✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ती खोली

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Tue, 01/29/2013 - 12:39
माजघराच्या डाव्या बाजूची ती खोली बंदच असते आजकाल खूप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून ------- त्या खोलीत एक टोपली आहे जुन्या खेळण्यांनी भरलेली डालडाच्या मोठ्ठ्याश्या डब्यात काठोकाठ भरलेल्या गोट्या आहेत मी जिंकून आणलेल्या फक्त त्यांचे रंग धुसर झाले आहेत आता आरपार रंगीत जग दिसायचे तसे दिसत नाही आताशा ------- बरीच धूळ जमलीये त्या टोपलीवर धुळीखाली ते गर्द निळ्या रंगाचे विमान आहे खर तर एक पंख तुटलाय त्याचा पण जरा जोरात धक्का दिला तर खुरडत खुरडत चालते कधी कधी ------- एक माकडही आहे चावी दिल्यावर इवलासा ढोल वाजवणारे आताही चावी दिल्यावर हातातल्या इटुकल्या काड्या वरखाली करते पण आता काड्यांखालचा तो ढोल तेवढा निखळून पडलाय ------- खरंच खुप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून ------ त्या टोपलीत कायम हसणारा एक बाहुला होता गोंडस, निरागस...गोबर्‍या गालांचा आडवं केलं की शहाण्या बाळासारखा झोपणारा आणि बसवलं की निळे डोळे मिचकावून पुन्हा हसणारा कुठे गेला कुणास ठाऊक.... बरेच दिवस शोधतोय ------- खरंच खुप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून ।- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२९/०१/२०१३)

प्रतिक्रिया द्या
23543 वाचन

💬 प्रतिसाद (55)

मिका!

संजय क्षीरसागर
Tue, 01/29/2013 - 13:36 नवीन
कमाल केली आहेस.
  • Log in or register to post comments

चायला .......

स्पा
Tue, 01/29/2013 - 13:39 नवीन
चायला .......
  • Log in or register to post comments

चायला ++

धमाल मुलगा
Tue, 01/29/2013 - 14:25 नवीन
झक मारली अन् कविता वाचली! खाली गवि म्हणतात त्याबाबत १०१% सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सुरेख, आठवणींना लाभलेली 'खोली

इनिगोय
Tue, 01/29/2013 - 14:04 नवीन
सुरेख, आठवणींना लाभलेली 'खोली' आवडली :)
  • Log in or register to post comments

आई ग्ग... मिका.. तू कविता

गवि
Tue, 01/29/2013 - 14:12 नवीन
आई ग्ग... मिका.. तू कविता लिहू नको बाबा. कविता लिहायला घेतलीस की चरचरवणारं, आतून हलवणारं काहीतरी लिहीतोस. तुझ्या कवितांची ती अशक्य हुरहूर नकोच.. तू किरकोळ "सेफ" टाईप लिखाण करत जा बाबा.. साधं ललित, चित्रपट परीक्षण, पाककृती, विनोदी, प्रेमकथा असे आणि कितीक प्रकार पडलेत.
  • Log in or register to post comments

+१

प्रसाद गोडबोले
Tue, 01/29/2013 - 15:38 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अगदी अगदी

चाणक्य
Tue, 01/29/2013 - 15:43 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+ १

अक्षया
Tue, 01/29/2013 - 14:15 नवीन
+ १
  • Log in or register to post comments

मस्त.

यशोधरा
Tue, 01/29/2013 - 14:20 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

मनापासून आवडली.

अज्ञातकुल
Tue, 01/29/2013 - 14:37 नवीन
:-) मनापासून आवडली.
  • Log in or register to post comments

वा..!

उपटसुंभ
Tue, 01/29/2013 - 15:05 नवीन
वा..!
  • Log in or register to post comments

'रम्य' बालपणाच्या आठवणीत

सस्नेह
Tue, 01/29/2013 - 15:24 नवीन
'रम्य' बालपणाच्या आठवणीत रमण्याच्या कल्पनेला सुरुंग लावलात..
  • Log in or register to post comments

आह

प्रसाद गोडबोले
Tue, 01/29/2013 - 15:39 नवीन
मनातली खूप खोलवरची तार छेडलीत मिकाराव ! अप्रतिम कविता !!
  • Log in or register to post comments

हल्ली मलाच नव्हे तर

५० फक्त
Tue, 01/29/2013 - 15:51 नवीन
हल्ली मलाच नव्हे तर सग़ळ्यांनाच बालपण फार आठवायला लागलंय,
  • Log in or register to post comments

अंगावर काटा काढलात .

