Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Tue, 01/29/2013 - 12:39
माजघराच्या डाव्या बाजूची ती खोली बंदच असते आजकाल खूप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून ------- त्या खोलीत एक टोपली आहे जुन्या खेळण्यांनी भरलेली डालडाच्या मोठ्ठ्याश्या डब्यात काठोकाठ भरलेल्या गोट्या आहेत मी जिंकून आणलेल्या फक्त त्यांचे रंग धुसर झाले आहेत आता आरपार रंगीत जग दिसायचे तसे दिसत नाही आताशा ------- बरीच धूळ जमलीये त्या टोपलीवर धुळीखाली ते गर्द निळ्या रंगाचे विमान आहे खर तर एक पंख तुटलाय त्याचा पण जरा जोरात धक्का दिला तर खुरडत खुरडत चालते कधी कधी ------- एक माकडही आहे चावी दिल्यावर इवलासा ढोल वाजवणारे आताही चावी दिल्यावर हातातल्या इटुकल्या काड्या वरखाली करते पण आता काड्यांखालचा तो ढोल तेवढा निखळून पडलाय ------- खरंच खुप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून ------ त्या टोपलीत कायम हसणारा एक बाहुला होता गोंडस, निरागस...गोबर्‍या गालांचा आडवं केलं की शहाण्या बाळासारखा झोपणारा आणि बसवलं की निळे डोळे मिचकावून पुन्हा हसणारा कुठे गेला कुणास ठाऊक.... बरेच दिवस शोधतोय ------- खरंच खुप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून ।- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२९/०१/२०१३)

Submitted by दिपक वायळ on Sun, 05/05/2013 - 14:24

Permalink

बालपणाची आठ्वण झाली खूप छान

बालपणाची आठ्वण झाली खूप छान
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयना on Sun, 05/05/2013 - 15:37

Permalink

खूप आवडली ...

सुंदर कविता . . .
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 10/30/2014 - 12:02

Permalink

पुन्हा वाचली.. पुन्हा एकदा

पुन्हा वाचली.. पुन्हा एकदा हॅट्स ऑफ मिका.. त्रासदायक आहे हे..
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Fri, 01/15/2016 - 07:37

Permalink

फारच सुंदर!

फारच सुंदर!
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Fri, 01/15/2016 - 10:58

Permalink

जबरदस्त

जबरदस्त
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • Log in or register to post comments
  • 23543 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com