Skip to main content

' सुखाचा ठेवा -'

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 18/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मी बालपणी खेळविले, तुज खांद्यावर नाचविले तुज खेळविता मी बाळा, ना केला कधी कंटाळा तू किती जरी मज छळले- तव खेळी मन विरघळले कधि घोडा-घोडा झालो; ओझ्याचे गाढव बनलो ! तू तळहाताचा फोड, पुरविले सर्व तव लाड ठेवून 'रोज' मनी स्वार्थ , ना घालविला क्षण व्यर्थ ! कालांतरि होशिल मोठा ! सन्माना नसेल तोटा ! नोटांच्या पायघडया त्या- कुणि घाली सामोरी त्या ना विसरावे तू मजला, ही एकच आस मनाला ! कधि कुणापुढे ना झुकलो; परि आता मी रे थकलो- 'ती' इच्छा मम पुरवावी ' मज वृद्धाश्रमी न ठेवी ! ' तव खांदा मला मिळावा- मजसाठी "सुखाचा ठेवा" !
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1669
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

विदेशां -मस्त ...!!! कधि घोडा-घोडा झालो; ओझ्याचे गाढव बनलो ! तू तळहाताचा फोड, पुरविले सर्व तव लाड ठेवून 'रोज' मनी स्वार्थ , ना घालविला क्षण व्यर्थ ! आवडले...!!