तर्री
Tue, 01/29/2013 - 16:12 नवीन
त्या टोपलीत कायम हसणारा एक बाहुला होता गोंडस, निरागस...गोबर्‍या गालांचा आडवं केलं की शहाण्या बाळासारखा झोपणारा आणि बसवलं की निळे डोळे मिचकावून पुन्हा हसणारा कुठे गेला कुणास ठाऊक.... बरेच दिवस शोधतोय अंगावर काटा आणि भयानक अस्वस्थ करणारा अनुभव.
  • Log in or register to post comments

अंगावर काटा आणि भयानक अस्वस्थ

अग्निकोल्हा
Tue, 01/29/2013 - 23:05 नवीन
अंगावर काटा आणि भयानक अस्वस्थ करणारा अनुभव.
अगदी शब्दशः तिव्र सहमत.. किती सहज वाक्ये... अन्...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

खूपच आवडली

सखी
Fri, 02/01/2013 - 22:58 नवीन
कविता खुपच आवडली. गवि आणि इतर काही़जणांशी असहमत होऊन लिहीत रहा असे म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

अगदी!

पैसा
Sat, 02/02/2013 - 20:12 नवीन
पूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

खरच होती रे अशी एक खोली.. खरच

शैलेन्द्र
Tue, 01/29/2013 - 17:11 नवीन
खरच होती रे अशी एक खोली.. खरच होती :(
  • Log in or register to post comments

अपतिम

प्रभाकर पेठकर
Tue, 01/29/2013 - 17:28 नवीन
खूपच अर्थगर्भ कविता. विचार केला की जाणवतं प्रत्येकाच्या आयुष्यात अशीच एखादी 'खोली' असते. त्यात कमीजास्त खेळणी असतात आणि त्या खेळण्यांना बिलगलेल्या अस्वस्थ आठवणी. आज, सर्व महत्त्वाची कामे बाजूला सारून आठवणीतल्या ह्या सर्व खेळण्यांशी हळूवार खेळत बसावे असे वाटते आहे.
  • Log in or register to post comments

सहमत

सानिकास्वप्निल
Tue, 01/29/2013 - 18:26 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

दाटून कंठ येतो

तिमा
Tue, 01/29/2013 - 19:57 नवीन
काय अवस्था करता मिकाराव तुम्ही आमची! भरुन आलं वाचताना!
  • Log in or register to post comments

मिका

jaypal
Tue, 01/29/2013 - 21:28 नवीन
मुजरा स्विकराव. प्रत्येकाचे एक खोली आणि आपापली खेळणी असतात. तशीच माझी पण आहे. आधुन मधुन धुळ झटकतो. मनसोक्त खेळतो आणि परत ठेवतो. पुन्हा धुळ बसण्यासाठी... कविता खुप आवडली माझ्या ईतर मित्रांबरोबर शेअर करण्या साठी परवानगी हवी आहे. फक्त आपले नाव व्यनी करा म्हणजे सोपे होईल. Image removed.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!!!!!!!!

क्रान्ति
Tue, 01/29/2013 - 21:45 नवीन
मनात पार खोलवर उतरली कविता. गेला ओसरुनी प्रकाश सगळा, हो म्लान ताजेपणा आता शोधुनही न भेटति पुन्हा त्या शैशवीच्या खुणा या शांताबाईंच्या ओळी आठवल्या.
  • Log in or register to post comments

वाह!!

किसन शिंदे
Tue, 01/29/2013 - 23:26 नवीन
वाह!! _/\_ मिका, काय लिहिता राव तूम्ही....स्पीचलेस!!
  • Log in or register to post comments

और क्या बोलेगा? +1 टू किसन

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/29/2013 - 23:56 नवीन
और क्या बोलेगा? +1 टू किसन द्येव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

+१

सुहास झेले
Tue, 02/05/2013 - 15:41 नवीन
अतृप्त आत्मा ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

नितांत सुंदर !!!

धन्या
Tue, 01/29/2013 - 23:31 नवीन
शेवट मनाला भिडणारा. प्रत्येकाला अशी जाणिव कधी ना कधी होतेच.
  • Log in or register to post comments

(No subject)

कवितानागेश
Wed, 01/30/2013 - 00:34 नवीन
:(
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर!!

आनन्दिता
Wed, 01/30/2013 - 01:27 नवीन
अतिशय सुंदर!!
  • Log in or register to post comments

आज, सर्व महत्त्वाची कामे

इन्दुसुता
Wed, 01/30/2013 - 08:13 नवीन
आज, सर्व महत्त्वाची कामे बाजूला सारून आठवणीतल्या ह्या सर्व खेळण्यांशी हळूवार खेळत बसावे असे वाटते आहे. पण खेळता येत नाही म्हणूनच अतिशय अस्वस्थ वाटते. कविता आतवर हलवून गेली.
  • Log in or register to post comments

वा !

