मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दैव आज हरवले!

स्वैर परी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
लोपले ते सूर माझे, संपली ती स्वप्ने कळवळले आकाश सारे, सोबत मूकपणे होते मनी काय आणि काय घडले आज मीच माझ्या अंतरीचा घेत आहे ठाव कालच्या त्या आठवणी आज जाग्या जाहल्या वेळ गेली रे निघुनी खुणा मात्र राहिल्या धूर्त होती हृदये सारी प्रेम कोठे सांडले का पशुसम वागणे अन खेळ असे हे मांडले त्रिवार पाहून घेत आहे आज तुझ्या या मंदिरा या तुझ्या दरबारी होतो सेवक तुझा मी खरा पाखरे आज झाली वैरी पंख त्यांस गवसले लागली गोडी तुझी, परी दैव आज हरवले - परी

वाचने 1737 वाचनखूण प्रतिक्रिया 8

गणेशा 10/02/2011 - 16:48
कविता खुप छान लिहिली आहे , आवडली . या ओळी विशेष आवडल्या:
लोपले ते सूर माझे, संपली ती स्वप्ने
धूर्त होती हृदये सारी प्रेम कोठे सांडले
पाखरे आज झाली वैरी पंख त्यांस गवसले लागली गोडी तुझी, परी दैव आज हरवले
पहिल्यांदा कविता वाचली तेंव्हा कवितेतील नायिका विरहबोल बोलताना तिच्या सख्याला उद्देशुन बोलते आहे असे वाटले होते. नंतर निट वाचतना आणि विशेषता: या तुझ्या दरबारी होतो सेवक तुझा मी खरा या ओळी मुळे ह्या कवितेत नायक देवाला उद्देशुन बोलतो आहे असा बोध झाला. त्यामुळे या ओळी वेळ गेली रे निघुनी खुणा मात्र राहिल्या आधी वेगळ्या वाटल्या होत्या आता वेगळ्या वाटल्या. तुम्हीच सांगा काय बरोबर ते ...