Skip to main content

करुण

[काल रात्री ]

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 29/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मिकाच्या उत्साहाला सलाम करून अजून 'एक काहीच्या काही भयाण' विडंबन. या भरल्या गटारात चाचपडताना | बार बार तुझ्या शोधात फिरतांना | बाकड्यावर बसून तुझी वाट पाहतांना| कळले की सारे सारे पैसे संपून गेले, काल रात्री || चोरली माझी नवी ती सारी वस्त्रे | धरली नि बदडली देहाची गात्रे | सांजवेळी स्मरली आपल्या पार्ट्यांची सत्रे , मित्र सारे की सारे बिल न देता गेले, काल रात्री || बारचे वेटरही मजबूत काळे | शर्ट चोरला पँटही नेली लंगोट आवळे| अन् इथे कुणी सोडलेले सुसाट नळे | बघ सखे कसे सारे सारे जलमय झाले, काल रात्री || कविता जणू शब्दबंबाळ जाळे | दमूनी पाहतो, कधी संपते न कळे| किती करावे मी तरी पांढर्‍यावर का
काव्यरस

आयुश्याचं गणित...

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 28/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या गणितात मी नेहमीच चुकलो... बघणं... तुला वजा केल्यावर स्वतासाठी सुद्धा नाही उरलो... हे गणित मांडताना एक महत्वाची गोष्टच विसरलो... साधे गोलाबेर्जेचे नियम लाऊन पुरता फसलो... शेवटी “तू” उत्तर याव म्हणून प्रत्येक त्रैराशिक मांडून पाहिलं... आणि उत्तर शोधता शोधता सुरवातच विसरलो... आता हे कळून चुकलय की आयुष्य गणिताएवढ सोप्प नसत... म्हणून शेवटी कितीही प्रयत्न करून हव ते उत्तर मिळतच अस नसत... ```पारिजात
काव्यरस

काल रात्री

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 27/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी प्रस्तावना: पाऊस येणार असला तर त्याला एक घटनाक्रम असतो. प्रथम दाटून येते, मग हळूहळू गारठा जाणवायला लागतो, त्यानंतर पाऊस सुरू होऊन सगळं जलमय होत जाते, वाहायला लागते आणि वाहता वाहता विरघळायला लागते. या सर्व घटनाक्रमात क्रमाक्रमाने विरहात झुरणार्‍या नायकाच्या मनाची अवस्था आणि त्याचे विचार या रचनेत मांडायचा प्रयत्न आहे. ====================================== परत एकदा स्व:तास केले स्वप्नांच्या आधीन | .......... काल रात्री || परत एकदा जीवास केले सखेच्या स्वाधीन | ..........
काव्यरस

शब्दांच्या मालगाड्या

लेखक निनाद यांनी रविवार, 24/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
काल परवा कधी तरी रक्तवर्णी वारुणी सोबत मिसळपाव पाहतांना मिकासोबत खरडाखरडी झाली त्यात मी दिलेला हा प्रतिसाद बहुदा कविता आहे असा 'सौंक्ष्यय' आला. फक्त मिकानेच का माझ्या काव्याचे भोग भोगावेत? या विचाराने मला दया आली. दु:ख वाटल्याने कमी होते असे शाहरूख खान म्हणतो, म्हणून ही एक शब्द करूण आणि भयाण कविता सगळ्यांनाच वाटून टाकत आहे.
काव्यरस

असेलही कुठे कुठे

लेखक bhaktipargaonkar यांनी शुक्रवार, 22/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
असेलही कुठे कुठे आयुष्याचे गाणे खडतर वाटेवर सापडेल जिणे कशासाठी कुणासाठी रडावे अपार काय सख्या आणले तू, काय तू नेणार ? रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची लिहावीच कशासाठी कथा ह्या ऱ्हासाची ? हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?
काव्यरस

नवा खेळ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 21/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आज पावसाने हा कुठला नवा खेळ मांडला अवघे आभाळ काजळून कंठ माझा दाटला पंचप्राण शोषून माझे जीव असा टांगला तुझ्या स्मरणात भिजता कसा हा जडावला वर्षाव मोहरलेल्या तुझ्या स्वप्नांचा बरसला मनास माझ्या वाहवत क्षितीजास घेऊन गेला क्षितिजी तुझ्या स्मरणांचा आता वणवा पेटला वाहत आलेल्या मनास माझ्या चटका लावून गेला प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला आज पावसाने हा कुठला नवा खेळ मांडला जीवास सुखावून काळजास हुरहूर देऊन गेला |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२१/०४/२०११)
काव्यरस

कळले नाही ....

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 20/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
भिजलो उन्हात इतका .... पावसात वाळलो नाही ... मेलो पुन्हा पुन्हा इतका ..... जगण्यास भाळलो नाही ... पिकलो कधीच नव्हतो .... गळलो कसे कळले नाही ... पेटलो कधीच नव्हतो.... जळलो कसे कळले नाही ... खेळलोच नाही कधी .... हरलो कसे कळले नाही ... विसरली नव्हतीस कधी .... स्मरलो कसे कळले नाही ... आणले उसने अवसान .... गळले कसे कळले नाही ... दुख्खास ह्या सलत्या ... गिळले कसे कळले नाही .... होतो स्वप्नवत निद्रेत .... जागलो कसे कळले नाही .... होतीस तू माझा श्वास .... अजून जगलो कसे कळले नाही .... होतीस तू माझा श्वास .... अजून जगलो कसे कळले नाही ....
काव्यरस

[पेग घ्यायची ओढ लागली]

लेखक निनाद यांनी बुधवार, 20/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पाषाणभेदाची क्षमा मागून एक टुकार आणि 'शब्द करूण' विडंबन सादर करत आहे. [पेग घ्यायची ओढ लागली] नकोच आता दुर सुराही पेग घ्यायची ओढ लागली ||१|| पत्ते वाटा बसू गच्चीवर नसे कुणाची दृष्टी तेथवर ||२|| ओळखीच्यांना उधार दिली माज करत ती सांडवत नेली ||३|| वायू परिचीत नाकास लागला टुरटुर आवाज देवूनी गेला ||४|| नजरेच्या टापूत आले समोर मारून फेकले लाटणे तोवर ||५|| पत्यांच्या खेळात कुरुकुर झाली जुन्या उधारीची आठवण आली ||६|| गेमच कसला असला नसता मुकाट पत्ते पिसणे आता ||७|| पेगही पुरले भेळही सरली 'आत' जायची ओढ लागली ||८||
काव्यरस

सावकारी ही अशी की...

लेखक बन्या बापु यांनी बुधवार, 20/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
सावकारी ही अशी की, कुणी कुणाचा नाही, हसलो जरी मी, ते हसू मात्र माझे नाही. खिडकी माझी रिती आज, चांदणे मात्र नाही, चंद्र आहे नभात तो, झेंड्यात माझ्या नाही.. तोच म्हणतो कि मी, सूर्य आहे उद्याचा.. जाणीव अस्तिवाची, काजव्यास उरली नाही .. तू आलास तर परत जाशील, रित्या हाताने आज इथे, बड्व्याच्या गर्दीमध्ये विठ्ठल माझा तु नाही.. इथे आहेत सगळे शहाणे, वेडा मात्र कोणी नाही, आहेत हिंदू मुस्लीम सगळे, माणूस मात्र कोणी नाही .. राहुन वाटते हे, का जगलो असा मी ? आयुश्यात मला, सावकारी जमलीच नाही. घेऊन जा आता, मज तुझ्या संगे म्रुत्यु , ज्यांना म्हंटले आपले, ते सगे ( कोणी ) माझे नाही.
काव्यरस