✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी बिभीषण एकटा

च — चाणक्य, Tue, 01/08/2013 - 18:38
बेमुवर्त पणे येथे, मद्याचे प्याले वागती यांना न कसली नीती, यांना न कसली भिती तो जो ऊभा राहिला, अन्याय बोलण्या काही तो ही म्हणे आताशा, मद्यात धुंद राही कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही होती काल परवा, हिरवी डौल शेते केव्हा लिलावले त्यांना, आम्हा कळलेच नाही पाऊस अजुनही पडतो, न पडतो ऐसे नाही झाडांचे वॄक्ष व्हाया, आकाश मात्र नाही तो तुका थोर, त्याने अभंगही तरवले आम्ही करंटे आम्हाला,आमुचाच तोल नाही वाटे जरी निराशा, माझ्या स्वरांतुनी तुम्हाला मी बिभीषण एकटा, धनुष्य पेलवत नाही झटलो बांधावया सेतू,तरले दगड नाही लिहिणा-याच्या अहो आज, हातात राम नाही...

प्रतिक्रिया द्या
3133 वाचन

💬 प्रतिसाद (18)

आवडले

पैसा
Tue, 01/08/2013 - 19:39 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

आवडलं रोखठोक!

समयांत
Wed, 01/09/2013 - 09:36 नवीन
आवडलं रोखठोक! फक्त मी बिभीषण एकटा, धनुष्य पेलवत नाही चा संदर्भ लागला नाही.
  • Log in or register to post comments

एकट्याने होत नाहे असे

श्री गावसेना प्रमुख
Wed, 01/09/2013 - 09:48 नवीन
एकट्याने होत नाहे असे म्हणताहेत वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समयांत

खुप सुंदर आहे

शिवप्रसाद
Wed, 01/09/2013 - 10:57 नवीन
खुप सुंदर आहे बाकी समयांत शी सहमत
  • Log in or register to post comments

बरोबर

चाणक्य
Wed, 01/09/2013 - 11:42 नवीन
आजुबाजूला घडू नयेत अश्या ब-याच गोष्टी घडताना मी बघतो. पण दुर्दैवाने ईच्छा असूनही परिस्थिती बदलता येत नाही, कारण माझी एकट्याची ताकद अपुरी पडते. रावणाच्या राज्यात असलेल्या बिभीषणा सारखी माझी अवस्था झाली आहे. बघवत तर नाही, पण एकट्याने काही करताही येत नाही. आजुबाजुला सगळेच रावणाधिष्ठीत....
  • Log in or register to post comments

बेष्ट !

परिकथेतील राजकुमार
Wed, 01/09/2013 - 12:13 नवीन
पण..
बेमुवर्त पणे येथे, मद्याचे प्याले वागती
हे काय पटले नाही. ते वागवावे तसे वागतात.
  • Log in or register to post comments

सुंदर गझल

स्पा
Wed, 01/09/2013 - 12:16 नवीन
सुंदर गझल हे तर
कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही होती काल परवा, हिरवी डौल शेते केव्हा लिलावले त्यांना, आम्हा कळलेच नाही पाऊस अजुनही पडतो, न पडतो ऐसे नाही झाडांचे वॄक्ष व्हाया, आकाश मात्र नाही तो तुका थोर, त्याने अभंगही तरवले आम्ही करंटे आम्हाला,आमुचाच तोल नाही
खासच
  • Log in or register to post comments

सुंदर

पाषाणभेद
Wed, 01/09/2013 - 14:23 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments

अतीशय मस्त रचना.........!

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/09/2013 - 15:56 नवीन
अतीशय मस्त रचना.........!
  • Log in or register to post comments

मित्रा

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 01/09/2013 - 16:05 नवीन
भन्नाट आहे. फिदा झालो मी या रचनेवर
पाऊस अजुनही पडतो, न पडतो ऐसे नाही झाडांचे वॄक्ष व्हाया, आकाश मात्र नाही तो तुका थोर, त्याने अभंगही तरवले आम्ही करंटे आम्हाला,आमुचाच तोल नाही वाटे जरी निराशा, माझ्या स्वरांतुनी तुम्हाला मी बिभीषण एकटा, धनुष्य पेलवत नाही झटलो बांधावया सेतू,तरले दगड नाही लिहिणा-याच्या अहो आज, हातात राम नाही...
तुफान..
  • Log in or register to post comments

अगतिकता अचूक पकडली आहे

बहुगुणी
गुरुवार, 01/10/2013 - 00:12 नवीन
रचना आवडली म्हणावं तर आपल्याच नाकर्तेपणाचा विषण्ण स्वीकार होतो! तरीही आवडलीच.
  • Log in or register to post comments

छान वाटली कविता .

जेनी...
गुरुवार, 01/10/2013 - 00:53 नवीन
छान वाटली कविता . सद्ध्याच्या परिस्थितिवर अचुक बसतेय .
  • Log in or register to post comments

एवढे निराश नका होऊ...

अनन्न्या
गुरुवार, 01/10/2013 - 19:37 नवीन
कविता सुंदर आहे, पण आपल्या राज्यातही येईल राम होईल सारे ऑल-वेल. नक्कीच!! आशा ठेवायला काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments

अहो मी निराश वगैरे नाही झालेलो हो

चाणक्य
गुरुवार, 01/10/2013 - 22:17 नवीन
काळजी नसावी, बाकी प्रतिसादाबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या

छान!

सुधीर
Sun, 01/13/2013 - 16:34 नवीन
रचना खूप चांगली झाली आहे.
  • Log in or register to post comments

खास

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/13/2013 - 16:50 नवीन
आवडली रचना. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अप्रतिम

मन१
Sun, 01/13/2013 - 17:16 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

आवडली

चेतन
Wed, 01/16/2013 - 12:36 नवीन
रचना आवडली अवांतर कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही येथे युधिष्ठीर आणि दुर्योधनाला भिष्मांनी सभेत शिरसावंद्य माणुस शोधण्याच्या प्रसंगाची आठवण झाली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा