मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घर

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
या घराला विचारले मी एकदा असा रिकामा रिकामा असतोस वाईट नाही वाटत? क्षणभर विचार करून घर म्हणाले, नाही, म्हणजे नेहमीच नाही . . म्हणाले या भिंती पाहिल्यास किती सुंदर रंग लेवून उभ्या आहेत इकडे ये, या खिडक्या पहा आपली कवाडे उलगडून उनपावसाला बोलावून आणताहेत . . अन् ते दार बघितलेस सताड उघडे, सगळे सामावून घ्यायला उत्सुक येणार्‍याला खिडकीतून आलेला पाऊस विनामूल्य देणारे वा सोनसळी उन्हाची खुशाल मेजवानी घालणारे . . हे सगळे पहिले कि नाही वाईट वाटत मी सुखावतो आणि आकंठ भरून जातो रिकामपण माझे काही क्षण का होईना विसरतो विचारले त्याला मग मगशी 'नेहमीच नाही' म्हणालास ते कां? . . म्हणाले जरा वर पहा ते झगमगणारे आकाश पाहिलेस ते चांदण मला बेचैन करते रे, फार जीवाला लागतं ते तेव्हा अचानक ध्यानी आले माझ्या त्या घराने आपले छतचं गमावले होते |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०७/०२/२०१३)

वाचने 3906 वाचनखूण प्रतिक्रिया 22

चाणक्य 07/02/2013 - 12:38
काय बोलू? ...प्रतिक्रिया द्यायला सुद्धा माझ्याजवळचा शब्दसाठा अपुरा आहे मित्रा...सुंदर रचना

In reply to by इनिगोय

अभ्या.. 07/02/2013 - 18:07
इन्नातैला सहमत. मिकाला वेगळी लेन्स मिळालीय. आणि ते बघितलेलं जाणवणार संवेदनशील मन. हे सर्व शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मिका

तिमा 07/02/2013 - 18:03
नावीन्यपूर्ण कल्पना मांडण्यात हातखंडा आहे मिका तुझा! कविता अर्थातच आवडली, हे वेगळं सांगायला नकोच.

तेव्हा अचानक ध्यानी आले माझ्या त्या घराने आपले छतचं गमावले होते
हे छत गमावणंच तर कधीही एकाकी न वाटण्याच रहस्य आहे!

चालत्या फिरत्या कट्ट्याला रामदास काकांनी आम्हाला दाखवलेली 'एक्स्प्लनेड मॅन्शन' बिल्डींग जी जळून गेली होती.. नंतर परत बांधली वगैरे... तिथुन चालू झाली "घर" कविता... हे लिहायचे राहिले होते, धाग्यावर.