Skip to main content

घुबडाच्या मागे लागले कावळे हजार ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 18/02/2011 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
कुठून आली कावळ्याची जीवघेणी कावकाव आंधळेपणाने दिवसाच्या प्रकाशात उडणारे वाट चुकलेले घुबड झिडपिडत टकरा खात होते भिंतीला आंधळेपणाने उडत होते कावळ्याच्या नजरेतून गहाळ होण्यासाठी जीवाच्या आकांताने जीव घेउन घाबरून वळचणीला जाऊन बसत होते माणसासारखे तोंड ,नजर ,ते नाक घाबरून आपल्यातच गुंतत होते खोल काळोख्या गुहेत कावळे पंख झापडत त्याला टोचा मारायच्या प्रयत्नात ते मिट्ट मख्ख , आपल्याच नादात त्याच्या ताकदीचा अंदाज काळोखात लुप्त अदृश्य केविलवाणा ...!! मी पाहत होतो त्याची केविलवाणी धडपड जगण्यासाठी त्याची ठाम धडपड आटोकाट .... सतराशे साठ कावळे नि ते एकटे घुबड आंधळे तरी झुंझत होते निकराने अभिमान्युसारखे आवाजाचे लक्ष साधित ते बचाव करीत होते आपल्या सर्व शक्तीने कावळे टोचून त्याला करीत होते हैराण शेवटी गलितगात्र होऊन घुबड मिटून बसले कावळ्यांनी गलका करून त्याला घेरून टाकले घुबड प्रतीक्षा करतोय आपल्या शेवटच्या श्वासाची तो गप्प ,निमूट , पंख मिटून वाट बघत बसलाय शेवटच्या क्षणाची श्वासाची ...!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1844
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

कशी सुचली बुवा ही कविता तुम्हाला ?