हे कवितेचे झाड....!!
लेखनविषय:
काव्यरस
हे कवितेचे झाड
माझे आहे
तुमचे आहे
ह्याचे आहे
त्याचे आहे
सर्वांचे आहे
सर्वत्र आपले- पणाची भावना आहे ..!!
या ..!!
मनसोक्त बसा
चिवचिव करा
चिवचीवेचे सूर होतील
काही सूर बेसूर असतील
हरकत नाही ...!!
पण शेवटी
सुरांचे एक गाणे होईल
गाण्याची गझल होईल
मग छान मैफल जमेल
सगळेच काही गाणारे नसतात
सगळेच कोणी कवी नसतात
ते नसतात नि तुम्ही असता [?]
त्यांच्या सुरांना साथ नसते
नि तुमचे सूर गगन भेदते
त्यांच्या मुळे तुम्ही मोठे
एवढेच फक्त लक्षात ठेवा ..!!
हे चंद्र , सूर्य , तारे
ही फुले झाडे
ह्या नद्या नाले
आम्ही आहोत म्हणून ते आहेत
त्यांचा आम्हाला आधार आहे
म्हणून त्यांनी गर्व करावा ....?
हे निव्वळ खोटे आहे...!!
देव देव ..कोठला देव ...?
भक्त आहेत म्हणून देव आहे
सगळेच देव... नि भक्त नाही ..
हे असेल तर काय होईल ..?
देव सुद्धा राक्षस होतील ...
काही डावे ...
काही उजवे..!!
काही काळे ..
काही गोरे..!!
म्हणून कोठे कोठे भाव आहे
कोठेतरी नाव आहे ...!!
एवढेच फक्त लक्षात ठेवां
बाकी सगळे विसरून जा ....!!
वाचने
1442
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
चिवचिव
आवडली कविता
मस्त
शीर्षकावरून मला वाटलं 'हे
हे कवितेचे झाड