखाचा ठेवा" !
काव्यरस
वाचने
1686
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
हृदय्स्पर्शी
खूपच हृदयस्पर्शी वाटली कविता .
विदेशां -मस्त ...!!! कधि
विदेशां -मस्त ...!!!
कधि घोडा-घोडा झालो; ओझ्याचे गाढव बनलो !
तू तळहाताचा फोड, पुरविले सर्व तव लाड
ठेवून 'रोज' मनी स्वार्थ , ना घालविला क्षण व्यर्थ !
आवडले...!!
छान काव्य आहे
छान काव्य आहे
मी सुखाचा ठेचा असे वाचले.
मी सुखाचा ठेचा असे वाचले. ;)
मस्त लिहिले आहे ...
मस्त लिहिले आहे ...