दैव आज हरवले!
लोपले ते सूर माझे, संपली ती स्वप्ने
कळवळले आकाश सारे, सोबत मूकपणे
होते मनी काय आणि काय घडले आज
मीच माझ्या अंतरीचा घेत आहे ठाव
कालच्या त्या आठवणी आज जाग्या जाहल्या
वेळ गेली रे निघुनी खुणा मात्र राहिल्या
धूर्त होती हृदये सारी प्रेम कोठे सांडले
का पशुसम वागणे अन खेळ असे हे मांडले
त्रिवार पाहून घेत आहे आज तुझ्या या मंदिरा
या तुझ्या दरबारी होतो सेवक तुझा मी खरा
पाखरे आज झाली वैरी पंख त्यांस गवसले
लागली गोडी तुझी, परी दैव आज हरवले
- परी
वाचने
1738
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
मस्त जमली
ए मस्त ग...
कविता खुप छान लिहिली आहे ,
मस्त...
केवळ सुरेख!! अतिशय सुंदर!!
In reply to केवळ सुरेख!! अतिशय सुंदर!! by प्राजु
य्यस्स!! हेच म्हणेन.
हरवले ते गवसले का?
छान..छान..छान !!!! :)