मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

मी आहे एक सामना

मुक्तसुनीत ·
मी आहे मी आहे एक सट्टा पाच हजार कोटींचा (सगळे खेळाडू नि बुकी मिळून) मी आहे एक कमांडो स्क्वाड काही डझनांचा (पोलीस बिलिस चिल्लर सोडून ) मी आहे एक खेळ बावीस जणांचा (बदनाम झालो युद्ध युद्ध म्हणून) मी आहे एक झिंग मी आहे शिव्यांचा पाऊस मी आहे टाळ्यांचा कडकडाट मी आहे एक ईर्षा मी आहे चढलेला त्वेष मी आहे दडपलेला द्वेष मी आहे एक भोळसट प्रार्थना मी आहे एक करोडोंची संधी मी आहे एक जिंकल्यावर मारलेली आरोळी मी आहे एक हरल्यावर केलेली आत्महत्या मी आहे एक दिवस काल आणि आजसारखाच. मी आहे एक सामना. एकशे चाळीस कोटी लोकांनी पाहिलेला (कामधाम बाजूला ठेवून )

साखळीतल्या कुत्र्यावर -

विदेश ·
साखळीतल्या कुत्र्यावर - ते खूपच माया करती ; ' माया ' नसल्या नात्यावरती ते का डाफरती ? त्यांच्या भ्रष्ट संपत्तीची उधळण होते सगळीकडे ! माझी नजर मात्र वळते - माझ्या गळक्या खिशाकडे ? रस्त्यावरून जाताना , एक भिकारी दिसतो ; उपहासाने माझ्याकडेच पाहून का हसतो ? धडपड माझी चालू आहे - पतंग उडवण्यासाठी ! दोर राहू द्या - रीळहि साधे नाही , सध्या हाती ! एकेकटा 'मी ' रस्त्यामध्ये गर्दी करीत असतो ! गर्दीच्या खिजगणतीमध्ये कुठेच 'मी ' का नसतो ?

आयुष्य साधेपणे जगत गेला ...!!

प्रकाश१११ ·
तो आयुष्य अगदी साधेपणे जगत गेला उगाच खर्च नको म्हणून नुसता काटकसरीने जगला स्वताच्या पोटाला चिमटा घेत ह्याचे त्याचे करीत गेलां मध्यम वर्गातला असा शिक्का स्वताच मारून घेतला शेव-पुरी पाणी पुरी घरीच करून खायचे काटकसर करून करून आयुष्य जगायचे लग्न झाले बायको पण साधी सुधी मिळाली हनिमूनला न जाता घरीच गात बसली डोहाळे डोहाळे लागले फक्त चिंचा खाण्याचे स्वप्न त्याना कधी पडायचे एकादशीचे खरे म्हणजे बर्यापैकी पगार होता त्याचा पगार झाला म्हणजे घरी पेढे आणायचा देवापुढे ठेऊन घरी प्रसाद वाटायचा कधीतरी चार आण्याचा गजरा आणायचा नवरा मात्र उदार असे वाटून ती सुखावून जायची चालण्यासा

टाळती मजला अताशा हाय! माझी माणसे

प्राजु ·
टाळती मजला अताशा हाय! माझी माणसे हासती का पाहुनी मज रोजला हे आरसे?? मैफ़िलीना मी सजवले प्राण माझे ओतुनी पण तरीही का कुणीही फ़िरकले ना फ़ारसे?? सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले? फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे?? 'भीड आता बाळगावी तू कशाला, वेदने?? मी 'सखी' हे नाव तुजला देत केले बारसे!! पेटवूनीया चितेला सर्व आता पांगले सोबतीला राख आणी राहिले बस्स कोळसे!! एकले आयुष्य गेले, ना कुणी आले कधी मन रमवण्या शेवटाला, मरण आले छानसे!! - प्राजु *काल एक फोन आला..

