हे प्रचंड शहर
खास पोटापाण्यासाठी राखीव कुरण
गरिबांचे शहर
श्रीमंताचे शहर
मौज-मस्तीचे शहर
संस्कृतीचे शहर
सांस्कृतिक शहर
चिंचोळ्या गल्लीतून दिसणाऱ्या खिडकीचे शहर
आता हे शहर आहे बंदुकीच्या टोकावर
गोळी कधीही उडू शकते
बोंब कधीपण फुटू शकतो
गाडीमध्ये ...
स्टेशनमध्ये ......
भर गर्दीत ...
कोठेही
कधीही ..!
सावध ..!
नि फक्त सावध ..!!
काय करू शकतो...?
मी? ,तुम्ही ,??आपण ???
तुमच्या पाठीत कधीपण घुसू शकतात संगीनीची टोके
आजकाल मरायच्या नि मारायच्या गोष्टी फार सोप्या होऊन गेल्यात
अम्बुलंसवाला सहज सांगतो ;थकलो साहेब ,शंभर बोड्या सोडून आलो
काय मजाक आहे का ?
नि साले बोनस देत नाहीत .....