आजचे पान कोरे-करकरीत आहे,
अगदी पांढरे शुभ्र ....
इतके की पेन टेकवायची पण भय...
कदाचित त्याचे सौंदर्यच नष्ट होईल...
मागची पाने गच्च आहेत
आहेत असंख्य रंग
लाल, पिवळा, निळा, भगवा गडद्द आहे, गुलाबीपण आहे ... पण फिक्कट..
आहेत अनेक अक्षरे
काना, मात्रा, अनुस्वार सगळे सुष्पष्ट आहे, जोडाक्षरेही आहेत... पण खोडलेली...
आहेत आकडे पण
बेरीज, वजाबाकी, गुणाकार आहेत, भागाकारही आहे...