किती वेळ

सोनल कर्णिक वायकुळ ·
खिडकीच्या बंद तावदाना आडून अविरत कोसळणारा मुका पावूस बघतेय…किती वेळ. त्याने काचेला फासलेल धुकं रानाचा हिरवा रंग अजूनच गडद करतंय आणि विजेसारखे धारदार त्याचे शिंतोडे ठोठावतायत दार माझ्या जाणिवांच…किती वेळ कान बंद करून पावसालाच मुका ठरवायची सवय कधी लागली कोण जाणे? धुक्याआडची त्याची गडद गडद होत जाणारी जखम अजून किती वर्ष हिरवीच राहणार कोण जाणे? भिजून भिजून खंगलेल्या या दमट कोंदट खोलीत बसून हाच विचार करतेय…किती वेळ.

रोज कौतुकात दंग बायको जरी ,

विदेश ·
( चाल: आज गोकुळात रंग खेळतो हरी - ) रोज कौतुकात दंग बायको जरी , लाटणे जरा जपून आज बघ करी |धृ | तोच मित्र रोज सिगारेट ओढतो थेट खिशातून तुझ्या नोट काढतो , गुंतवुनी बोलण्यात चहा उकळतो - सावध केले मी तुला कितीदा तरी |१| सांग मित्रमंडळास काय जाहले ? कुणी गंडविल्याविना कुणा न सोडले ! ज्यास त्यास लुटण्याचे चंग बांधले - एकटाच वाचशील काय तू तरी |२| तू कधीच रंगढंग नाही उधळला ! मित्रमंडळात तरी कसा गुंगला ? तो पहा - चंडिकेस पत्ता लागला ... हाय, धावली धरून लाटणे करी |३|

त्सुनामी

वर्षा म्हसकर-नायर ·
पुन्हा पुन्हा तू येतोस तुझा मीट्ट अंधार, गडद काळोख घेउन पुन्हा पुन्हा ते पाशवी, ऋद्र, आक्राळ -विक्राळ विद्रुप क्षण होऊन पुन्हा मी लढते, जीव तोडुन सत्याची अखंड तेवणारी ज्योत घेऊन, स्वत:तील सत्व जपत तू घोंघावत येतोस सुनामी सारखा आपल्या आक्राळ विक्राळ, विद्रुप विनाशकारी लाटेत मला संपवून टाकायला पण मी जिवाच्या आकांताने लढते स्वत:च्या आत्म्यात तेवणा-या सत्याच्या ज्योतीच्या आधाराने लढते लढते लढते त्या आक्राळ विक्राळ विनाशकारी सुनामीला पुन्हा एकदा परतवून लावते माझा मेंदु पुन्हा थोडा मरतो पण मी जिवंत रहाते मी पुन्हा त्या जिवनरुपी वेताळाला अन्गावर घेवुन पुढच्या प्रवासाला निघते

यावे तरी तु का समोर

निनाव ·
यावे तरी तु का समोर जवळ मज नसतांना तहानले मन माझे नयन हे भिजतांना अजुनच कमी होते अंतर तु लांब जातांना आठवेस तु अधिकच मी तुज विसरतांना शब्द अबोल करणारे वियोगात मी लिहितांना कंठी दाटून येतात ह्रदयातुनी उतरतांना का असावी अशी ही वेदना न दिसे कुणास दुखतांना श्वासही करते परके मला तु जवळ नसतांना!

माउली

मिसळलेला काव्यप्रेमी ·
माउली अपरिचित बंधुत्व त्या दोघांचे अनाकलनीय खेळ त्या नियतीचे अपरंपार हाल मात्र त्या माउलीचे भय दाटे हृदयी त्या अंतिम युद्धाचे ते दोघे आज सामोरे ठाकले मातेचे काळीज विद्ध जाहले एकाच हृदयीचे दोन ठोके 'चुकले' अन् जन्माचे वैरी जाहले एक अंश त्या अविनाशी तेजाचा दुजा तो प्राणसखा त्या मनमोहनाचा सुदैवी मातेवर कैसा फेरा हा दुर्दैवाचा आपल्याच पिल्लांमध्ये डावे-उजवे करण्याचा तेज:पुंज कवचकुंडलांचा धनी तो सदा सोसतो अपमानांचे आघात तो कौन्तेय असूनही जगाला राधेय तो राधेच्या सौभाग्याचा कुंतीला हेवा वाटतो तरीही जपले अन् साधले दुज्याचेच हित तिने मागितले दुज्यासाठीच अभयदान तिने ठरवले खुशाल दोषी तिल