✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

येशील?

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Tue, 01/08/2013 - 14:31
अजुनही आठवतंय... सुंदर पुरीया रंगलेला असतांना कटकन सतारीची एकचं तार तुटावी असे काहीतरी झाले होते ----- तू गेलीस त्या दिवसापासून हे असचं होतयं मग माझ्या सगळ्या कवितांचा पसारा मांडुन बसतो घरभर पानचं पानं आणि मध्ये मी ---- अमावस्येच्या रात्री हट्ट धरून बसली होतीस मला चंद्रचं हवाय त्या रात्री कागदाचा एक चंद्र करुन खिडकीच्या काळ्या काचेवर चिकटवला होता तेव्हा कुठे समाधान झाले तुझे ती बघ तिकडे त्या कोपर्‍यात त्या कागदाच्या चंद्रावरची कविता ती माझ्याकडे कशी रागाने बघतेय... ----- दोन आठवड्यांसाठी मी परगावी जातांना डोळ्यात दोनच टप्पोरे थेंब होते तुझ्या एकाने मला बांधून टाकले आणि दुसरा तुझ्या गालावरून चरचरत ओठांवर आला होता तोंड फिरवून तो गिळतांना तुझ्या बटांनी जी जीवघेणी हालचाल केली होती ! कां कोण जाणे पण आता माझ्या बाजूला पडलेल्या या कवितेच्या शाईचा रंग त्याच बटेसारखा झालाय तपकिरी... ------ आत्ता या क्षणी हातात आहे ती कविता आहे जेव्हा तुझं माझं पहिलं भांडण झालं होतं किती झरझर उतरली होती ही कविता ती वाचल्यावर जी घट्ट मिठी मारली होतीस जिवाचा ठाव घेऊन गेले होते ते शब्द 'वेडा! इतकं कां कोणी मनाला लावून घेतं असतं?' पिसासारखा हलका हलका झालो होतो.. ----- आणि ही, त्या मीठ जास्त झालेल्या भाजीवरची लटकीचं पण किती ती चिडचिड? मला इकडे हसू आवरेना आणि तुला तिकडे राग तयार झाल्यावर तुला वाचायला दिली तर तुझ्या कानामागच्या तिळाची उपमा त्या भाजीला दिलेली पाहून तुझीही हसून हसून मुरकुंडी उडाली होती पार डोळ्यांतून पाणी येईस्तोवर हसलो होतो आपण आता तीच कविता परत माझ्या डोळ्यातून पाणि काढतेय... ----- मला माहीत आहे शक्य नाहीये तुला पण एकदाच परत येशील? माझ्यासाठी नको... पण निदान त्या कागदाच्या चंद्रासाठी नाहीतर त्या मीठ जास्त झालेल्या भाजीसाठी सांग ना... येशील? |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०७/०१/२०१३)

प्रतिक्रिया द्या
6137 वाचन

💬 प्रतिसाद (36)

टचिंग आहे.

गवि
Tue, 01/08/2013 - 14:38 नवीन
टचिंग आहे. करुण रस योग्यच, पण शांत रस नाही, अस्वस्थरस आहे..
  • Log in or register to post comments

श्या..

समयांत
Tue, 01/08/2013 - 15:53 नवीन
आपल्याला आवडलंय हे..;)
  • Log in or register to post comments

एकदम मस्त..

सव्यसाची
Tue, 01/08/2013 - 16:23 नवीन
एकदम मस्त..
  • Log in or register to post comments

मिक्या, लेका तु यार लैच्च

वपाडाव
Tue, 01/08/2013 - 17:07 नवीन
मिक्या, लेका तु यार लैच्च हळवं करायलाइस बग... आस्सं कर नोक रं... दुखतंय इक्डं???
  • Log in or register to post comments

+१११११११११११११११११११११११११

बॅटमॅन
Tue, 01/08/2013 - 19:14 नवीन
+१११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

+++++++++++++++++

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/09/2013 - 00:05 नवीन
++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११ Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मागल्या वेळी चुप्प अन या वेळी

पाषाणभेद
Wed, 01/09/2013 - 14:21 नवीन
मागल्या वेळी चुप्प अन या वेळी येशील? तेच म्हणतोय. मिका फार हळवं नको करू बाबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मिका, पुन्हा एक सुरेख कविता!