मदनबाण
Wed, 01/30/2013 - 09:54 नवीन
वा !
  • Log in or register to post comments

छे... चुकलेच

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 01/30/2013 - 10:37 नवीन
मि.का. ची कविता म्हटल्यावर उघडुन वाचायचे टाळत होतो. पण आज शेवटी रहावलच नाही आणि जे अपेक्षीत होते तेच झाले. नकोरे असले काहीतरी लिहूस, ओरखाडे काढणार. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

वा !!!

फिझा
Wed, 01/30/2013 - 11:07 नवीन
़कAAA y बोलवे .....नकोच्,,,काहि
  • Log in or register to post comments

मिका तुमच्या खोलीतली खेळणी

जेनी...
Wed, 01/30/2013 - 19:08 नवीन
मिका तुमच्या खोलीतली खेळणी आवडली .
  • Log in or register to post comments

सुरेख

दत्ता काळे
Fri, 02/01/2013 - 19:01 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

वा:

मराठे
Fri, 02/01/2013 - 23:07 नवीन
वा:
  • Log in or register to post comments

रडवलंत मिका.

चित्रगुप्त
Sat, 02/02/2013 - 00:20 नवीन
आत्ता ही कविता वाचताना समोरच "कायम हसणारा, गोंडस, निरागस...गोबर्‍या गालांचा बाहुला" खेळतोय, आणि उद्या त्याला सोडून दूरच्या मायदेशी जायचंय.... रडवलंत मिका. Image removed.
  • Log in or register to post comments

क्षमस्व!!

मिसळलेला काव्यप्रेमी
Sat, 02/02/2013 - 10:03 नवीन
क्षमस्व! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

लिहीते रहा मिका.

स्पंदना
Sat, 02/02/2013 - 08:24 नवीन
लिहीते रहा मिका.
  • Log in or register to post comments

किवता मनापासून आवडली.

नक्शत्त्रा
Mon, 02/04/2013 - 10:20 नवीन
किवता मनापासून आवडली.बालपण जगवणारी आिण जागवणारी ...
  • Log in or register to post comments

क्लास! रिग्रेशन मस्त टिपलंय!

नगरीनिरंजन
Mon, 02/04/2013 - 10:52 नवीन
क्लास! रिग्रेशन मस्त टिपलंय!
  • Log in or register to post comments

लईच सेन्टी मारलाय रे

सुहास..
Mon, 02/04/2013 - 13:03 नवीन
लईच सेन्टी मारलाय रे :)
  • Log in or register to post comments

बर्याच दिवसानी येथे आलो..

गणेशा
Tue, 02/05/2013 - 12:37 नवीन
बर्याच दिवसानी येथे आलो.. कविता वाचली .. तुझ्या शब्दांमार्फत कधी तुझ्या कवितेतुन मी माझ्या गावात .. माझ्या जुन्या घरात गेलो कळलेच नाही ... निरागस आठवणीनी सुद्धा आजकाल खुप जखमा होतात ..
  • Log in or register to post comments

खतरनाक!

दादा कोंडके
Tue, 02/05/2013 - 15:56 नवीन
मस्त कविता!
  • Log in or register to post comments

अ....प्र....ति....म

चाणक्य
Tue, 02/05/2013 - 20:43 नवीन
मिका, निव्वळ अप्रतिम...थेट काळजाला हात घालतोस तु
  • Log in or register to post comments

आज इतक्या वर्षांनी पुन्हा

आगाऊ म्हादया......
Mon, 04/01/2013 - 15:43 नवीन
आज इतक्या वर्षांनी पुन्हा त्या खेळण्यांची आठवण आली ...आहेत अजून माझ्याकडे ...जपून ठेवलेली.... खेळेन म्हणतो परत...बालपण सापडेल कदाचित...धूळ असेल तर पुसेन त्यावरची... खूप मस्त..
  • Log in or register to post comments

(No subject)

प्रीत-मोहर
Tue, 04/30/2013 - 19:06 नवीन
:(
  • Log in or register to post comments

मिका

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/30/2013 - 19:42 नवीन
व्वा. कविता आवडली. शेवटच्या ओळी क्या कहने. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

तोडलस मित्रा...!!!!!

अनिदेश
Fri, 05/03/2013 - 13:32 नवीन
व्वा....!!!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा