Skip to main content

एक घर विकत घ्यायचे आहे ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 18/02/2011 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
खरेच एक घर विकत घ्यायचेय एका कवीला कोणी देईल का घर .? छोटेशे चिमुकले सुंदर घर कोठे मिळेल का घर? उपनगरात देखील चालेल कवीचे प्रेम जमलेय नि तो लग्न करायचेय म्हणतोय ती कबुल झाली आहे तिने स्वीकार केलाय त्याचा मनापासून पण घर तर हवे आहे कोठे मिळेल का घर ? एका कवीला घर हवे आहे छोटेशे चिमुकले सुंदर घर तो सजवणार आहे घराला छोटीशी बेडरूम एक स्टडी रूम एक टेबल ,निळे कागद नि एक मस्त पेन एक आभाळ टांगून ठेवणार आहे छताला खिडकीतून दिसावे एखादे झाड नि मस्त आभाळ पूर्ण चंद्र आंणी निव्वळ निवांतपण असे मिळेल का घर त्याला त्याचे छानसे स्वप्न आहे पाउस पडताना तो तिलाच आठवतो ती चक्क त्याला दिसू लागते पावसाच्या थेम्बातून ती अलगद उतरते मस्त पावसासारखी झिम्म बरसते छोटेशे चिमुकले सुंदर घर ...!! त्याच्या मनात कसे स्वप्न फुलते पाखरू होऊन कसे झुलते पण घराची आठवण येताच ते चक्क फुटून जाते एक साधेसे घर त्याच्या शोधात तो तो शोधतोय घर कोठे असेल तर सांगा ..? त्याला लग्न करायचेय फुलासारखे तिला जपायचेय पण त्यासाठी त्याला घर हवेय सांगा कोठे स्वस्त मस्त मिळत असेल एखादे घर तो आतुर झालाय कोणीतरी पाठीशी उभा राहील देवासारखा नि घर मिळवून देईल तो वाट बघतोय त्याला हवंय एक स्वप्न फुलवायला घर छोटेशे चिमुकले सुंदर घर ...!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2082
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

ह्या कवीला घर कुठे हवय्?मुंबईत हव असेल तर जरा कठीण आहे ह!

भाड्याणे पण मिळणार नाही !!