संजय क्षीरसागर
Tue, 01/08/2013 - 23:43 नवीन
असाच लिहित रहा.
  • Log in or register to post comments

खूपच छान

सुचेल तसं
Wed, 01/09/2013 - 00:55 नवीन
बोजड शब्द टाळून ह्रदयाला भिडणारी कविता लिहिलीत.
  • Log in or register to post comments

:(

पैसा
Wed, 01/09/2013 - 09:23 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

जियो मिका

चाणक्य
Wed, 01/09/2013 - 15:45 नवीन
लई भारी. काळजालाच हात घातलास
  • Log in or register to post comments

रंजीश ही सही ( मला वाटते असे

इन्दुसुता
गुरुवार, 01/10/2013 - 00:15 नवीन
रंजीश ही सही ( मला वाटते असे लिहायचे असते... पण उर्दू येत नाही त्यामुळे नक्की माहिती नाही :( ) दिल ही दुखानेके लिये आ.... या आर्त गझलेची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

कविता आवडली .... पण .

जेनी...
गुरुवार, 01/10/2013 - 00:27 नवीन
कविता आवडली .... पण . एक कडवं खटकलं . ते चंद्र हवाय वालं ... म्हणजे वाचुन क्षणभर वाटलं ... हि नक्कि कुनासाठी लिहिलिय ?? २२ कि २ वयवर्षे ?? बाकिच्या सगळ्या ओळी खुप खुप आवडल्या . अगदी आत पोचल्या .
  • Log in or register to post comments

अहो

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 01/10/2013 - 08:52 नवीन
पूजातै, वय वर्षे २ ते वय वर्षे ९२ या सर्व वयोगटातील लोकांना चंद्राचे आकर्षण असते, असे आपले माझे मत. फक्त त्या आकर्षणातील मायने बदलतात इतकेच. बाकी प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

हे चंद्र मागण, एक बालिशपणा

स्पंदना
गुरुवार, 01/10/2013 - 09:24 नवीन
हे चंद्र मागण, एक बालिशपणा असतो जो अगदी जिवाभावाचा असेल तोच पूरवतो. चंद्र मागण हे एक कारण, निमित्त्य. खर मागणं वेगळच असत, तूझ्यासवे उभा रहाताना जी मॅच्युरिटीची, सहगामिनीची अपेक्षा तू करतोस तशीच मला या बालीश रुपातही स्विकारशील का? हा चॅलेंज असतो. अन बिलिव्ह मी पूजा, मोठमोठ्या घटनांनी जो फरक पडणार नाही, जे नात विणल जाणार नाही ते साध्य होत या बालिश, बिन खर्चिक हट्टातून असल्या प्रसंगातून. हे असले हट्ट पूरवायला एखाद्याच त्या व्यक्तीवर इतक प्रेम असाव लागत की बस. तसेही असले हट्ट तुम्हाला पैशाची, ऐशोआरामाची मागणी नाही करत, ते करतात मागणी ती तुमच्या मनातून तुम्ही खरच माझ्यावर प्रेम करता का या पूराव्याची. अन तो देता येतो या असल्या बालिश निरागस आनंदातुनच. बघ विचार कर. प्रेमिका वेगळी. ती दोन तास भेटुन परत जाते, तुम्ही मोकळे असता तिथुन पुढे. बायको वेगळी ती २४ तास तुमच्याबरोबर रहाणार. अन मग सारं सारं शेअर कराव लागत. त्याची तयारी होते ती या असल्या बालिश हट्टातूनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अप्रतिम प्रतिसाद

चाणक्य
गुरुवार, 01/10/2013 - 09:38 नवीन
आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

क्या बात है!! एकदम काव्यमय

पाषाणभेद
गुरुवार, 01/10/2013 - 09:42 नवीन
क्या बात है!! एकदम काव्यमय प्रतिसाद. 'मुक्तछंद काव्य हे जरी गद्यासारखे 'लिहीलेले' असले तरी त्यातील भावना मुख्यत्वे काव्यमय असाव्यात/ असतात' असा अर्थबोध होणारा लेख श्री. रमेश तेंडूलकर (त्यांचा मुलगा सचिन तेंडूलकरांचे आहे ते!) यांचा आहे. त्याची प्रकर्षाने आठवण झाली. ताई तुमचा वरील प्रतिसाद मला त्याच प्रतिभेशी मिळताजुळता वाटला. खुप खुप बरे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

कवितेच्याच सुरात लागलेला मस्त

इनिगोय
गुरुवार, 01/10/2013 - 16:35 नवीन
कवितेच्याच सुरात लागलेला मस्त प्रतिसाद.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

वाह क्या बात है!!!!!!

बॅटमॅन
गुरुवार, 01/10/2013 - 16:37 नवीन
वाह क्या बात है!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

Claps...!

वपाडाव
गुरुवार, 01/10/2013 - 17:16 नवीन
Standing Ovation .o. \ / || / \
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

वॉव अप्पु !

जेनी...
गुरुवार, 01/10/2013 - 21:54 नवीन
वॉव अप्पु ! पण खरच कुणी असं असतं का?? इतक्या बालिश हट्टाला वेड्यात न काढणारं ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

त्याला वेव्हलेंग्थ जुळण

स्पंदना
Fri, 01/11/2013 - 07:52 नवीन
त्याला वेव्हलेंग्थ जुळण म्हणतात. एक कविता आहे, तू खुळा मी खुळी आपली मुले खुळखुळी" सांगु का? नवरा बायको हे नातं एकमेकाशी अगदी घट्ट जुळतं ते खेळकरपणानेच. बघ अजुन वेळ हातचा गेला नाही आहे, आत्ता कुठे पहाट होतेय. ट्राय इट & एंजॉय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

केवढी सुंदर कविता!

शुचि
गुरुवार, 01/10/2013 - 00:34 नवीन
केवढी सुंदर कविता!
  • Log in or register to post comments

तुस्सी छा गये मि.का.जी

पियुशा
गुरुवार, 01/10/2013 - 09:47 नवीन
तुस्सी छा गये मि.का.जी :)
  • Log in or register to post comments

कविता सुरेख.. एकदम गुलजार

इनिगोय
गुरुवार, 01/10/2013 - 16:37 नवीन
कविता सुरेख.. एकदम गुलजार यांच्या मेरा कुछ सामान स्टाईल.
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा वाचली... अन

वपाडाव
गुरुवार, 01/10/2013 - 17:21 नवीन
नसतेस घरी तु जेव्हा आठौले यार... संमंना विनंती :: प्लीज, प्लीज, प्लीज.. असलं साहित्य लपवुन ठेवण्यात यावं, नाहीतर जखमा लैच्च भळभळुन वाहतात !!!
  • Log in or register to post comments

भार्री ....

१००मित्र
गुरुवार, 01/10/2013 - 17:47 नवीन
भार्री ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

या मिकाचं साहित्य लपवून

इनिगोय
Fri, 04/05/2013 - 14:06 नवीन
या मिकाचं साहित्य लपवून ठेवण्यात यावं.. अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

.....

इष्टुर फाकडा
गुरुवार, 01/10/2013 - 20:14 नवीन
उद्या शुक्रवार आहे...उद्याच वाचली असती तर बरं झालं असतं...तुम्ही लिहित राहा, काव्य विभागात त्यामुळे पुन्हा पुन्हा येणं होईल. अन्यथा तो अमुचा प्रांत नव्हे.
  • Log in or register to post comments

मस्त कविता!

फिझा
Wed, 01/30/2013 - 11:15 नवीन
आवड्लि!!
  • Log in or register to post comments

वाह !

सांजसंध्या
Wed, 01/30/2013 - 14:51 नवीन
वाह !
  • Log in or register to post comments

गुलजार आठवले.

क्रान्ति
Wed, 01/30/2013 - 22:36 नवीन
जैसे झन्नाके चटख जाये किसी साज का इक तार जैसे रेशम की किसी डोर से कट जाती है उँगली ऐसे इक जर्ब सी पडती है कही सीने के अंदर खींचकर तोडनी पड जाती है जब तुझसे निगाहें तेरे जाने की घडी . . . बडी सक्त घडी है ! गुलजार ही कविता वाचून अगदी असंच काही वाटलं. अप्रतिम कविता!
  • Log in or register to post comments

फ्यॅन

प्रसाद गोडबोले
Tue, 02/05/2013 - 13:52 नवीन
मिका , मी तुमच्या कवितांची फ्यॅन झाली आहे हे ह्या कवितेच्या निमित्ताने नमुद करु इछिते !
  • Log in or register to post comments

खूपच टची! हॅट्स ऑफ.

प्यारे१
Tue, 02/05/2013 - 14:33 नवीन
खूपच टची! हॅट्स ऑफ. आपाताईला पण सलाम! वप्याला 'सावधानताही बचाव है' एवढंच म्हणतो!
  • Log in or register to post comments

मिका ठाव घेतलास रे हृदयाचा .

आगाऊ म्हादया......
Wed, 04/03/2013 - 21:01 नवीन
मिका ठाव घेतलास रे हृदयाचा ...मस्तच...पुन्हा पुन्हा वाचतोय .
  • Log in or register to post comments

कविता आवडली, खुपच छान झाली

Bhagwanta Wayal
गुरुवार, 04/04/2013 - 15:40 नवीन
कविता आवडली, खुपच छान झाली आहे....!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा